Cow Milk
Cow Milk 
महाराष्ट्र

Cow Milk Rate: दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; प्रतिलिटर 35 रुपये दर जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर ३० रुपये स्थायीभाव आणि सरकारकडून पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुधाचे नवीन दर १ जुलै पासून लागू असणार आहेत. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले. (Maharashtra Cow Milk Rate relief for milk producing farmers 35 per liter rate announced)

विखे म्हणाले, ‘‘राज्यभरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक घेऊन दूध उत्पादक शेतकरी, आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात सरकार वर्ग करेल. त्यामुळे प्रतिलिटर ३५ रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.’’

मर्यादा १५० हजार टनांसाठी

‘‘गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरची मागणी कमी झाल्याने दर घसरत आहेत. यामुळे राज्यात दूध भुकटीचा मोठा साठा शिल्लक आहे. राज्यातील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी ३० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुदानाची ही मर्यादा १५० हजार टनासाठी असेल,’’ असे विखे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Hit and Run: गर्लफ्रेंडच्या चौकशीनंतर मिहिर शहाला अटक! पोलिसांनी कसा रचला सापळा?

IND vs ZIM, 2nd T20I: अभिषेकचं शतक, तर ऋतुराजचीही तुफानी फटकेबाजी; भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकल्या विश्वविक्रमी धावा

Worli Hit And Run: आरोपी मिहीरच्या प्रेयसीची चौकशी, वडील अन् ड्रायव्हर ताब्यात... मुंबईच्या हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

Viral Video : 'अंगारो' मॅशअपवर थिरकल्या अनुपमा आणि संजना ; अनिरुद्धची इथेही लुडबूड, व्हिडीओ झाला व्हायरल !

Ashadhi Wari : काटेवाडीमध्ये तुकोबारायांच्या पालखीला मानाच्या मेंढ्यांचे पहिले रिंगण; सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी

SCROLL FOR NEXT