अजित पवार म्हणाले, मुंबईचं मराठीपण टिकवण्यात आणि मुंबईचा मानसन्मान कानाकोपऱ्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली, शिवसेनेमुळं मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, स्वाभिमान कायम राहिला. मराठी माणूस एकजूट करुन राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या हरण्याच्या भीतीने लावल्या जात नसल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
काही लोक म्हणाले, मुंबईतल्या सगळ्यात छोट्या मैदानावर सभा होत आहे
जे असं बोलले त्यांचे डोळे बहुतेक चिनी असावेत
दादा सगळ्यांना तुमचं आकर्षण आहे
दादा येणार, दादा बोलणार आणि दादा जिंकणार
जोपर्यंत महाराष्ट्रात शिवसेना मजबूत आहे, तोपर्यंत मुंबईचा लचका तोडता येणार नाही
ही भीती त्यांना होती, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं
परंतु आता शिवसेना आणखी बळकट होतेय
आज काँग्रेस, राष्ट्रवादी, मुस्लिम, दलित शिवसेनेसोबत आहेत
बोगस देशभक्तांची फौज घेऊन ते आमच्याविरुद्ध लढायला आले आहेत
मात्र ही वज्रमूठ घेऊन आम्ही आलो आहोत
सभास्थळी मागील पंधरा मिनिटांपासून जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये चर्चा सुरु आहे.
३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला असल्याचं प्रतिपादन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला
आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही
बोललं की आत टाकलं जातं
परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो
पुण्यातल्या रॅप साँगरवर कारवाई करुन अन्याय केला
तुम्ही पन्नास खोके घेतलं पण महाराष्ट्राला काय मिळालं
महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही
सध्या राज्यात असलेलं सरकार हे घटनाबाह्य असून ते कोसळणार असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वज्रमूठ सभेतून केलंय.
मुंबईतल्या बीकेसीच्या मैदानावर होत असलेल्या वज्रमुठ सभेच्या व्यासपीठावर मविआतील मंत्र्यांचं आगमन सुरु झालं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार सभास्थानी दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. सभेसाठी मुंबईमध्ये लोक दाखल झाले असून महाविकास आघाडीतील नेते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
काही वेळापूर्वी संभाजी ब्रिगेडचे संघटनाप्रमुख सचिन कांबळे खार पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मोहित कंबोज यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं.
कांबळे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा उजवा हात असणाऱ्या मोहित कंबोज यांच्यावर एफआयआर दाखल करावा, मी त्या दिवशी स्वतः तिथे उपस्थित होतो. मोहित कंबोज हे नशा करुन होते आणि तरुणी नाचत होत्या, असा दावा कांबळे यांनी केला आहे.
जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
"तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील," असं वक्तव्य अमित ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा आज मुंबईत पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
मुंबईत ई शिवनेरी बसचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी सहकार विकास पॅनलने १६, तर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीने दोन जागांवर विजय मिळवला.
लोणंद बाजार समितीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत पॅनलने १७ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. भाजप -सेना महायुतीला १ एका जागेवर समाधान मानावे लागले.
शिवसेनेचे (शिंदे गटाचे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अजित पवार यांच्याबाबतचे सुचक विधान केलं आहे.दोन दिवसात अजितदादा कुठे आहेत ते कळेल असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होत आहे. त्या मैदानावर अनेक सभा झाल्या. पण, आज सर्व पक्षांना एकत्रित आणून सभा घ्याव्या लागतात हे दुर्दैव असल्याचा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
मुंबई -गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. 8 ते 10 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर असणार आहेत. सी-६० कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. त्या जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, गडचिरोलीतील विकासकामांचा आढावाही फडणवीस घेणार आहेत
कोरोनाची लाट कमी होत असून १५ मे पर्यंत लाट संपुष्टात येणार असल्याचा दावा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. राज्यात कालपर्यंत ११०० कोरोनाचे रुग्ण होते. हा आकडा आत्ता ४६० च्या जवळ आला आहे. तरीही नागरिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे.
राज ठाकरे हुतात्मा चौकात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी हुतात्म्याना अभिवादन केलं आहे.
कोरेगाव बाजार समितीत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगाव तालुका शेतकरी विकास आघाडीचे हमाल व मापाडी मतदारसंघातील उमेदवार संजय गोरख बर्गे हे विजयी झाले आहेत. त्यांच्या रूपाने पहिला निकाल आमदार महेश शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. इतर मतमोजणी सुरू आहे
नागपुरात आपला दवाखानाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
ही संकल्पना एकनाथ शिंदे यांनी मांडली- फडणवीस
आपला दवाखानातून 30 सेवा मोफत
महाराष्ट्रात संविधानाची सर्वाधिक पायमल्ली होत असल्याचं संजय राऊत म्हणालेत. या देशात संविधान राहिलेलं नाही. राज्यात कायद्याचं राज्य मोडून काढलं जात आहे. हुकुमशाही वृत्तीमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
जम्बो कोव्ही सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव साळुंखे यांनी गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
राज्यसह देशात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवसात मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
मविआची आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे, बीकेसीत सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. , प्रमुख नेत्यांकडून सभेच्या तयारीचा आढावा, पोलिसांकडून सुरक्षेची पाहणी देखील करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये परेडमध्ये सहभागी झालेल्या होमगार्डला भोवळ आल्याने तो खाली पडला. होमगार्डला पोलिस व्हॅनमधून रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. परेड संपल्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं भाषण सुरू असतानाच होमगार्डला भोवळ आली त्यानंतर तो जमिनीवर कोसळला.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सर्व देशवासियांना विशेषत: महाराष्ट्रातील जनतेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. संतांची, शूरवीरांची, कलाकारांची आणि इतर अनेक क्षेत्रात आपली प्रतिभा आणि योगदानाची अमिट छाप सोडणाऱ्या व्यक्तीमत्वांची ही भूमी, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यासारख्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. राज्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीसोबतच, महाराष्ट्रातील जनतेला उज्ज्वल भविष्य लाभो हीच मनोकामना.
नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शिंदे- भाजप सरकारकडून राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत देणार महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. शेतकरी समृद्धीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. केवळ १ रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा निर्णय घेतला.
अवकाळी पावसामुळे राज्यासमोर अनेक आव्हान आहेत. राज्यातील शेती शाश्वत केली पाहिजे. एसटी बसच्या तिकीटामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आलीय. यावर्षी १० लाख घरं बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शेतीसाठी आपण अनेक निर्णय घेतले
महाराष्ट्र दिनानिमित्त एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे
राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह दिसून येत आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमाचं आंदोलन. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांचं मुंबईच्या हुतात्मा चौकात जनआक्रोश आंदोलन होणार आहे. आज महाविकास आघाडीची बीकेसी मैदानावर वज्रमूठ सभा आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार.
शरद पवार यांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटामुळं राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्याची शक्यता.या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.