Breaking News  Sakal
महाराष्ट्र बातम्या

देशात अन् राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

  अमेय घोले CM शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अमेय घोले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

 काँग्रेसचे केसी वेणुगोपाल मतोश्रीवर, ठाकरेंशी महत्वपूर्ण बैठक

काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

राज्यातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

ग्रामपंचायतींमध्ये सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. दि. १७ ते २१ एप्रिलपर्यंत देशात ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा होत आहे.

सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी व कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांक मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला व्दितीय क्रमांक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.

आसाम हादरलं! गुवाहाटीजवळ ३.७ तिव्रतेचा भूकंप

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी सोमवारी दुपारी आसाममधील गुवाहाटीजवळ रिश्टर स्केलवर ३.७ तिव्रतेचा भूकंपाची नोंद झाली. भुकंपाचे केंद्र गुवाहाटीपासून २१ किमी पश्चिम उत्तरपश्चिमेला होते. हे भूकंपाचे धक्के भारतीय वेळेनुसार ४.५२ वाजता जमीनीच्या पृष्ठभागाखाली १० किमी खोल होता.

झालेला प्रकार दुर्देवी; आप्पासाहेब धर्माधीकारी यांची प्रतिक्रिया

खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्मागातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा तेरा वर पोहचला आहे. यादरम्यान झालेला प्रकार दुर्देवी असून त्याचं कोणत्याही पध्दतीने राजकारण होऊ नये. या घटनेने व्यथित झाले आहे अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधीकारी यांनी दिली आहे.

उष्मागातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा तेरा वर

खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्मागातामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचा आकडा तेरा वर पोहतला आहे. पालिका उपायुक्तांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

सीबीआय प्रकरणातही न्यायालयाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी वाढली

सीबीआय प्रकरणातही न्यायालयाने मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 1 मे पर्यंत वाढवली आहे.

मुंबई महापालिका प्रभाग संख्येसंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई महापालिका प्रभाग संख्येसंदर्भात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभागांची संख्या 227 राहणार. याचिकेत काही तथ्य नाही.मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुकरे, न्यायमूर्ती एम डब्ल्यू चंदवाणी यांच द्विसदस्यीय खंडपीठाने निर्णय दिला.

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका; मुंबई मेट्रोला ठोठावला 10 लाखांचा दंड

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडल्याप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही तुम्हाला ८४ झाडे तोडण्याची परवानगी दिली, तरी देखील मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अवमान केला असे म्हणत न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. तसेच, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई मेट्रोला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

महाराष्ट्रासह ५ राज्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढला

एवढे लोक राजकीय स्वार्थासाठी बोलवली जातात- राज ठाकरे

एवढे लोक राजकीय स्वार्थासाठी बोलवली जातात अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला त्यांची आज राज ठाकरे यांनी भेट घेतली.

उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा 12 वर पोहचला आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे MGM रुग्णालयात दाखल

राज ठाकरे MGM रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाऊन श्रीसेवकांची विचारपूस करणार आहे. 

खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल 

खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून हायकोर्टात विशेष सुनावणी होणार आहे.

अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

राज्यात दुहेरी संकट! कुठे गारपीट तर कुठे उष्णतेचा कहर, हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असताना उन्हाची तीव्रताही वाढली आहे. महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तापमान ४० अंशावर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामध्ये हिंगोली, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तापमानात जास्त वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ठाकरे गटाची बालेकिल्ल्यात डोकेदुखी वाढणार? ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव

लांजा नगरपंचायतीमधील ठाकरे गटाच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळ्ये यांच्याविरोधात आज अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.

उष्माघाताचे 11 बळी! CM शिंदे राजीनामा द्या; आपच्या नेत्यांची मागणी

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली आहे. तुम्ही आपल्या अमदारांसाठी भाजपकडून 50 खोके घेऊ शकता. पण मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला फक्त 5 लाखाची मदत दिली जाते. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे आणि आम्ही तो कदापी सहन करणार नाही. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT