महाराष्ट्र बातम्या

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: महाराष्ट्र राज्याने कोविड-19 लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार केला असून भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत आजही महाराष्ट्र राज्य लसीकरणात पहिल्या क्रमाकांवर आहे. राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लसीकरणात अव्वल असून इतर देशांच्या तुलनेत राज्यात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाले आहे. आज, 11 एप्रिलला दुपारी 12.30 च्या सुमारास राज्यात 1 कोटी 38 हजार 421 लोकांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी लसींचे डोस मिळाले आहेत. तरीही राज्याने एवढा मोठा लसीकरणाचा टप्पा गाठला असल्याचे त्यांनी सांगितले.

11 एप्रिलला सकाळी सात वाजेपर्यंत 99 लाख 23 हजार 534 एवढ्या लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, 12.30 च्या सुमारास हा आकडा एक कोटींच्या पार गेला. यापैकी 89 लाख 70 हजार 148 लोकांना पहिला डोस तर 9 लाख 53 हजार 386 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग जरी वाढत असला, तरी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे, कोरोनाचा वाढता प्रसार रोखायचा असेल, तर जास्तीच जास्त लसीकरण वाढवण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात जरी रुग्णसंख्या वाढत असली, तरी त्याच तुलनेत लसीकरणाचे काम केले जात आहे. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आतापर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले गेले.
- राज्याचे लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील

राज्यात दर दिवशी चार लाख लोकांचे लसीकरण होत आहे. हा टप्पा पुढील काही दिवसांत सहा लाखांपर्यंत न्यायचा आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता कोविड 19 लसींचा राज्यात तुटवडा भासत आहे. त्यामुळे, 10 एप्रिल या दिवशी लसीच्या तुटवड्यामुळे दिवसभरात 2 लाख 82 हजार 944 एवढेच लसीकरण केले गेले. त्यामुळे, जर जास्तीत जास्त लसीकरणाचा टप्पा गाठायचा असेल, तर राज्याला दर आठवड्याला किमान 40 लाख डोसची गरज असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

राज्य लसीकरण
महाराष्ट्र  1 कोटी 38 हजार 421
गुजरात 90 लाख 56 हजार 842
कर्नाटक 60 लाख 67 हजार 099
मध्यप्रदेश 54 लाख 65 हजार 121
केरळ 47 लाख 63 हजार 853
बिहार 44 लाख 94 हजार 404
छत्तीसगढ 41 लाख 28 हजार 448
आंध्रप्रदेश 38 लाख 06 हजार 708
हरयाणा 22 लाख 83 हजार 954
दिल्ली 20 लाख 62 हजार 711

मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने विक्रमी नोंद केली. आतापर्यंत सुमारे 1 कोटींहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT