मुंबईः रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं सुरु होती.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर पुढचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मध्येच २ जुलै रोजी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या इच्छूकांना मंत्रिपदं मिळू शकली नव्हती.
आता पुढचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती येत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले. दोघांमध्ये उशिरापर्यंत खलबतं सुरु होती. 'साम टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार येत्या सोमवारी किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यासंबंधीची चर्चा उभय नेत्यांमध्ये झाली. तसेच सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ताशेरे ओढले, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु १६ किंवा १७ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात येतंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.