youth jobs sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : दहा लाख युवकांना कामावरच प्रशिक्षण; प्रत्येकी १० हजार विद्यावेतन

राज्यातील दहा लाख तरुण-तरुणींना दरवर्षी विद्यावेतनासह कामावरच प्रशिक्षण देण्याची योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील दहा लाख तरुण-तरुणींना दरवर्षी विद्यावेतनासह कामावरच प्रशिक्षण देण्याची योजना अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली. या योजनेत संबंधित युवकांना दर महिना १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. या योजनेसाठी सुमारे १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी युवकांसाठी विविध योजनांची घोषणा केली. मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत राज्यातील ५०० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) दर्जा वाढ तसेच मॉडेल आयटीआयसह इतर संस्थांचे बळकटीकरण केले जाणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून २ हजार ३०७ कोटींचे अर्थसाहाय्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सवलत दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सवलत दिली आहे. याचा १२ हजार जवानांना लाभ होणार आहे.

नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रक्कमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २ टक्के वरून १ टक्के करण्यात येणार आहे.तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आली आहे.

युवकांसाठी योजना

  • शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन २०२३-२४ मध्ये ९५ हजार ४७८ उमेदवारांची नोकरीसाठी निवड

  • ‘स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी’ मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित ग्रामीण भागांत ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन. १५ ते ४५ वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण

  • आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण- ५२ हजार ४०५ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त.

इतर प्रमुख तरतुदी

  • जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील १ कोटी २५ लाख ६६ हजार ९८६ घरांना नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे. तर राहिलेल्या २१ लाख ४ हजार ९३२ घरांसाठीचे काम प्रगतिपथावर आहे.

  • प्राधान्याने भर असलेल्या क्षेत्रांमध्ये (थ्रस्ट सेक्टर) अंदाजे १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५० हजार रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन

  • हरित हायड्रोजनच्या उत्पादनासाठी विकासाकांसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार २ लाख ११ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यातून ५५ हजार ९०० लोकांना रोजगार मिळणार

  • मुंबई, पुणे, नागपूर,अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,कराड, अवसरी खुर्द (जि.पुणे ) येथील तंत्र शिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार

  • शाश्वत ऊर्जा आरोग्य तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत संशोधनासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार

  • शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी १०० कोटी

  • गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय वसतिगृह स्थापन करण्यास मंजुरी

  • सिंधुदुर्ग येथे ६६ कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच

  • स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती करण्यास मान्यता

  • इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्यास मंजुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT