pink e rickshaw sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : ‘माझी लाडकी बहीण’: महिला वर्गासाठी योजनांची लयलूट

मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहेना’ या योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आज जाहीर केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने दरमहा दीड हजार रुपयांच्या मदतीपासून उच्च शिक्षणासाठी फी माफीपर्यंतच्या विविध प्रकारच्या योजनांची अक्षरश: लयलूट केली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून त्याचा फायदा राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शिवाय राज्यातील ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ ही महिला वर्गाला सुखावणाऱ्या योजनेची घोषणा आज अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.

Gas Cylinder

मध्य प्रदेशमधील ‘लाडली बहेना’ या योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आज जाहीर केली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, अशी घोषणा केली असली तरी चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यावसायिक शिक्षण घेणार्या मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क १०० टक्के माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महिलांसाठीच्या ठळक तरतुदी

  • ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’चा फायदा ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना होणार आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ही योजना केंद्र सरकारच्या उज्जवला योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे.

  • अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी ‘पिंक ई रिक्षा’ योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. या अर्थसंकल्पात या योजनेचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून १७ शहरातल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ८० कोटी निधी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

  • शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देणारे अनुदान १० हजार रुपयांवरुन २५ हजार रुपये करण्यात आले आहे.

  • महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी ‘युनिटी मॉल’ बांधण्यात येणार आहे. उलवे, नवी मुंबई येथे हा मॉल उभारला जाणार आहे. महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीतून आतापर्यंत १५ लाख महिला लखपती दीदी झाल्याचा दावा. त्यांची संख्या २५ लाखपर्यंत वाढवली जाण्यासाठी प्रयत्न करणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT