Maharashtra Din : महाराष्ट्राला अप्रतिम सौंदर्य आणि निसर्गरम्य ठिकाणांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांना दूरवरून पर्यटक निसर्गरम्य नजारा बघायला येतात. महाराष्ट्रदिनी तुम्हीही महाराष्ट्रातल्या अगदी लक्षवेधी ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी अगदी बेस्ट ऑप्शन ठरेल. या ठिकाणाची धार्मिक अशी आख्यायिकासुद्धा आहे.
तर हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील भांबवली. भांबवली वजराई धबधबा हा सातारा परिसरातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याची उंची 1840 फूट (560 मीटर) एवढी आहे. हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून वाहत तीन टप्प्यांत कोसळतो. या ठिकाणाहून श्री रामदास स्वामी तीन पाऊल चढले होते म्हणून हा धबधबा तीन पावलांत कोसळतो अशी आख्यायिका आहे. उरमोडी नदी हे धबधब्याचे उगमस्थान आहे. प्रसिद्ध कास पुष्प पठारापासून 5 किलाेमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. धबधबा पाहण्यासाठी पॅगोडा व वॉच टॉवरची सुविधा आहे.
या ठिकाणाला जाताना ही विशेष काळजी घ्या
दगडावरील पृष्ठभाग अतिशय निसरडा असू शकतो. तेव्हा या ठिकाणी गेल्यास सावधगिरी बाळगा. तसेच येथील तलाव खोल आहे. तेव्हा येथे पोहणे टाळावे. पावसाळ्यात हा थबथबा पाहणे अधिक आनंददायी ठरू शकते. परंतु अतिमुसळधार पावसात येथे जाणे कटाक्षाने टाळा. तसेच सायंकाळ होण्यापूर्वी येथून परतणे योग्य ठरते. (Maharashtra Din)
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात तशी बरीच ठिकाणं आहेत. मात्र या ठिकाणाला धार्मिक महत्वसुद्धा आहे. तेव्हा तुम्ही वन डे ट्रिप प्लान करत असाल तर या ठिकाणाला भेट देणे उत्तम ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.