Maharashtra Budget Session 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget Session: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; भर विधानसभेत अजित पवार भडकले

विधानसभेत कामकाज सुरू होताच जित पवार यांनी पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानावरुन सरकारला सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. अवकाळी पावसाने झालेले नुकसान अशातच अद्याप पंचनामे झाले नसल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या पंचनाम्यावरुन विरोधकांची सभात्याग केली आहे. (Maharashtra Budget Session Ajit Pawar angry )

विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झालेलं नुकसान आणि कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारला सुनावलं. भर विधानसभेत अजित पवार भडकल्याचे पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी अध्यक्षांकडे आदेश काढण्याची मागणीदेखील केली.

काय म्हणाले अजित पवार?

अधिवेशन चालू असताना कुठे काही मनुष्यहानी झाली, तर स्थगन घेतला जातो आणि चर्चा करतो. शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. सात दिवस झाले तरीही कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही.

गारपीट, अवकाळी पावसाने शेतमालांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी अक्षरशः शेतकरी आडवा झालेला असताना पंचनामे करायला कुणी नाहीये. असं म्हणत अजित पवार यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.

मला सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करायचं आहे की, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, पण ज्या नैसर्गिक संकटात शेतकरी अडकलेला आहे. त्या शेतकऱ्याला माणुसकीच्या भावनेतून मदत करण्यासाठी त्या-त्या भागात तरी कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावं आणि पंचनामे करावेत.

नांदेडमध्ये तुफान गारपीट झालेली आहे. मराठवाड्यात हा आकडा वाढत चाललेला आहे. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कित्येक जनावर मृत्यूमुखी पडली आहेत. अंगावर वीज पडून विदर्भातही जीवत आणि पशुधन हानी झाली आहे.

अधिवेशन जेव्हा चालू असतं तेव्हा सर्वांचं लक्ष सभागृहाकडं असतं. इथे आपला मुद्दा उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल. हे एकमेकांशी निगडित झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कर्मचारी संपावर आहेत. दुहेरी कात्रीत महाराष्ट्र अडकलेला असताना, त्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी समंजस भूमिका दाखवायला पाहिजे.

अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

आम्ही सातत्याने सत्ताधारी आमदार काय बोलताहेत हे लक्षात आणून देतोय. एक सरकारी पक्षाचे आमदार म्हणाले, 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामची कमाई आहे. पटत का हे? संजय गायकवाड यांनी हे विधान केलं.

पाचही बोटं सारखी नसतात, हे आम्हालाही कळत, पण तुम्ही सगळ्यांना एका मोजमापात धरायला लागलात आणि ते नाउमेद झाले, तर राज्य चालणार कसं? असा संतप्त सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.

तसेच, विदर्भातील एका गावातील ग्रामस्थांनी स्वतःच शाळा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश काढले पाहिजेत, त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही," अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT