pune rains  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Updates: राज्यभरात पावसाचा हाहाकार! मागील २४ तासांत ५ जणांचा मृत्यू, दोन बेपत्ता

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pune Rain Alert: राज्याच्या बहुतांश भागामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी दिवसभर आणि रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला तर कित्येक नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. पावसामुळे मुंबई, पुणे या शहरांची अवस्था तलावासारखी झाली आहे. मागच्या २४ तासांमध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. मृतांमध्ये पुण्यातील चौघांचा समावेश आहे तर बदलापूरच्या बारवी डॅममध्ये दोन जण वाहून गेले आहेत.

विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू

अंडा भुर्जीची गाडी सुरक्षितस्थळी हलविताना विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भिडे पुलाजवळील पुलाची वाडी परिसरात गुरुवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास घडली. हे तीन तरुण एका अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करीत होते. अभिषेक अजय घाणेकर (वय २५), आकाश विनायक माने (वय २१, दोघे रा. पुलाची वाडी, डेक्कन) आणि नेपाळी कामगार शिवा जिदबहादुर परिहार (वय १८) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर आणि परिसरात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरणही पूर्ण भरल्याने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामुळे डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळ पाण्याची पातळी वाढत होती. पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड॒स लावून नदीपात्रातील रस्ता बंद केला होता. काही पथारीधारकांनी त्यांच्या गाड्या सुरक्षितस्थळी हलविल्या, तर काही जणांनी लोखंडी साखळीने बांधून ठेवल्या होत्या. पाण्याची पातळी वाढल्याने अंडा भुर्जीची गाडी पाण्यात जाईल, या भीतीपोटी तिघे जण त्यांची गाडी सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी गेले. त्यावेळी गाडीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या तरुणालाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे ते तिघेही गंभीर जखमी झाले. पोलिस आणि स्थानिक कामगारांनी तिघांना सीपीआर देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारानंतर डॉक्टरांनी पहाटे पाचच्या सुमारास तिघांना मृत घोषित केले. ससून रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती डेक्कनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली.

ताम्हिनी घाटात एकाचा मृत्यू

मुळशी धरण भागातील घाट माथ्‍यावर सुरु जोरदार अतिवृष्‍टीसदृष्‍य पावसामुळे गुरुवार (ता.२५) पहाटे २.३० वाजण्‍याच्‍या दरम्‍यान पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर आदरवाडी (ता.मुळशी) येथे दरड कोसळल्याने रस्‍ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. यामुळे दगड माती वाहून आली, रस्‍त्‍याबरोबरच जवळच असलेले हॉटेल गाडले गेले. यात एकाचा मृत्‍यू झाला तर एक जण जखमी झाला. मुळशी धरण भागात गेल्‍या २४ तासांत विक्रमी पाऊस झाला आहे. ताम्हिणी येथे चोवीस तासांत ५५६ मिमी.पाऊस झाला आहे.

अकोला येथे बुडून एकाचा मृत्यू

अकोल्यातल्या कारंजा रमजापूर लघू प्रकल्पात बुडालेल्‍या व्‍यक्‍तीचा मृतदेह शोधकार्य पथकाला गुरुवारी (ता. २५) मिळाला. अंत्री मलकापूर येथील रहिवाशी सुरज दिलीप शेगोकार (वय ३१ वर्ष) हे गावाजवळ असलेल्‍या कारंजा रमजापूर लघु प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्‍ये पोहण्‍यासाठी गेले असता पाण्यात बुडाले. शोध व बचाव पथकास त्यांचा मृतदेह आढळला. तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफळे यांचे पथक नया अंदुरा येथील राजू डाबेराव यांचे पथक, तलाठी प्रशांत बुले, राजपूत यांनी शोधकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

SCROLL FOR NEXT