Maharashtra Din 2024 Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din 2024: एक गाणं ज्यानं मराठी माणसाची अस्मिता आजपर्यंत तेवत ठेवण्याचं काम केलं!

महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारसा पिढ्यानपिढ्या जपण्याचं काम हे गीत करत आहे.

वैष्णवी कारंजकर

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णपान. या राज्याच्या जडणघडणीत जे असंख्य हात लाभले, त्यांच्याप्रती अभिवादन करण्याचा हा दिवस. या राज्याच्या जडणघडणीच्या प्रवासात एक गीत सातत्याने मराठी अस्मिता तेवत ठेवण्याचं काम करत आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

हे गीत म्हणजे नुकतीच ज्याला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे, ते 'गर्जा महाराष्ट्र माझा.' या गीताचं श्रेय आहे शाहीर साबळे यांचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं शाहिरांचं योगदान मोठं आहे.अनेक गाणी, पोवाडे यांच्या माध्यमातून मराठी शक्तीचं प्रदर्शन घडवलं. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि त्याच्या स्वागतासाठी काही गाणी लिहिली गेली. त्यातलंच एक गाणं म्हणजे 'गर्जा महाराष्ट्र माझा.'

कोण आहेत शाहीर साबळे?

शाहीर साबळे यांचं पूर्ण नाव कृष्णराव गणपत साबळे. आज महाराष्ट्राचं अभिमानगीत म्हणून ओळखलं जाणारं गाणं हे राजा बढे यांचं गीत, श्रीनिवास खळे यांची चाल आणि शाहीर साबळेंचा आवाज अशा त्रिवेणी संगमातून तयार झालेलं आहे. गाण्याची आवड असलेल्या साबळेंनी काही काळ गिरणीकामही शिकवं, पण गाण्याकडे मन ओढ घेत होतं.

कलेच्या मागे लागल्याने घरच्यांनी त्यांना विरोध केला. पण तिथून पळून ते पुण्याला आले, घरगड्याची नोकरीही केली. पण योग्य संधी मिळेना. म्हणूनच ते मुंबईत आले आणि स्वदेशी मिलमध्ये कामाला लागले आणि तिथूनच कामगार रंगभूमीवर उतरण्याची संधी त्यांना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

Mohol News : मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न, पोलीसात तक्रार दाखल, दोघेजण ताब्यात

Kalyna Rural Assembly Election : तोतया पोलिसांची ग्रामीण मध्ये दहशत! कल्याण ग्रामीण मधील मनसेची शाखा बंद केली

Manipur Government : मणिपूरचे राज्य सरकार अल्पमतात? ‘एनपीपी’ने पाठिंबा काढून घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाचा दावा

SCROLL FOR NEXT