Maharashtra Budget 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget : 'मोदी आवास घरकुल योजना'; 3 वर्षांत 10 लाख घरं, 12 हजार कोटींची तरतूद

राज्याच्या अर्थसंकल्पात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शबरी, पारधी, आदिम आवास योजनेंतर्गत 1 लाख घरं बांधली जाणार असून 1200 कोटींची तरतूद केली आहे.

Maharashtra Budget 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात मोदी आवास घरकुल योजनेंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची तरतूद करण्यात आलीये.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत : 4 लाख घरं बांधण्यात येणार आहेत. (2.5 लाख घरं अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग) तर, रमाई आवास योजनेंतर्गत 1.5 लाख घरं बांधली जाणार (25 हजार घरं मातंग समाजासाठी) असून यासाठी 1800 कोटींची तरतूद केली आहे.

शबरी, पारधी, आदिम आवास योजनेंतर्गत 1 लाख घरं बांधली जाणार असून 1200 कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीकरिता 50 हजार घरांसाठी 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (25 हजार घरं विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी, तर धनगरांसाठी 25 हजार घरं बांधली जाणार आहेत.)

इतर मागासवर्गीयांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरं बांधली जाणार असून 12,000 कोटींची तरतूद केली आहे.

योजनेत यावर्षी 3 लाख घरं बांधणार असून यासाठी 3600 कोटी तरतूद केली आहे.

  • असंघटित कामगार, कारागिर, टॅक्सी-ऑटोचालक आणि दिव्यांगांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

  • 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहे.

  • ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

  • माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी देण्याची तरतूद केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT