Maharashtra Interim Budget 2024:  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Interim Budget 2024: राज्याचं आर्थिक गणित मांडणारा अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? कशी असते प्रक्रिया जाणून घ्या सोप्या भाषेत

Understanding the Budget process: महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प तयार व्हायला किती दिवस लागतात?

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Interim Budget 2024:

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आणि आज राज्याच्या आर्थिक दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. कारण, आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या सत्रात अर्थसंकल्प सादर करतील.

आजच्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्प नेमका काय प्रकार असतो? अर्थसंकल्पात काय असतं? अर्थसंकल्प का सादर केला जातो? तो बनवण्याची प्रक्रिया कशी असते, याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात.

अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नव्हे तर वर्षभरात गाठावयाची उद्दिष्टे आणि त्यासाठी उपलब्ध संसाधने यांचा तो ताळेबंद असतो. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने जमा व खर्च यांचे वस्तुनिष्ठ अंदाज तयार करणे आवश्यक असते. अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होत असला तरी तो तयार करण्याची व त्याचा आधावा घेण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु असते.

सप्टेंबर 2023 मध्ये सुरू होते प्रक्रिया

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे सप्टेंबरमध महिन्यातच सुरु झालेली असते. वर्ष 2023-2024 वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम गेल्या सप्टेंबर 2023 पासून सुरु होते.

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाने राबवायच्या प्रक्रियेचे वेळापत्रक व सूचना वित्त विभाग जारी करतो. प्रत्येक विभागांतर्गत येणारी सर्व राज्याबाहेरील, राज्यस्तरीय व क्षेत्रीय कार्यालये आपापले खर्चाचे अंदाज संबंधित विभाग प्रमुखांना सादर करतात.

मागील व चालू वर्षातील खर्चाचे कल. येत्या वर्षातील गरजा लक्षात घेऊन हे अंदाज तयार होतात. विभाग प्रमुख छाननी नंतर सदर अंदाज वित्त विभागास सादर करतात. खर्चाप्रमाणे महसूल व जमा याचीही अंदाज अशाच पद्धतीने तयार केले जातात. याशिवाय, केंद्र शासनाकडून मिळणारी अनुदाने, करातील हिस्सा आदी बाबीही लक्षात घेतल्या जातात. या अंदाजांचे महसुली व भांडवालीआणि भारित व दत्तमत असे वर्गीकरण केले जाते.

संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये जमा खर्चाचा आढावा घेतला जात असतो. जो खर्च अपेक्षित नव्हता, त्यासाठी ज्याप्रमाणे पुरवणी मागण्या केल्या जातात, त्याचप्रमाणे जेथे अंदाजित केल्याप्रमाणे खर्च होण्याची परिस्थिती नसेल, अशा ठिकाणी रकमा परत घेतल्या जातात. जेणेकरून त्यांचे पुनर्विनियोजन होऊ शकेल. आगामी वर्षाचे अंदाज तयार करण्यापूर्वी चालू वर्षाचे सुधारित अंदाजही तयार केले जातात.

अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय?

अर्थसंकल्पाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्ण अर्थसंकल्प आणि दुसरे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प. अंतरिम अर्थसंकल्प अशा सरकारद्वारे सादर केला जातो जो निवडणुकीपूर्वी त्याच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात सादर करावा लागतो.

सत्तेवर असलेल्या सरकार चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण काळ सत्ता राबविणार असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर सरकारची मुदत संपत असेल व त्यानंतर निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होणार असेल तर अस्तित्वात असलेल्या सरकारला पुढील पूर्ण वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नाही. यासाठी अंतरिम अर्थसंकल्प ही सोय करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पाला बजेट का म्हटलं जातं?

तसं पाहायला गेलं तर, 'बजेट' हा शब्द फ्रेंच शब्द Bougette पासून आलाय. याचा अर्थ आहे चामड्याची ब्रीफकेस होय. बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. भारताची सत्ता जेव्हा इस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला.

स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८चा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Nashik Vidhan Sabha Election: ओझरला रात्री साडेदहापर्यंत मतदान; सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरीच्या मतपेट्या मध्यरात्री जमा

IND vs AUS : स्टंपकडे जाणारा चेंडू लाबुशेनने रोखला, सिराज चांगलाच चिडला; कोहलीने तर बेल्सच उडवल्या..काय हा प्रकार

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

Sanjay Raut: ...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT