Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024: जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

एसआयटी चौकशीसाठी आशिष शेलार विधानसभेत तर प्रवीण दरेकर विधानपरिषदेत आक्रमक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हे आदेश दिले. (Maharashtra budget sesson 2024 assembly speaker orders sit inquiry into Jarange statements)

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवी टीका केली होती. तसेच महाराष्ट्राला बेचिराख करण्यापासून वाचवलं असे शब्द वापरले होते. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूचे आमदार आक्रमक झाले. यावेळी जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

शेलार म्हणाले, "महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कोणी ठरवलं? ही केवळ धमकी आहे का? या मागची भूमिका काय? यामध्ये संशय आहे का? यात कोणी कट-कारस्थानं केली आहेत का? असे अनेक सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केले तसेच कोर्टानंही तुम्ही गांभीर्यानं घ्या. त्यामुळं शांत बसू नका, अशी विनंती शेलारांनी अध्यक्षांकडं केली आहे. जरांगेंच्या भूमिकेमुळं मराठा समाजाची बदनामी होत असल्याचंही ते म्हणाले" (Marathi Tajya Batmya)

तसेच ज्या पद्धतीची भाषा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात वापरली. यामध्ये तुला निपटून टाकू, अशी भाषा जरांगेंनी वापली. तसेच तुम्हाला शेवटची संधी देतो असं ते म्हणाले हे काय चाललं आहे? असा सवाल करत जरांगेंच्या मागून कोण बोलतंय याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी शेलार यांनी केली. (Latest Marathi News)

फडणवीसांना, भुजबळांना अशा धमक्या कोण देतंय असंही ते म्हटले. दरम्यान, दुसरीकडं विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंच्या विधानांवरुन आक्रमक झाले. त्यांनी देखील त्यांच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्याची मागणी केली.

दरम्यान, वडेट्टीवार यांच्या मागणीला दुजोरा देताना म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावरही खालच्या भाषेत बोलले पण आम्ही ऐकून घेतलं. पण जरांगेंच्या विधानांमागं कोण आहे याची खरोखरंच एसआयटी चौकशी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT