Latest Marathi News Live Update  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

सकाळ वृत्तसेवा

Mumbai live : मंत्रालय आणि राजभवनाबाहेर फेरीवाल्यांना स्टॉल लावू द्याल का? उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलं

मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि पालिका प्रशासनाला बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सुनावलं. मंत्रालय आणि राजभवनाबाहेर फेरीवाल्यांना स्टॉल लावू द्याल का? असा मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला संतप्त सवाल केलाय.

Live news update: गोवंशाचे मास विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी घेतल ताब्यात

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पैठण संभाजीनगर महामार्गावर ढोरकिन येथे बेकायदेशीर रित्या गोवांशाच्या मासाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोन जणांना एमआयडीसी पैठण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 30 किलो गोवंशाचे मास जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान सदरील गोमांस कोठून खरेदी केले, जनावरांची कत्तल कुठे झाली आणि ही गोमांस कोणाला विक्रीसाठी जात होते अशा विविध बाबींचा सखोल तपास आता पोलीस करत आहे.

BJP Live: भाजपच्या कोअर कमिटी बैठकीसाठी सागर बंगल्यावर नेते दाखल होण्यास सूरवात

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीसाठी सागर बंगल्यावर नेते दाखल होण्यास सूरवात झाली आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील सागर बंगल्यावर दाखल झाले. काही वेळातच होणार बैठकीला सूरवात होणार.

Congress Live: दिल्लीत काँग्रेसची महत्वाची बैठक

काँग्रेसची उद्या दुपारी ३ वाजत दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांसह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Nashik rain live: नाशिक शहरात पावसाची हजेरी, रिमझिम  सरी

Nashik: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून शहरात रिमझिम पावसाच्या सरी पहायला मिळत होत्या

Kolhapur rain live : पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस असून यामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात होणार बैठक

मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील धारेश्वर धबधबा कुंडात 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात असणाऱ्या धारेश्र्वर धबधब्याच्या कुंडात एका 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय.गौरव किशोर नेरकर अस मृत्यु झालेल्या तरुणच नाव असून हा तरुण धबधब्यातून अंघोळ करून बाहेर आल्यानंतर जवळच असलेल्या कुंडा शेजारच्या शेवाळावर पाय घसरून पुन्हा कुंडातील खोल जागेत जाऊन पडला यात त्याच्या मृत्यु झाला.

Devendra Fadnavis Live : फडणवीसांच्या निवासस्थानी आज होणार भाजप कोअर कमिटीची बैठक

आज रात्री 8 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे यांच्यासह इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. काल पक्षाची प्रदेश कार्यकारणी झाली त्यानंतर पक्षात खलबत सुरू आहेत.

Latur Rain Live : जळकोट तालुक्यातील तिरु नदीवरील पर्यायी पूल गेला वाहून.... 28 गावांचा संपर्क तुटला... 

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्या आहे. नदीला पावसाच्या पाण्याचा प्रभाव वाढल्याने पुल वाहून गेला आहे. तर अतनूर गावसह जवळपास 28 गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. दरम्यान नवीन पुलाचे काम मंजूर असूनही झाल नसल्याने तीरु नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र पाण्याच्या प्रवाहाने पर्यायी पूल होऊन गेला आहे. त्यामुळे जवळपास 28 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

Amit Shah Live : अमित शहा, जेपी नड्डांची संसदेतील एचएम कार्यालयात बैठक 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री-भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा संसदेतील एचएम कार्यालयात बैठक घेत आहेत.


NEET परीक्षेतील गुणांबाबत IIT दिल्लीच्या तज्ज्ञांचं मत घेणार 

NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेली आजची सुनावणी संपली. परीक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. त्यामुळं 4.2 लाख उमेदवारांचं नुकसान झालं असल्यानं कोर्टानं यावर IIT दिल्लीच्या तज्ज्ञांचे मत घेतलं पाहिजे असं म्हटलं. कोर्टानं IIT दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ञांची टीम तयार करून या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. उद्याही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Mumbai Live: चर्चेगेट स्थानकात ओव्हरहेड वायरवर जॅकेट

चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक 2 च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट टाकल्यानं त्याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवर झाला आहे. जॅकेट असल्यानं पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे. जवळपास 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं सुरु होती. वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुलुंड परिसरात भरधाव ऑडी कारच्या धडकेत चौघे जखमी

मुलुंड परिसरात भरधाव ऑडी कारच्या धडकेत चौघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक सुरुवातीला फरार झाला होता. अपघातात दोन रिक्षांच देखील मोठं नुकसान झालं असून यातील दोन प्रवाशी देखील जखमी झाले आहेत. विजय दत्तात्रय नावाच्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Sambhajinagar Live: ओमराजे निंबाळकर यांच्या खासदार निवडीला आव्हान

अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या खासदार निवडीला आव्हान दिलं आहे. धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत झाली होती. त्यांनी आता संभाजीनगर खंडपीठात त्यांना आव्हान दिलं आहे.

Raigad, Kolhapur, Satara Rain Live: पालघर ते सातारा, पावसाचा जोर कायम; वाचा कुठे काय आहे स्थिती

पालघर जिल्ह्यात २४ तासात ६२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गडचिरोली- मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडले.

कोल्हापूर- पंचगंगा नदी इशारा पातळीवर असून, ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

भंडारा- आसगावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ९० टक्के घरांना पुराचा वेढा. गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले. आसपासच्या गावांना इशारा.

सांगली- शिराळा तालुक्यातील सांगोली धरण ७८ टक्के भरलं. चांदोली धरण परिसरात दमदार पाऊस, कोलापूरला जोडणारा पूल पाण्याखाली, वारणा नदीला पूर.

सातारा- महाबळेश्वरच्या तापोळा रस्त्यावर दरड कोसळली.

रत्नागिरी - ४ नद्या इशारा पातळीवर, काजळी नदीला रौद्ररूप प्राप्त

रायगड- कुंडलिका नदी इशारा पातळीच्या खाली.

Sharad Pawar Live: शरद पवार अठरा पगड जातीचे कर्दनकाळ, त्यांना धनगर खासदार चालत नाही - लक्ष्मण हाके

शरद पवार हे महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचे कर्दन काळ आहेत, त्यांना धनगर खासदार कधीही चालत नाहीत असं वक्तव्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.

Solapur Live : वीर अन्‌ भाटघर धरणातील पाण्याचे पूजन; यंदा धरण लवकर भरू दे, केली प्रार्थना

सासवड माळी शुगर फॅक्टरी आणि शुगरकेन सोसायटीमधील सभासदांनी वीर आणि भाटघर धरणातील पाण्याचे पूजन केले. पाण्यात नारळ अर्पणनाने अन्‌ आरती करून यंदा धरण लवकर भरू दे, अशी सर्वांनी प्रार्थना केली.

गतवर्षी देवघर, भाटघर, गुंजवणी धरणे भरली होती; परंतु वीर धरण तीन टीएमसीने कमी भरले होते. त्याचा फटका गत उन्हाळी हंगामात एकच पाण्याचे आवर्तन मिळाल्याने या धरणाच्या लाभक्षेत्रातील फलटण, माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील पिकांना फटका बसला होता.

Mumbai Rain Live : पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्डे "माझा लाडका खड्डा" असं लिहलेले टी शर्ट घालून आंदोलन

मुंबईत पावसाची संततधार कायम असल्याने मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडू लागले आहेत. याच खड्ड्यंवरून वॉचडॉग फाउंडेशनने अंधेरीच्या सहार रोड परिसरात आंदोलन केलं , यावेळी संस्थेच्या सदस्यांनी "माझा लाडका खड्डा" असं लिहलेले टी शर्ट घालून सरकारास पालिका आणि प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईची देखील मागणी केली.

Nirmala Sitharaman Live : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला

  • आर्थिक पाहणी अहवालातील प्रमुख मुद्दे -

  • २०२४ मध्ये आर्थिक वाढीचा दर ८.२ राहण्याचा अंदाज

  • एफडीआय (विदेशी गुंतवणूक) मध्ये किंचित घट

  • आर्थिक पाहणी अहवालाच्या प्रस्तावनेत ईशोपनिषदातील श्लोकाचा संदर्भ त्याचा अर्थ असा आहे की, “सत्ता सरकारच्या हातात असते पण त्यांनी काही प्रमाणात तरी ती वितरित केली पाहिजे. त्यातून निर्माण होणारी सहजतेचा आनंद राज्यकर्ते व जनता दोघेही घेऊ शकतात”

महागाई नियंत्रणात आहे

- कोविडनंतर अर्थव्यवस्थेत स्थैर्य

- २०२१ ते २०२४ पर्यंत अर्थसंकल्पात तूट कमी करण्यात आली आहे

- करवगळून सरकारचे उत्पन्न एकूण महसूलाच्या १४.५ टक्के

- करातून आलेला महसूल वाढला आहे

- २०२३ च्या तुलनेत २०२४ साली महागाई कमी झाली आहे

- २०२३ साली ६.७ टक्के महागाई दर होता

- २०२४ साली ५.४ टक्के महागाई दर होता

- बेरोजगारी दर कमी होतो आहे

- महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार , गुजरात हे केरळ आणि तामिळनाडू पेक्षा गरीब राज्य असूनही मनरेगा फंड्स कमी खर्च झाले तर केरळ तामिळनाडू यांनी मनरेगावर जास्त प्रमाणात पैसा खर्च केला आहे

- ११.५७ करोड स्वच्छतागृह व २.३९ लाख सार्वजनिकस्वच्छतागृह स्वच्छ भारत अंतर्गत २०२४ पर्यंत बांधली आहेत

- पीएम मुद्रा योजनेत ६८ टक्के कर्ज महिलांना

- स्टैंड अप इंडिया योजनेचा ७७ टक्के लाभ महिलांनी घेतला आहे

- ⁠उच्च शिक्षणात समानता वाढते आहे

- ⁠G २० देशांमध्ये दरडोई जमीन उपलब्धता भारतात सर्वात कमी

D.K. Shivakumar Live  : पावसामुळे आम्हाला पुरेसे पाणी मिळाले - डीके शिवकुमार

पावसामुळे आम्हाला पुरेसे पाणी मिळाले आहे, आम्हाला 40 टीएमसी पाणी सोडायचे आहे, आता प्राधिकरणाने आम्हाला सोडण्याची परवानगी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांना सावध राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती डीके शिवकुमार यांनी दिली.

Rahul Gandhi Live : राहुल गांधींनी संसदेत NEET चा मुद्दा उपस्थित केला,पण सरकारला त्यात रस नाही

NEET च्या मुद्द्यावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी होती. ते सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान मोदींबद्दल बोलले पण ते यावर काय करत आहेत हे स्पष्ट केल नाही. NEET विषया महत्त्वाचा मुद्दा आम्ही संसदेत मांडला, पण सरकारला त्यात रस नाही.

Navi Mumbai Live : नवी मुंबई येथील दिघा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन

नवी मुंबई येथील दिघा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन करण्यात आलं. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं आहे, आश्वासन देऊनही रस्ते करण्यात आले नाहीत यासाठी खड्ड्यात बसून मनसेनं आक्रमक आंदोलन केले.

Mumbai Rain Live Updates:  मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईत NDRF ची तीन पथके तैनात

  • मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • या पार्श्वभूमीवर NDRF ची तीन पथके तैनात मुंबईत तैनात करण्यात आली आहे.

  • याशिवाय वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.

  • एक टीम नागपूर येथे तैनात आहे.

Mumbai Local Live Updates: पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिरा

  • विरारावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 मिनिटं उशिराने धावताहेत

  • मध्य रेल्वेवरील गाड्या 15 ते 20 मिनिटं उशिराने

  • कल्याण वरुन CSMT च्या दिशेने येणाऱ्या लोकल 20 मिनिटं उशिराने धावताहेत

  • हार्बर मार्गावरील गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरा

Budget Session 2024 Live Updates: संसदेत NEET वरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला

संसदेत NEET वर चर्चेदरम्यान बोलताना सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. सपा अध्यक्ष म्हणाले, जर हे मंत्री (धर्मेंद्र प्रधान) असेच राहिले तर न्याय मिळणार नाही.

