मुंबई : दक्षिण आफ्रिकेत (south africa) आढळलेल्या कोरोनाच्या (coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडाळाची आज एक महत्त्वाची बैठक (Cabinet Meeting) होणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनबाबत (Omicron) या बैठकीत चर्चा होणार आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही? तसेच ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनवर बंदी लागणार का? यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चाईल्ड फोर्सशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याआधी 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयावर आता फेरविचार होण्याची शक्यता आहे.
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी नियम लागणार?
शाळा सुरू करण्यासोबतच परदेशी पर्यटकांच्या बाबतही चर्चा होणार होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन डिसेंबर महिन्यात परदेशी पर्यटकांवर बंदी लागण्याची शक्यता आहे. यासोबतच ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टसाठी नियम लागणार असण्याची सूत्रांची माहिती आहे. यापूर्वी कोरोनामुळे २ वर्षे लॉकडाऊन, निर्बंध लागू होते त्यामुळे विविध क्षेत्रात नुकसान झाले होते. मात्र यंदा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, टुरिझम क्षेत्रात सध्या उत्साह दिसून येत आहे. कारण या हंगामात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरायला जातात. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे
मुख्यमंत्र्यांची बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला रुग्णालयातून उपस्थिती लावणार आहेत. ते व्हिडीओ कॉन्फर्न्सिंगद्वारे या बैठकीत उपस्थित असतील. यावेळी या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट व्यतिरिक्त राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा सेवा विस्तार आणि एसटी संप यावरही या बैठकीत निर्णय होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.