Maharashtra Crime Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Crime: प्रेम, संशय अन्... वसईतील आरती ते पुण्यातील दर्शना, महाराष्ट्रात तरूणींच्या निर्घृण हत्येच्या घटना का वाढल्या?

Maharashtra Crime: काही महिन्यामंध्ये महिला, तरूणीच्या निर्घृण हत्या झाल्याच्या राज्यात मोठ्या घटना घडल्या. त्यापैकी श्रध्दा वालकर, पुण्यातील दर्शना पवार, मुंबईतील मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या, वसईत रस्त्यावर झालेली भर दिवसा हत्या या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

वसईत २० वर्षांच्या तरुणीची प्रेमप्रकरणातून प्रियकराने भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. या हत्येचा सर्व थरार मोबाईल कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. व्हिडीओत हत्येचा थरार पाहताना अंगावर शहारे निर्माण होत असून आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. यामुळे गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांच्या थरारक आठवणी ताज्या झाल्या.

काही महिन्यामंध्ये महिला, तरूणीच्या निर्घृण हत्या झाल्याच्या राज्यात मोठ्या घटना घडल्या. त्यापैकी श्रध्दा वालकर, पुण्यातील दर्शना पवार, मुंबईतील मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या, वसईत रस्त्यावर झालेली भर दिवसा हत्या या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला. राज्यात रोज अनेक गुन्हे, हत्या होत असतात. मात्र या काही घटनांनी अंगावर काटा आणला. वरील सर्व घटना या आपल्या प्रेयसीचा निर्घृण हत्या केल्याच्या आहेत. या हत्या फक्त संशयावरून करण्यात आल्या होत्या. या घटाना कोणत्या होत्या, कशा घडल्या, या घटना का घडतात याला कारणीभूत कोण याबाबत सविस्तर वाचा.

श्रध्दा वालकर हत्या-

वसईतील श्रद्धा वालकर (वय २८) ही तरुणी प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीत राहत होती. मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुकडे गुरगाव येथील जंगलात फेकून दिले. १४ नोव्हेंबर रोजी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. आफताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकडय़ांपैकी १३ अवशेष दिल्ली पोलिसांना मिळाले.

मुंबईतील मीरा रोड येथील सरस्वती वैद्य हत्या -

मुंबई जवळच्या मीरा रोड परिसरात लिव्ह-इन-पार्टनरने महिलेची हत्या केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली. मनोज साने याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहांचे तुकडे केले, त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून, कुकरमध्ये शिजवून त्यांची विल्हेवाट लावली, असा त्याच्यावर आरोप आहे.

मीरा रोड लीव्ह ईन रिलेशनशीप हत्याकांड प्रकरणात सरस्वती वैद्य आणि मनोज साने या दोघांनी मंदिरात लग्न केलं होतं असं तपासातून समोर आलं. बहिणींनाही या लग्नाची माहिती होती. परंतु आरोपी मनोज सानेचं वय मुलीपेक्षा खूप जास्त असल्याने ही बाब त्यांनी सगळ्यांपासून लपवली.

पुण्यातील दर्शना पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून परिक्षेत्र वन अधिकारी (RFO) पदाची परीक्षा उत्तीर्ण होत, महाराष्ट्रात सहाव्या आलेल्या दर्शना पवारची हत्या झाल्याची घटना घडली. दर्शनाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला 21 जून 2023 रोजी रात्री उशिरा मुंबईतून अटक केली. 18 जून रोजी पुण्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ दर्शनाचा मृतदेह सापडला. राजगड्याच्या पायथ्याजवळ राहुल आणि दर्शनामध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्यानंतर राहुलने दर्शनावर धारदार शस्त्राने वार केले. "लग्न या विषयावरुन त्यांच्यामध्ये राजगडाजवळ वाद झाला. त्यांच्यात झटापट झाली. त्यानंतर त्याने कटर काढलं आणि त्याने तिच्यावर वार केले. त्यानंतर तिच्यावर दगडाने हल्ला केला, त्याच तिचा मृत्यू झाला.

नुसतीच वसईत घडलेली धक्कादायक घटना म्हणजे,

वसई शहरातील आरती यादव हत्या प्रकरण-

वसई पूर्वेकडील चिंचपाडा येथे सकाळी साडेआठच्या सुमारास संशयातून एका तरुणाने तरुणीची भररस्त्यात लोखंडी पान्हयाने डोक्यात तब्बल १६ घाव करून हत्या केली. ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असताना, आजूबाजूला प्रचंड गर्दी असतानाही त्याने पुन्हा तिच्या डोक्यात लोखंडी पान्हयाने घाव केले. चारित्र्यावर संशय असल्यानेच तिची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रियकराला अटक केली आहे. ८ जूनलाही आरतीला रोहितने मारहाण केली होती.मात्र पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.

आरती यादव आणि रोहित यादव यांच्यात तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी रोहित यादव याने वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला कामाला लावले होते. महिनाभरापूर्वी आरोपी रोहित यादवला आरती कुठे काम करते यावरून संशय आला. तिथल्या कुणाशी तरी तिचं अफेअर आहे. यावरून गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यामुळे आरतीचे रोहित यादवसोबत ब्रेकअप झाले. त्यामुळे आरोपी चांगलाच चिडला आणि त्याने आरती यादवचा खून केला. रोहित यादव हा हरियाणाचा, तर आरती उत्तर प्रदेशची रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही आधी नालासोपारा पूर्वेकडील शिर्डीनगर भागात राहत होते, मात्र नंतर आरतीचे कुटुंब दुसरीकडे स्थलांतरित झाले, वसई पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

या सर्व घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला. या घटना का घडतात, याची कारणे काय आहेत याबाबत काही तज्ज्ञ सांगतात, आजकालच्या मुलांकडे संयम खुप कमी आहे. त्यांना नकार पचवणं देखील फार जड जातं. मुलं प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत.

या घटनांबाबत बोलताना मानसिक आरोग्य अभ्यासक माधुरी आवटे म्हणाल्या, तरूण पिढीला नकार पचवण्याची सवय नाहीये. याला कारणीभूत आजची समाजव्यवस्था आणि पालक हे दोन्ही आहेत. पुर्वी आजुबाजूचे, शेजारी, किंवा शिक्षक आपल्या मुलांना काही बोलले तर पालकांची काही तक्रार नसायची मात्र, आजकालच्या पालकांना या गोष्टी आजिबात आवडत नाहीत.

पुढे माधुरी आवटे सांगतात, परवा मी एका अकॅडमीमध्ये ऐकलं, मुलं क्लास सुटल्यानंतर धावत पळत सोबत निघतात, त्यावेळी एखाद्याला धक्का लागू नये म्हणून ९ वीतील मुलांची आई त्याला घ्यायला त्याच्या जवळ जाते. म्हणजे खेळताना धक्का लागणं किंवा काय या गोष्टी होऊ नये म्हणून पालक त्यांची अति काळजी करतात.त्यामुळे आजकालची मुलं कणखर होत नाहीत. त्यांच्यात काही गोष्टी पचवण्याची किंवा संयम खूप कमी प्रमाणात दिसतो.

तर दुसरीकडे हिंसा इतकी होतीय ती सतत ऐकणं, पाहणं, सोशल मिडीयावरून सतत ते डोळ्यासमोर येत राहणं, त्यामुळं देखील मोठा फटका मुलांना बसतो. त्यांना आपण हिंसा करतोय काय वागतोय, हे समजतं नाही, त्यांच्या संवेदनशीलता बोथट होत आहेत. आजकालच्या पालकांनाच मुलांना घाबरण्याची वेळ आली आहे. मुलं पालकांना ब्लँकमेल करताना दिसतात, असंही माधुरी आवटे पुढे म्हणाल्या.

तर आजकालच्या मुलांना पोलिस, प्रशासन याचा धाक दिसत नाही असंही त्यांनी पुढं नमुद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT