मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. (Maharashtra Cabinet Decisions bandra worli sea link will be named after swatantrya veer savarkar)
मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
काय आहेत निर्णय?
वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता
भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित.२ कोटी कार्ड्स वाटणार
आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण. (Latest Marathi News)
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
(सामाजिक न्याय्य व विशेष सहाय विभाग)
आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ.
करोडो कामगारांना लाभ मिळणार
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्हयांचा समावेश (कृषि विभाग)
मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड
भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन
पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार
बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता
राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता
बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार * दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
पाकिस्तानने पकडलेल्या मासेमाऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
पर्यटन उपविभागासाठी उप सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.