mukhyamantri mazi ladki bahan yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana  esakal
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेची वयोमर्यादा वाढली, आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य सरकारनं नव्यानं जाहिर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या वयोमर्यादेत आता वाढ करण्यात आली आहे. ६० वर्षे वयावरुन आता ही मर्यादा ६५ वर्षे करण्यात आली आहे. त्यामुळं आता ६५ वयापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली. (Maharashtra Ladki Bahin Yojna age limit has been increased now women up to 65 years will get the benefit)

या योजनेची घोषणा झाल्यापासून राज्यभरात त्याला तुफान प्रतिसाद मिळाला असून लोकांच्या मागणीवरुन आता या योजनेची वयोमर्यादा वाढवण्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही आणखी एक दुरुस्ती केली. त्यात वय ६० वरुन ६५ केलं आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली"

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी कागदपत्रं काढण्याकरीता महिलांची धावपळ होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 15 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, फोटो, बैंक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रांवर सगळीकडेच मोठी गर्दी केली आहे.

पहाटेपासून सेतू केंद्रांवर महिलांच्या रांगांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. महापालिका, नगरपालिका प्रशासनानं केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी व दलाल मुक्त नोंदणी करावी अशी मागणी महिलांकडून होत आहे. यावेळी काही ठिकाणी या महिलांकडून पैसे घेण्यात आल्याचे प्रकारही घडले आहेत.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज

  • रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला

  • बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो

  • शिधापत्रिका (रेशन कार्ड), आधार कार्ड

पात्रता

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे

  • लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक

असा भरा अर्ज...

योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. ज्या महिलेला ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील. भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोचपावती दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा, नेमका कोणता आहे पॅटर्न?

Jalgaon News : नाल्यातून चेंडू काढताना सहावर्षीय बालक गेला वाहून; पोलिसांकडून शोध सुरू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

Monsoon Care Tips : पावसाळ्यात त्वचेच्या संसर्गाचे होऊ शकतात हे गंभीर आजार, वेळीच ओळखा लक्षणे

SCROLL FOR NEXT