विदर्भातील जेवण हे त्याच्या झणझणीत चवीसाठी प्रसिद्ध आहे. मग सावजी मटण असो की तर्री पोहे किंवा वांग्याची झणझणीत तर्रीची भाजी एकदा खाल्ली की जीभेवर चव ही राहणारचं. विदर्भातील अमरावतीचा एक आगळा वेगळे स्ट्रीट फुड प्रसिद्ध आहे ते म्हणजे गिला वडा.
तुम्हाला वाटेल गिला वडा हा काय प्रकार आहे, आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Maharashtra Din Gila Wada Amravati local street food history)
तुम्ही कधीही अमरावतीला गेलात तर तुम्ही आवर्जून गिला वडा खावा, असे सांगितले जाते. गिलावडाची चव ही जिभेवर घोळत ठेवणारी असते त्यामुळे ती अधिक लोकप्रिय आहे पण तुम्हाला माहिती आहे का गिलावडा अमरावतीत कसा आला आणि कसा लोकप्रिय झाला? चला तर जाणून घेऊया.
गिलावडाचा इतिहास हा त्याच्या चवीप्रमाणे निराळा आहे. सध्या अमरावतीची खास ओळख असलेला गिलावडा हा मुळातच अमरावतीचा नाही. गिलावडा हा जरी अमरावतीत फेमस झाला तरी हा मुळचा बुंदेलखंडचा आहे.
१९६०च्या दशकात मोठ्या संख्येने बुंदेलखंडचे लोक अमरावतीत स्थायिक झाले. त्यावेळी बुलेंदखंडचे लोक लग्नसमारंभात कुलदैवतांना गिला वड्याचा नैवद्य द्यायचे कालांतराने हा गिला वडा लग्न समारंभातील मेन्यूमध्ये दिसू लागला. पुढे या वड्याची इतकी क्रेझ वाढली की काही लोक गिला वड्याचा व्यवसाय करू लागले आणि अमरावतीत हा गिला वडा फेमस व्हायला लागला.
गिला वडा हा जितका टेस्टी आहे तितकाच हेल्दी सुद्धा आहे. उडीद दाळीपासून बनविण्यात आलेला गिला वडा शरीरासाठी पोषक आहे. त्यामुळे अमरावतीत जाणारा प्रत्येक व्यक्ती गिला वडाची टेस्ट ही चाखतोच. कित्येकांनी या गिलावडाच्या साहाय्याने आपली आर्थिक बाजू बळकट केली आहे आणि कित्येकांना या फेमस गिलावडाच्या व्यवसायामुळे रोजगार मिळतोय.
पण तुम्हाला गिला वडा ही रेसिपी घरी बनवायची असेल तर तुम्ही बिनधास्त घरी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी
साहित्य
उडिद दाळ
मीठ
तेल
कृती
चार पाच तास उडिद दाळ पाण्यात भिजू टाका
त्यानंतर मिक्सरमधून ही दाळ बारीक करावी.
दाळीच्या मिश्रणात थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकावं.
त्यानंतर या मिश्रणाचे गरम तेलातून वडे काढावे.
त्यानंतर तळलेले वडे पाण्यामध्ये भिजवावे आणि वडे तळहातावर घेऊन दुसऱ्या हाताने प्रेस करावे.
त्यानंतर वरुन दही, चटणी, शेव, कांदा, लिंबू टाकून सर्व्ह करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.