सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) घोषित करत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत राज्यातील १० गावांमधील शाळांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील १० गावांतील शाळांना प्रत्येकी १ कोटीचा निधीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये फुले, शाहु, आंबेडकर ते गाडगेबाबा यांच्या जन्मगावातील शाळांसाठी विशेष निधी दिला जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवाडी, ता. पुरंदर पुणे
राजर्षी शाहू महाराजांचे जन्मगाव कागल, जिल्हा कोल्हापूर
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा जि. सातारा
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव तालुका वाळवा जि. सांगली
महर्षी धोंडो केशव कर्वेंचे जन्मगाव मुरुड, जि. रत्नागिरी
साने गुरुजींचे जन्मगाव, पालघर, जि. रत्नागिरी
सावित्री फुले यांचे जन्मगाव नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा
संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव मोजरी, तिवसा, जि. अमरावती
संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव शेणगाव तालुका अंजनगाव, जि. अमरावती
क्रांतीसिह नाना पाटील यांचे मूळगाव य़ेडेमच्छिंद्री, ता. वाळवा, जि. सांगली
या गावातील शाळांना शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.