Maharashtra Budget Session Live News Updates e sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यपालांनी गुंडाळलं भाषण; अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session) आजपासून सुरुवात झाली. आजचा पहिलाच दिवस वादळी ठरला असून विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर सभागृहात राज्यपाल कोश्यारींचे (Governor Koshyari) अभिभाषण सुरू असताना गदारोळ घातला. राज्यपालांनी एक मिनिटही न बोलता भाषण गुंडाळलं आणि सभागृहातून काढता पाय घेतला. तसेच राज्यपाल राष्ट्रगीताला देखील थांबले नाहीत.

आज दिवसभरात अधिवेशनात घडलेल्या घडामोडी -

तुमचं भाषण आम्ही का ऐकायचं? - फडणवीस

सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. तुम्ही सरकारच्यावतीने भाषण करताय. पण, हे दाऊद समर्पित सरकार असताना तुमचं भाषण आम्ही का ऐकायचं? असं सदस्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, हीच मागणी सर्वांनी केली. राज्यपाल राष्ट्रगीतावेळी उभे राहिले. पण, सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी त्यांचा अपमान केला, असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला. नाना पटोले असंही म्हणू शकतात, की आम्ही दाऊदचे समर्थक आहोत. पण, आम्ही दाऊदच्या माणसांना पाठिंबा देऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न; हे दाऊद समर्पित सरकार - फडणवीस

कवडीमोल भावात जमीन घ्यायची आणि जमिनीचा ताबा मिळवून दिल्याबाबत दाऊदच्या बहिणीला पैसे द्यायचे हे काम मलिकांनी केले. मुंबई अस्थिर करण्यासाठी दाऊदला दिलेला पैसा वापरण्यात आला. आता हे प्रकरण उघडकीस आलं आहे. याचप्रकरणात मंत्री नवाब मलिकांना अटक झाली आहे. त्यांना जर सरकार समर्थन देत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे, असं आम्ही म्हणू. संजय राठोडांचा लगेच राजीनामा घेतला. पण, नवाब मलिकांना का वाचवण्यात आलं आहे. राज्यपालांचं अभिभाषण असेल किंवा सभागृह असेल प्रत्येकवेळी आम्ही मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

गोंधळातच सभागृहाचे कामकाज -

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. विधानसभेत प्रचंड गदारोळ असून यामध्येच सभागृहाचे कामकाज सुरू आहे.

बाळासाहेब ठाकरे असते, तर नवाब मलिकांची हकालपट्टी केली असती - फडणवीस

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी नवाब मलिकांना तत्काळ मंत्रिमंडळातून हाकललं असतं. हसीना पारकरसोबत झालेल्या व्यवहारात सामील असलेल्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांचा राजीनामा घ्या, असं म्हणत देवेंद्र फडणवीस सभागृहात आक्रमक झाले.

महाविकास आघाडीतील आमदारांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन -

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांनी राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्यपाल राष्ट्रगीताला न थांबता निघून गेले. त्यानंतर राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच एका आमदारानं खाली डोकं वरती पाय करत आंदोलन केलं.

महाविकास आघाडीतील आमदारांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन

विरोधकांमुळे राज्यपालांनी काढता पाय घेतला - जयंत पाटील

भारताच्या इतिहासात कधीही घडलं नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपालांनी भाषणाला सुरुवात केल्यावर भाजप आमदारांनी अर्वाच्य भाषेत घोषणा केल्या. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रगीताची वाट न बघता सभागृहातून काढता पाय घेतला, असं जयंत पाटील म्हणाले.

कोश्यारीजी परत जा, महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रस्ताव आणणार - नाना पटोले

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांना दिल्ली दरबारातून पाठिंबा आहे. कोश्यारीजी वापसा जा, असा महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रस्ताव आणला जाणार. त्याबाबत आम्ही विचार करत आहोत. भाजपने देखील त्याबाबत

राज्यपालांचा विधानभवनातून काढताय पाय -

विरोधकांच्या गदारोळामध्ये राज्यापालांनी अगदी काही मिनिटात अभिभाषण आटोपले. त्यानंतर त्यांनी अभिभाषण थांबवलं आणि विधानभवनातून काढता पाय घेतला.

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजी -

विरोधकांनी गोंधळाला सुरुवात केली आहे. राज्यपालांच्या भाषणावेळी घोषणाबाजी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने कामकाजाची सुरुवात होत असते. मात्र, त्यांच्या या भाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे.

मुख्यमंत्री विधानभवनात, अजित पवारांनी केले स्वागत -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी विधानभवन येथे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांचे विधानभवनात आगमन होताच प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

मुख्यमंत्री विधान भवनात दाखल

राज्यपाल विधानभवनात दाखल -

राज्यपाल कोश्यारी विधानभवनात दाखल झाले असून राष्ट्रगीत सुरू आहे. राज्यपालांचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांचं स्वागत केलं.

मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक -

अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालणार आहे. आज पहिल्याच दिवशी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी येणार आहेत. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन कारण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत. यापूर्वी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सुरक्षा रक्षकांसोबत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसराची पाहणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री यांच्यावर काहीदिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर ते आज प्रत्यक्ष हजेरी लावणार आहेत.

अधिवेशनात हे मुद्दे गाजणार -

राज्य सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

दाऊद कनेक्शनप्रकरणी नवाब मलिकांचा राजीनामा

किरीट सौमय्यांवरील घोटाळ्याचे आरोप

दिशा सालियानप्रकरणी राणे पिता-पुत्रांनी केलेले आरोप

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण, छत्रपती संभाजी राजेंचे उपोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT