Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. या ग्रामपंचायतींचा आज निकाल जाहीर झाले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले असून, भाजपच्या ताब्यात 1966 , राष्ट्रवादीच्या ताब्यात 1446 ,शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात 661, काँग्रेसच्या ताब्यात 838 , शिंदे गटाच्या ताब्यात 802 ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर काही बिनविरोध झाल्या आहे.
तर अपक्षांचा देखील बोलबाला पाहिला मिळाला आहे. अपक्षांच्या ताब्यात 1336 ग्रामपंचायती आहेत. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. आज जाहिर झालेल्या निकालात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत.
मात्र शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना जबर धक्का बसला आहे. मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संदीपान भुमरे, यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरून पुढील चित्र स्पष्ट झालं आहे.
पुढील निवडणुकांमध्ये विजयासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने राज्यात अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे.
तर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या 'शिवशक्ती-भिमशक्ती आघाडीची अकोला जिल्ह्यातील बोंदरखेड ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आली आहे. तर पुणे जिल्ह्यात अजित दादांनी चंद्रकांत पाटलांना दणका दिला आहे अजित दादांनी 221 पैकी 92 ग्रामपंचायती ताब्यात घेत सत्ता ताब्यात ठेवली आहे, भाजपला अवघ्या 38 ठिकाणी विजय मिळाला त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्यान दगडफेक देखील झाली असून यात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुक निकाला नंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या-केल्याच त्यांचेवर पराभूत झालेल्या विरोधकांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. यात धनराज श्रीराम माळी (वय ३२) यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी संशयीतांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेतले आहे.
कोणत्या पक्षाच्या किती ग्रामपंचायती
भाजप 2193
राष्ट्रवादी 1448
काँग्रेस 844
ठाकरे गट 661
शिंदे गट 803
इतर 1300
कोणत्या पक्षाचे किती सरपंच
भाजप 1773
राष्ट्रवादी 1007
काँग्रेस 657
ठाकरे गट 571
शिंदे गट 709
इतर 967
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.