Devendra Fadnavis ESakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Investment : ग्रीन एनर्जी क्षेत्रात करार! 1.08 लाख रोजगार, 61.5 हजार मेगावॅट वीज, 3.40 लाख कोटींची गुंतवणूक

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य सरकारनं आज हरित ऊर्जा क्षेत्रात महत्वाचे सामंजस्य करार केले. या करारामुळं राज्यात ९० हजार रोजगार, ५६ हजार मेगावॅट वीज आणि २.९३ लाखांची गुंतवणूक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणाले, पंप स्टोरेज स्कीमच्या अर्थात पीएसपीच्या क्षेत्रामधील महत्वाच्या सामंज्यस्य करारांवर आज महाराष्ट्र सरकारनं स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये जवळपास १५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती, ८२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास १८,००० रोजगार मिळणार आहेत.

२.९३ लाख कोटींची गुंतवणूक

तीन भागात आम्ही हे करार केले आहेत. यामध्ये एकट्या पीएसपीच्या क्षेत्रात महाराष्ट्रानं ज्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यातून ५६ हजार मेगावॅट वीज यामध्ये क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी महाराष्ट्राला मिळणार आहे. यामध्ये जवळपास २ लाख ९३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तर ९० हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे.

४७ हजार कोटींची गुंतवणूक

तसंच इतरही अनेक सामंजस्य करारांवर आम्ही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये फ्लोटिंग सोलर, विंड एनर्जी, ग्रीन हायड्रोजन एनर्जी यांचा समावेश असणार आहे. यामध्ये सुमारे ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १८ हजार लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. तर सुमारे साडेपाच हजार मेगावॅट ग्रीन एनर्जी यातून उपलब्ध होणार आहे.

२०३० च्या ध्येयाकडं वाटचाल

२०३० साली महाराष्ट्रात आपण जेवढी वीज वापरु यातील ५० टक्के वीज ही क्लीन एनर्जीच्या रुपात असेल हे जे आपलं ध्येय आहे. त्याकडं या करारांद्वारे आपली वाटचार वेगानं सुरु झाली आहे. आमच्या या धोरणामुळं महाराष्ट्र या सर्वांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: 'या' दिवशी करता येणार पुणेकरांना शिवाजीनगर ते स्वारगेट भुयारी मेट्रोनं प्रवास, PM मोदींच्या हस्ते व्हर्चुअली होणार लोकार्पण

Bangladeshi Women Mumbai: कागदपत्रे तर बनावट होतीच पण... आठ बांगलादेशी महिलांना मुंबईतून अटक

Raghuram Rajan: रघुराम राजन यांनी मोदी सरकारचे केले कौतुक; म्हणाले, गेल्या 10 वर्षात...

IND vs BAN 2nd Test : कानपूर कसोटी विलंबाने सुरू होणार; BCCI ने सांगितली वेळ, तरीही घोळ होणार

Indira Ekadashi 2024: पितृ पक्षात इंदिरा एकादशी 27 की 28 सप्टेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT