Maharashtra Budget 2023 Devendra Fadnavis Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

नदी जोड प्रकल्प ते मराठवाड्यासाठी दुष्काळमुक्ती; अर्थमंत्री फडणवीसांनी केलेल्या 7 मोठ्या घोषणा

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Budget 2023 Irrigation Project

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजपा- शिवसेना युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प गुरुवारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. फडणवीसांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या असून हे प्रकल्प नेमके कोणते, त्याचा लाभ कोणत्या भागांना होईल हे जाणून घेऊया...

1.  नदी जोडप्रकल्प

उत्तर कोकणातील नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वाहून जाते.

मुंबई शहर आणि गोदावरी खोऱ्यातील ही तूट दूर करण्याकरिता नदी जोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आलीये. राज्य सरकारच्या निधीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. मराठवाड्यासह नाशिक, नगर,जळगाव जिल्ह्याला या योजनेचा लाभ होईल.  

तसेच वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांतील अवर्षण प्रवण क्षेत्राकडे वळवण्यात येईल. याबाबतच्या प्रकल्पांना मान्यता देऊन विशेष निधीची उभारणी केली जाईल.

2.  कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी ११, ६२६ कोटी रुपये

तापीतील नैसर्गिक भूमिगत विस्तीर्ण पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला तापी महापूर्नभरण प्रकल्प मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला असून याबाबत पाठपुरवठा करण्यात येणार आहे.

तसेच धाराशीव व बीड जिल्ह्यातील १३३ गावांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार असून यासाठी ११, ६२६ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची घोषणा फडणवीसांनी केली.

3. राज्यातील किती प्रकल्प यंदा पूर्ण होणार?

> राज्यातील प्रगतीपथावरील २६८ प्रकल्पांपैकी २३-२४ मध्ये ३९ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून गेल्या सहा महिन्यात २७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.  

> तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील मंजुर २७ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प पूर्ण झाली असून सन २३-२४ मध्ये आणखी ६ प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

> बळीराजा जलसंजीवनी योजनेतील मंजुर ९१ प्रकल्पांपैकी २३- २४ मध्ये २४ प्रकल्प पूर्ण करण्यात येतील.

> गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास २३-२४ मध्ये १, ५०० कोटी रुपयांचा निधी देणार. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितले.

4. कोकणातील सिंचनासाठी विशेष कृती कार्यक्रम

कोकणातील सिंचनाच्या सोयीसुविधेसाठी विशेष कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच खारभूमी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

२०२३- २४ साठी कार्यक्रम खर्चाकरिता जलसंपदा लाभक्षेत्र विकास आणि खारभूमी विकास विभागास १५, ०६६ कोटी रुपये प्रस्तावित असल्याची घोषणा त्यांनी केली.

5. मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्प केंद्राकडे मंजुरीसाठी

मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी फडणवीसांनी महत्त्वाची घोषणा केलीये.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून, बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी आणि  धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून पाणी देण्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वॉटरग्रीडचे निर्माण काम सुरू आहे.

हर घर जल योजनेअंतर्गत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवल्याचे फडणवीसांनी सांगितले.  

६. १७ लाख कुटुंबांना नळजोडणी

जल जनजीवन मिशनअंतर्गत १७ लाख ७२ हजार कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार असून  यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

७. शहरे जलशाश्वत करणार

राज्यातील सर्व शहरे जलशाश्वत करण्यासाठी सुवर्णजयंती नगरोथ्थान महाअभियानातून पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT