Maharashtra Din 2024  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din 2024 : आज सन्मान समजली जाणारी पुणेरी पगडी पहिल्यांदा कशी बांधली गेली माहितीये?

डोकं झाकण्यासाठी जे वापरलं जात त्याला शीरस्त्राण म्हणत. हे व्यक्तीच्या समाजातल्या स्थानानुसार बदलत जात.

धनश्री भावसार-बगाडे

History Of Puneri Pagadi : पूर्वीच्या काळी डोके उघडे ठेवून घराबाहेर पडण्याची पद्धत नव्हती. फेटा, टोपी, मुंडासे किंवा इतर काहीतरी डोक्याला बांधल्याशिवाय कोणी घराबाहोर पडत नसे. डोकं झाकण्यासाठी जे वापरलं जात त्याला शीरस्त्राण म्हणत. हे व्यक्तीच्या समाजातल्या स्थानानुसार बदलत जात.

असाच एक खास प्रकार म्हणजे पुणेरी पगडी. या पगडीचा वापर हल्ली कोणाच्या सन्मानासाठी केला जातो. फार मानाची समजली जाते ही पगडी. पण याचा उगम झाला कसा? जाणून घ्या.

पुणेरी पगडीचा उगम

पुणेरी पगडीचा उगम पेशव्यांच्या काळात झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर आदी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत होते. आजही पुणेरी पगडीला फार मान आहे.

पुणेरी पगडी बौद्धिक मालमत्ता

पगडीची ओळख कायम राखण्यासाठी लोकांनी तिला भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्याची मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ मध्ये ती पूर्णही झाली आणि पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहिर झाली.

कशी असते ही पुणेरी पगडी

पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हणतात. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण याच चोचीवर अवलंबून असते. या चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेला असलेल्या पट्टीला घेरा म्हणतात. घेऱ्याखाली कपाळावर येणाऱ्या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हणतात. या पगडीवर केलेले जवाहिरी काम आणि जरतार यांवर त्या पगडीची किंमत ठरते.

जाणून घ्या इतिहास

महादेव गोविंद रानडे यांनी १९ व्या शतकात पुणेरी पगडी घालण्यास सुरुवात केली, असे म्हणतात. त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनी सुद्धा ही पगडी घातली. १९७३ च्या घाशीराम कोतवाल या नाटकानंतर ही पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.

पुण्याचे प्रतीक

हल्ली पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये, शाळा, महाविद्यालयांमध्ये, सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसंच देवीचा गोंधळ करतानाही पगडी वापरली जाते. पुण्याच्या कलेचे प्रतिक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात आला आहे.

पुणेरी पगडीची बांधणी

आता ही पगडी तयार मिळते. पण पूर्वी कापड घेऊन बांधली जात असे. यासाठी माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातले कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी (त्याला बत्ती कापड म्हणत) कांजीत बुडवून त्यांची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग हा या पगडीचा रंग म्हणून ओळखला जायचा.

बदल होऊनही मूळ स्वरूप कायम

  • काळानुरुप पगडीत काही बदल झाले आहेत. मागणीनुसार रंग, कापड यात फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पध्दत बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप तसेच टिकून आहे.

  • आता प्लास्टर ऑफ पॅरीसच्या साच्याऐवजी कागदी लगद्याचे साचे आले आहेत. त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी बनवली जाते. तिला आतून अस्तर लावले जाते.

  • रेशीम किंवा सॅटीनच्या पगडीला अधिक मागणी असते.

  • भगवी, जांभळी, राणी रंग, मोतिया अशा विविध रंगांत ही पगडी बनवली जाते. पण ग्राहकांचा ओढा मूळ राणी रंगाकडेच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT