Grampanchayat Election Sakal
महाराष्ट्र बातम्या

ग्रामपंचायतींचा धुराळा 13 ऑक्टोबरला उडणार; थेट जनतेतून निवडला जाणार सरपंच

येत्या 13 ऑक्टोबर रोजी 18 जिल्ह्यातील 1,166 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Grampanchayat Election Dates Declared : अखेर राज्यातील विविध ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या 13 ऑक्टोबर रोजी 18 जिल्ह्यातील 1,166 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या या कार्यक्रमानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 14 ऑक्टोबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली आहे. यंदा थेट जनतेतून संरपंच निवडला जाणार असल्याने सर्वांचेच लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

कसा आहे निवडणूक कार्यक्रम

जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 13 सप्टेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. दाखल करण्यात आलेल्याना मनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 केली जाणार असून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असणार आहे. नक्षलग्रस्त भागासाठी हा वेळ दुपारी 3 वाजेपर्यंतच असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

कुठे किती जागांसाठी होणार निवडणुका?

ठाणे - कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11, वाडा- 70. रायगड अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3, श्रीवर्धन- 1. रत्नागिरी : मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3 रत्नागिरी- 4, लांजा- 15, राजापूर- 10

सिंधुदुर्ग - दोडामार्ग- 2, देवडगड- 2, नाशिक - इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 , पेठ- 71, नंदुरबार - अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55, नवापूर- 81, पुणे - मुळशी- 1, मावळ- 1

सातारा - जावळी- 5, पाटण- 5, महाबळेश्वर- 6, कोल्हापूर - भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा-1, चंदगड - 1, अमरावती - चिखलदरा- 1, वाशीम- 1, नागपूर - रामटेक 3, भिवापूर 6, कुही - 8. वर्धा 2, आर्वी- 7

चंद्रपूर - भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30, ब्रह्मपुरी- 1, भंडारा - तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी 2 , साकोली- 1, गोंदिया - देवरी-1, गोरेगाव- 1, गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1, अर्जुनी मोर- 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT