loksabha google
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: नरेंद्र मोदींचा पुणे दौरा ते दिल्ली विधेयकावर लोकसभेत उद्या चर्चा

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा

सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयक, 2023 उद्या, 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत विचारार्थ आणि पारित होईल.

ठाणे शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी

बिहारमध्ये जात-आधारित सर्वेक्षण सुरू होणार, आदेश जारी...

बिहार सरकारच्या जात-आधारित सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका पाटणा उच्च न्यायालयाने आज फेटाळल्यानंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा जात-आधारित सर्वेक्षण सुरू होणार आहे. राज्य सरकार सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करते.

भिवंडीत धामणकर नाका परिसरातील महाकाल डाईंगला भीषण आग

भिवंडीत धामणकर नाका परिसरातील महाकाल डाईंगला भीषण आग लागली. घटना अग्निशमन दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या आहेत.

शरद पवार दिल्लीसाठी रवाना

शरद पवार आज जाताच अजित पवार देखील विमानतळावर दाखल झाले. साहेब आत आहेत का?, अशी विचारणा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या स्वीय सहायकांकडे केली.

विजय वडेट्टीवारांच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडीचे काँग्रेस नेत्यांनी राहुल नार्वेकरांना दिले पत्र

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची निवड केली आहे. काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन पत्र दिले

बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत बहु-राज्य सहकारी संस्था अधिनियम, 2002 मध्ये सुधारणा करण्यासाठी बहु-राज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केले. हे विधेयक यापूर्वी लोकसभेने मंजूर केले होते.

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडलं

दिल्लीतील अधिकाऱ्यांचा बदल्या संदर्भातील विधेयक लोकसभेत मांडलं आहे. 25 जुलैला अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली होती. हे विधेयक संविधानाचे उल्लंघन करून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान करणार असल्याचे विरोधकांनी म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिल मांडलं आहे.

शरद पवार यांनी बोलवली महाविकस आघाडीची बैठक

शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठक बोलवली आहे. पाच तारखेला मुंबईत ही बैठक होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण इतर नेते राहणार उपस्थित असणार आहेत. इंडियाच्या बैठकीबाबतही यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब थोरात विजय वड्डेटीवार विरोधी नेते पदी याचे पत्र देण्यासाठी रवाना

काँग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात विजय वड्डेटीवार विरोधी नेते पदी याचे पत्र देण्यासाठी जात आहेत. थोड्याच वेळात विधी मंडळात अध्यक्ष कार्यालयात पत्र देतील.

'आम्ही सांगत नाही तोपर्यंत मणिपूरमधील पीडित महिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करू नका', CJI यांचे CBIला निर्देश

'आम्ही सांगत नाही तोपर्यंत मणिपूरमधील पीडित महिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करू नका' असे निर्देश CJI चंद्रचूड यांनी CBIला दिले आहेत. महिलांची ओळख समोर येऊ नये यासाठी त्यांची नाव देखील वेगळी ठेवली गेली आहेत. महिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कोर्ट एक पॅनल देखील बनवू शकते. कालच्या सुनावणी वेळी कोर्टाने FIR ला उशीर झाल्यामुळं ताशेरे ओढले होते.

जंबो कोव्हिड सेंटर घोटाळाप्रकरणातील आरोपी सुजित पाटकर न्यायालयीन कोठडीत रवानगी

जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणातील आरोपी सुजित पाटकर यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. १४ दिवसांची ED कोठडी पूर्ण झाल्याने पाटकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत.

आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडेंच्या जामीन अर्जावरील निकाल पुन्हा लांबणीवर

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणातील आरोपी सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जमीन अर्जावरील निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. याबाबतची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सदानंद कदम हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. तर देशपांडे तत्कालीन प्रांताधिकारी होते.

नगर रोड बीआरटी मार्गात PMT बसचा अपघात, 30 प्रवासी जखमी

नगर रोड बीआरटी मार्गात आज सकाळी 9.30 वाजता अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी झाले आहेत.

Bus Accident

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरणी ५ जणांच्या उच्च स्तरीय कमिटीची स्थापना

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी ५ जणांची उच्च स्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेचे पी सी सिन्हा, अजोय सधन्य, नरसिन्ह आणि मध्य रेल्वेचे जे पी रावत, प्रभात आणि यांचा कमिटीत समावेश करण्यात आला आहे. या दुर्घटनेतील मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आयएसए टिकाराम यांना सरकारी नियमांनुसार मोबदला मिळणार आहे.

घडलेली घटना दुर्दैवी, समृध्दी महामार्ग दुर्घटनेबाबत अजित पवारांनी केलं ट्विट

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

INDIA आघाडीच्या बैठकीची तारीख बदलण्याची शक्यता

INDIA आघाडीच्या बैठकीची तारीख बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 26 आणि 27 ऐवजी 1 सप्टेंबरला ही बैठक होण्याची शक्यता आहे. सर्व नेत्यांच्या तारखा एकत्र येत नसल्याने बैठक लांबण्याची चर्चा सुरू आहे. पवईतील हॉटेल west end ला बैठक होण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ५ लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाखांची मदत

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. तर या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कोषातून प्रत्येकी २ लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना उपचारांसाठी ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना ठाण्यात मोठी दुर्घटना; १८ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाचं काम सुरु असताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत.

PM मोदी पुण्यात येणार असल्याने संभाजी भिडे यांचा दौरा रद्द

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी भिडे यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार दौरा रद्द झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिले आहे. औरंगाबादहून संभाजी भिडे सांगलीला रवाना झाले आहेत.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT