पुणे : राज्यात रायगडसह मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला आज पावसानं चांगलंच झोपडून काढलं आहे. यानंतर रायगड, पुण्यासह इतर तीन जिल्ह्यांसाठी रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दोन जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (Maharashtra IMD issues Red alert for heavy to very heavy rainfall in Thane Raigad Pune and Palghar districts)
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या जिल्ह्यांना आज आणि उद्या रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर मुंबई आणि रत्नागिरीला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं या सर्व भागातील नागरिकांना खबरादारी घेण्याचं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, पुणे शहरातही आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं तसेच अधुनमधून पाऊस बरसत होता. पण जिल्ह्यासह घाटमाथ्यांवर दमदार पाऊस झाला. पण आज रात्रीतून आणि उद्या दिवसभर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळं पुणेकरांनी यादृष्टीनं सावधानगी बाळगणं गरजेचं आहे. (Marathi Tajya Batmya)
बुधवारी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील खालापुरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळल्यानं सुमारे ५० घरं यामध्ये गाडली गेली आहेत. यामध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १०५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
तर अद्यापही १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्यानं सध्या इथलं बचावकार्य तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.