Maharashtra hsc English question paper leak 2023 aurangabad division education  sakal
महाराष्ट्र बातम्या

HSC English Paper 2023 : इंग्रजीचा पेपर फुटला; शिक्षकच बनले कॉपी बहाद्दर

सोनपेठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सोनपेठ : माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला बुधवारी पहिल्याच दिवशी सोनपेठच्या महालिंगेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना पेपरच्या कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले. त्या सहा शिक्षकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनपेठ येथील पोलीस स्टेशन मध्ये सदरील प्रकरणातील शिक्षकांना ता.२१ बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. महालिंगेश्वर विद्यालयाच्या शेजारी मुंढे कॉलनीमध्ये पंचासमक्ष पथकाने पाहणी केली असता विद्यालयाचे शिक्षक बालाजी किशनराव बूलबूले, गणेश अंकुशराव जयंतपाळ, भास्कर बापूराव तिरमले हे त्यांच्या मोबाईलवर इंग्रजीचा पेपर घेऊन मुलांना कॉपी पुरविण्याकरिता कॉपी तयार करताना मिळून आले.

त्यावरून सोनपेठचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांनी चौकशी केली असता शिक्षक रमेश मारुती शिंदे, सिद्धार्थ सावजी सोनाळे यांच्या मोबाईलवरून पेपर पाठविला असल्याचे निदर्शनास आले तसेच उपकेंद्र संचालक कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांनी पेपरच्या कॉप्या पुरविणे कामी मदत केल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान या प्रकारचे बेकायदेशीर काम तालुक्यातील किती शाळा महाविद्यालयात चालते? तसेच शिक्षकच कॉपी पुरवठा करत असतील तर तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा सर्वत्र चालू होती.

याबाबत गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.तसेच आज पोलिसांनी सर्व सहा आरोपींना सोनपेठ न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रॅकेट असल्याचा संशय

बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवठा करण्याचे शिक्षकांचे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय बळावला आहे. सोनपेठ शहरात घडलेल्या या प्रकाराबद्दल उलटसुलट चर्चा होत असून संपूर्ण परभणी जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रावरील सुरक्षेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्र प्रमुखांनी दिली फिर्याद

सोनपेठ पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत शिक्षण विभागाला व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळविले. त्यावरून गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण यांनी केंद्र संचालक लहाने यांना आदेशित केले.

त्यावरून केंद्र संचालक गोविंद लहाने यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनपेठ ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, जमादार भगवान मुंडे, भगवान पवार, दिलीप निलपत्रेवार, नारायण लटपटे, कुंडलिक वंजारे, मनोज राठोड, संजय रासवे, शिवाजी जाधव यांनी केली.

सुनील रेजितवाड - पोलीस निरीक्षक सोनपेठ

तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या व जिथे परीक्षा केंद्र आहेत तिथे पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षेदरम्यान कुठेही काहीही गैरप्रकार चालू असल्यास त्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : प्रकाश आंबेडकर, AIMIM अन् अपक्ष, महाराष्ट्रात कोणाचा खेळ बिघडणार? गणित समजून घ्या...

स्टार प्रवाहच्या नायिकेची झी मराठीवर एंट्री; 'लक्ष्मी निवास' मालिकेत देणार पाठक बाईंना टक्कर; पाहा नवा प्रोमो

Mumbai Vidhansabha Result: दक्षिण मुंबईतील कौल नक्की कोणाला? मनसेमुळे लढतीत रंगत!

Jaggery Poha Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा गोड गुळाचे पोहे, लगेच लिहा रेसिपी

AUS vs IND 1st Test: बुमराहने टॉस जिंकल्याने टीम इंडियाचा पर्थ कसोटीत विजयही पक्का? वाचा काय सांगतायेत रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT