Maharashtra cooperative bank Froude case ed filled chargesheet
मुंबई- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात एकूण १४ जणांचा समावेश आहे. या आरोप पत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीमध्ये शिवसेना शिंदे गटातील एका नेत्याचे नाव देखील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आरोपपत्रात शरद पवार गटामध्ये असलेले प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या भावाच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांच्या नावाचाही यात समावेश करण्यात आला आहे. ईडीने याप्रकरणात प्रतिक्रिया देण्यास टाळले. कोणी आरोपी आढळल्यास पुन्हा पुरवणी आरोपपत्राद्वारे नावाचा समावेश केला जाऊ शकतो, असं ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
ईडीच्या आरोपपत्रात एकूण १४ नावांचा समावेश आहे. यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांच्या नावांचा समावेश नाही. सुभाष देशमुख, रणजीत देशमुख इत्यादी मोठी नावे यादीमध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. कारखाने कमी पैशात खरेदी करणे आणि विक्री प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे न राबवणे हा मूळ ठपका ईडीने याप्रकरणात ठेवला होता. याप्रकरणात नेमकी काय कारवाई होते पाहावं लागणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे अजित पवार हेही अडचणीत आले होते. २०१० मध्ये शिखर बँकने राम गणेश गडकरी साखर कारखाना विकला होता. साखर कारखान्याची विक्री किंमत २६ कोटी ३२ लाख रुपये, तरीही हा कारखाना अवघ्या १२ कोटी ९५ लाखांना विकण्यात आला.
या प्रकरणात अपेक्षित प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालक पदी अजित पवार होते. ऑगस्ट २०१९ मध्ये मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला.
प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजीत देशमुख, प्रसाद सागर, अलाईड अॅग्रो प्रोडक्ट, तक्षशिला सिक्युरिटीज, समीर मुळ्ये, अर्जून खोतकर यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.