राहुल गांधी यांनीही टीका केली आहे. ते म्हणाले...

  • प्रश्न फक्त नीट पेपर फुटीचा नाही तर देशातील एकूण सिस्टीमचा आहे

  • तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही भारतातील परीक्षेची सिस्टीम विकत घेऊ शकतात

  • तुम्ही या सिस्टीमवर काय करत आहात?

Ravikant Tupkar Live Updates: रविकांत तुपकरांची हकालपट्टी होणार? शेतकरी स्वाभिमानी संघटना आज घेणार निर्णय

  • शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या संदर्भात आज राजू शेट्टी यांनी नेमलेली कमिटी निर्णय घेणार

  • रविकांत तुपकरांची संघटनेतून हकालपट्टी होणार की संघटनेतच ठेवणार यावर कमिटी निर्णय जाहीर करणार

  • शेतकरी स्वाभिमानी संघटनेची महत्त्वाची भूमिका

  • रविकांत तुपकर यांनी संघटने विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत कोर कमिटीचा निर्णय आज होणार जाहीर

Gaurav Gogoi Live Updates: आरएसएसच्या लोकांमुळे यूपीएससी आणि एनटीएची दुर्दशा; काँग्रेस खासदाराची टीका

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्याच्या निर्णयावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, "मला ही आरएसएस आणि भाजपमधील जुगलबंदी आहे असे वाटते. आज यूपीएससी आणि एनटीएची दुर्दशा झाली आहे कारण सरकारच्या प्रत्येक विभागात आरएसएसचे लोक प्रवेश करत आहेत.

Sangali Rain Live: चांदोली धरण परिसरात 24 तासांत 148 मी.मी पाऊस

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात २४ तासात १४८ मी.मी पाऊस पडला आहे. दरम्यान या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

टोमॅटो १२० रुपये किलोवर, पावसाच्या दणक्यामुळे भाजीपाल्याचे भाव भिडले गगनाला

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

  • मिरची ९० रुपयांवरून १४० तर टोमॅटो ७० रुपायांवरून १२० रुपये किलोवर

  • भेंडी १००, गवार १६० रुपये, बटाटा १०० रुपये आणि लसूण ३२० रुपये किलोवर

  • दीड महिन्यांपासून शंभरी पार असणारी कोथिंबीर जुडी ५० रुपये तर मेथीची जुडीही २० रुपयांनी स्वस्त झाल्यानं काही प्रमाणात दिलासा

Maharashtra Rain Live: मुसळधार पावसाने राज्याला धुतले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांना पावसाने धुतले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. तसेच काही विद्यापीठांनी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Kolhapur Rain Live: कोल्हापूरात पाणीच पाणी! शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गगनबावड्यासह एकूण ३३ मार्ग बंद आहेत.

दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द करण्यात आला आहेत.

Manoj Jarange Live: विरोधकांचं जाऊद्या, तुम्ही ओबीसीतून आरक्षण देणार का? - मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. विरोधकांचं जाऊद्या, तुम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहात का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Maharashtra Breaking News Live Updates: कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी....

कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकात प्रवाश्यांची मोठी गर्दी झाली आहे. कल्याण स्टेशनच्या पुढे ठाकुर्ली कडील सिग्नल मध्ये बिघाड झाल्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही साईडच्या लोकल उशिराने धावत आहेत...

Ajit Pawar Birthday Live: मंत्रालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवत आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर मंत्रालयासमोर लागले आहेत. 'लाडक्या बहिणींचा दादा' अशा आशयाचे बॅनर लागले आहेत.

Mumbai Rain Live Update: मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबईमध्ये रविवारपासून पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. सोमवारी देखील पावसाने उसंत दिलेली नाही. आयएमडीने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Union Budget 2024 Live: आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून संसदेचे अर्थसंकल्यीप अधिवेशन सुरु होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडणार आहे.

आज अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. नीट प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT