शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांच्या संमतीनं वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. आता अंतिम सुनावणी सोमवारी 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार आहे. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे. शनिवारी व रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत जवळपास सर्वच लोकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानं खळबळ उडाली होती. पण आता या आयोगाची पुनर्रचना करण्यात आली असून नवे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील शुक्रे यांच्यावर आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक २०२३ लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर आजचं कामकाज संपल्यामुळं लोकसभा उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
नागपुरात सुरु असलेली रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली असून काही कार्यकर्त्यांवर त्यांनी लाठीचार्जही केला. या सभेत रोहित पवारांनी इशारा दिला होता की जर सभा संपल्यानंतर आमचं निवेदन घ्यायाल जर कोणी सरकारचा प्रतिनिधी आला नाहीतर आम्ही स्वतः विधानभवनाकडं जाऊ. रोहित पवारांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पुढे आले त्यामुळं त्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला.
CBSCच्या दहावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षले सुरुवात होणार आहे.
राजधानी जयपूर इथं राजस्थान भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्याच नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरु होती. पण अचानक त्यांचं नाव या शर्यतीतून मागे पडलं आणि भाजप आमदार भजनलाल शर्मा यांचं नाव पुढे आलं. त्यानंतर स्वतः वसुंधराराजे यांनीच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागानं घेतला आहे. अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली या एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये उपायुक्त अजय बन्सल, मालवणीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव यांचा समावेश असणार आहे.
पुण्यातील चांदणी चौक परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या रिक्षाला डंपरने जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षातील ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी एमआयटी ग्रुप स्कुलमधील असल्याची माहिती आहे.
परळी मतदारसंघाबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल, या जागेबाबत कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचं दुसरं सत्र सुरु झालं आहे. दीपक केसरकर यांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे.
राज्य मागसवर्गाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्यावर दबाव आणणारे दोन मंत्री कोण आहेत हे आधी बाहेर यायला हवं. त्यासाठी एसआयटी नेमा अशी मागणी त्यांनी केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वाहतूक पूर्ववत झाली आहे. ओव्हर ग्रँटी बसवण्याचं काम घ्या 43 मिनिटांमध्ये झाल्याने वेळेच्या आधीच मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
'मी मुख्यमंत्री असतो तर, तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता' असं वक्तव्य उध्दव ठाकरेंनी जुन्या पेन्शन योजनेसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनावेळी बोलताना केलं आहे. नागपूरमध्ये जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनस्थळी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत याच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
पुणे तिथे काय उणे ही म्हण अनेक वेळा खरी होताना तुम्ही पाहिली असेलच पण याचा आणखी एक अनोखा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण ठरतंय ते पुण्यातील हे अनोख्या पद्धतीने करण्यात आलेलं आंदोलन. सध्या ऑनलाईन गेमिंग जोर धरू लागली आहे आणि याचाच विरोध म्हणून पुण्यात चक्क "पत्ते खेळा" आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लोकसंघर्ष संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आलं होतं. हे ऑनलाईन गेमिंग ॲप बंद करा या मागणीसाठी अशी या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
इथेनॉल संदर्भात अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहलं आहे. इथेनॉल निर्मीतीवर बंदी आल्यास उद्योग अडचणीत येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली आहे.( Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway)
कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौरा करत आहेत. सोमवारी धाराशिव येथे जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. त्यावेळी अचानक ते खाली बसले त्यामुळे गोंधळ उडाला. सततचा प्रवास, जाहीर सभा, दौरा यामुळे थकवा आल्याने जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याचे बोलले जाते. दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी बोलताना नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं म्हटलं आहे.
प्रकृती ठिक नसली तरी, नियोजित कार्यक्रमाला जाणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे. स्वतःच्या लेकरांसाठी मराठा समाज एकत्र आला आला. एका नेत्याच्या दबावाखाली सरकार येतंय का? असा प्रश्न देखील यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. आधी चार सदस्यांनी राजीनामा दिला होता, तर आज महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. यासंबधी माहिती घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गट व शिंदे गटाच्या वकिलांमध्ये पुन्हा खडाजंगी झाल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या उत्तरावर ठाकरे गटाच्या वकिलांनी प्रश्न केला आहे. राहुल शेवाळे हे शिंदे यांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयात होते, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांने केला आहे.
आज शरद पवारांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. राज्यातील अवकाळीच्या मुद्द्यावर आज सकाळी नऊ वाजल्यापासून १०.४५ वाजेपर्यंत पुन्हा चर्चा होणार आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आज वादळी चर्चा अपेक्षित आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यात येणार असल्याने वाहतूक कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गाने पुणे दिशेला वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री दिशा सालियान(Disha Salian) मृत्यू प्रकरणी सरकारकडून SIT चौकशी केली जाणार आहे. याबाबतची माहिती दोन दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यानंतर आज (मंगळवार, १२ डिसेंबर) राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातील राजीनामा सत्र सुरुच आहे. आधी चार सदस्यांनी राजीनामा दिला होता, आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.