महाराष्ट्र बातम्या

Updates: दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग ते दिवसभरात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग; कुठे घडलीए घटना? जाणून घ्या

दरभंगा एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. त्यानुसार, 02570 क्रमांकाच्या ट्रेनच्या S1 कोचनं अचानक पेट घेतला. उत्तर प्रदेशातील सराई भोपट रेल्वे स्थानकातून जात असताना ही दुर्घटना घडली. पण सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

विराट कोहलीचं मोदी-शहांकडून अभिनंदन

सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यांमधील ४९ शतकांचा विक्रम विराट कोहलीनं आजच्या भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यात मोडला. विराटच्या नावावर आता वनडे क्रिकेटमध्ये ५० शतकं झाली आहेत. या 'विराट' कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कोहलीचं कौतुक आणि अभिनंदन केलं.

"उत्कृष्टता आणि चिकाटीचं उदाहरण म्हणजे विराट कोहली असून हे शब्द सर्वोत्तम क्रीडापटूची व्याख्या आहे. हा उल्लेखनीय टप्पा त्याच्या चिरस्थायी समर्पणाचा आणि अपवादात्मक प्रतिभेचा पुरावा आहे. मी विराटचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. विराटनं भावी पिढ्यांसाठी असेच मापदंड तयार करत राहोत” असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

"एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये 50 वं शतक झळकावण्‍याचा ऐतिहासिक टप्पा गाठल्‍याबद्दल विराट कोहलीचं अभिनंदन. ही खेळी म्हणजे विराटच्या उत्‍कृष्‍ट खिलाडूवृत्ती, समर्पण आणि सातत्‍याची साक्ष आहे. विराटनं आपला खेळ आणखी नवीन उंचीवर न्यावा. देशाला तुझा अभिमान आहे," असं ट्विट अमित शहा यांनी केलं आहे.

निवडणूक आयोगानं CM शिवराजसिंह चौहानांचा प्रचार थांबवला

काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगानं (ECI) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा निवडणूक प्रचार थांबवला आहे. मतदान क्षेत्रात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारे प्रचार केला जाऊ शकत नाही, अशी आदर्श निवडणूक आचारसंहिता सांगते. याच नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका चौहान यांच्यावर ठेवण्यात आला होता.

नक्षलग्रस्त भागात तैनात पोलिसांसोबत CM शिंदे करणार दिवाळी साजरी

गडचिरोली जिल्ह्यातील पिपली बुरगी इथं पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी नागपुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरद्वारे रवाना झाले आहे. नागपूर विमानतळावर विमानानं आगमन झाल्यानंतर लगेच ते गडचिरोलीसाठी रवाना झाले.

भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी अजित पवारांची हजेरी

मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये सध्या वर्ल्डकपमधील पहिली सेमीफायनल सुरु आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या संघांमध्ये हा सामना होत आहे. या सामन्यावर भारताची पकड मजबूत असून भारतानं ३७ षटकांमध्ये २७३ धावांचा डोंगर उभारला आहे.

सामना रंजक होणार असल्यानं याचा आनंद लुटण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आपले सहकारी प्रफुल्ल पटेल यांच्यासह हजेरी लावली. तसेच बीबीसीआयचे सचिव जय शहा आणि खजिनदार आशिष शेलार हे देखील सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत.

मोदींसाठी मेरे नाम सिनेमा बनवायला हवा- प्रियंका गांधी

प्रचार सभेदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी थेट सलमान खानसोबत त्यांची तुलना करताना सलमानच्या गाजलेल्या तेरे नाम सिनेमाचा उल्लेख केला. याच सिनेमाप्रमाणं मोदींसाठी देखील मेरे नाम नावाचा सिनेमा बनवायला हवा, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या सध्याच्या प्रचारसभांमधील भाषणांवर टीका केली.

बीड जिल्ह्यातील पालीत जरांगे पाटलांचं जंगी स्वागत; १२ जेसीबींनी केली पुष्पवृष्टी  

बीड जिल्ह्यातील धुळे सोलापूर महामार्गावर असलेल्या पाली गावात बारा जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करीत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी अंतरवाली सराटी इथून निघाल्यानंतर जरांगे यांचे अनेक ठिकाणी जंगी स्वागत केले जात आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावरील पाली गावातल्या आणि आजूबाजूच्या मराठा समाजातील नागरीकांनी हे बारा जेसीबी रस्त्याच्या कडेला उभे करून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथे होणाऱ्या सभेसाठी उशीर होत चालला आहे. सकाळी 11 वाजता वाशी येथे सभा होती मात्र अजूनही जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातच असल्यामुळे सभेला आणखी उशीर होईल अशी शक्यता आहे.

काश्मीरमध्ये दोडा जिल्ह्यात बस दरीत कोसळली; अनेक जण दगावल्याची भीती

जम्मू काश्मीर येथील दोडा येथे बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून अनेक प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रवासात अनेक जण गंभीर जखमी देखील झाले आहेत.

सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमीत्त अजित पवारांच्या भेटीसाठी काटेवाडीमध्ये दाखल

बारामती : खासदार सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमीत्त अजित पवार यांच्या भेटीसाठी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे दाखल झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी कालच भाऊबीजेनिमीत्त अजित पवार यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे जाहीर केले होतं. सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, मृणाल पवार हे काटेवाडी मध्ये पोहचले आहेत

महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखने घेतली शरद पवारांची भेट

बारामती : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी भेट घेतली. ४ दिवसांपूर्वी सिकंदर शेख याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि आज शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सिकंदरला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व आता राष्ट्रीय स्तरावरती खेळले पाहिजे असा देखील सल्ला त्याला दिला.

 वर्ध्यात आगीचं तांडव! पाच टिप्पर जळून खाक

वर्ध्यात पाच टिप्परला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आळा आहे. आगीत हे पाचही टिप्पर पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. वर्ध्याच्या सावंगी परिसरातील उड्डाण पुलाजवळील ही घटना घडली.

या घटनेनंतर वर्धा आणि देवळीचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. याठिकाणी एकूण सात टिप्पर होते त्यापैकी पाच टिप्पर जळून खाक झाले आहेत. आगीचे नेमके कारण काय आहे हे पोलीस तपासणार आहेत. पोलीस अधीक्षकांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्शन मोडवर! आजपासून राज्याचा दौरा सुरू

मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका घेणार मनोज जरांगे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जरांगे आजपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून (15 नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ते आज सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथे सभा घेणार आहेत. ही सभा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT