महाराष्ट्र बातम्या

राज्यात कोरोनाचं तांडव ! आज महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई, 18: आज राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. आज राज्यात दिवसभरात 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात आढळले होते. त्यानंतर, आता मार्च मध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्याने राज्यातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तात्काळ लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे संकेत राज्य सरकारकडून मिळत असून स्थानिक पातळीवर कटमनेंट झोन तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. 

दरम्यान मुंबईतही आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून 2,877 नवीन रुग्ण सापडले आहेत.  गुरुवारी राज्यात 25,833  नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 23,96,340 झाली आहे.

आज 12,175  रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,75,565  करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.79 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,66,353  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात आज 58 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण 58 मृत्यूंपैकी 38 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 15 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 5 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 5 मृत्यू पुणे-2, नागपूर-1, रायगड- 1 आणि नांदेड- 1 असे आहेत.

सध्या राज्यातील मृत्यूदर 2.22 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,79,56,830 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 23,96,340 (13.35 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,13,211व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतही रेकॉर्ड ब्रेक नोंद  - 

मुंबईत दिवसभरात 2,877 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 35,2851 एवढी झाली आहे. तर आज 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आले. आतापर्यंत 11,559 मृत्यूची नोंद करण्यात आली. 

सध्यातरी लाॅकडाउनच्या सूचना नसून आजच याविषयीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत देशातील 12 ते 13 राज्यात ही वाढ होत असून केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने कशा पद्धतीने यापुढे पाऊले उचलली जाणार याची रुपरेशा सांगितली आहे. त्यानुसार, त्रिसुत्री आणि लसीकरण 4 चार धोरणांना घेऊनच यापुढे परिस्थिती हाताळावी लागणार आहे. लसीकरणाचा वेग, चाचण्या वाढवणे, केसेस शोधणे, आणि त्यांना आयसोलेशन करणे, ही महत्वपूर्ण पाऊले उचचली जाणार आहेत. स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करणे हेच महत्वाचे आहे असं मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य  सीताराम कुंटे यांनी सांगितलं. 

maharashtra corona report highest number of corona patients detected on thursday

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT