महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update : राष्ट्रवादीतील नाट्यमय घडामोडी ते पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स, एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

'डी' कंपनी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घराची जप्ती

'डी' कंपनी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घराची जप्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई केली. आरोपी आरिफ अबूबकार शेख ऊर्फ आरिफ भाईजान याचे मिरा रोड येथील घर जप्त करण्यात आलेय.

UAPA अंतर्गत दहशतवादाची कमाई असल्याच्या संशयावरून जप्तीची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी आरिफ भाईजान याच्यासह शब्बीर अबुबकार शेख उर्फ शब्बीर टकला तसेच मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

''भाजपसोबत जावू शकत नाही, ठाकरे अन् काँग्रेससोबत जावं लागेल''

भाजपसोबत जावू शकत नाही उध्दव ठाकरे आणि काँग्रेस सोबत जावं लागेल, अशी भूमिका शरद पवार यांनी त्यांचे समर्थक आमदार यांच्याशी बोलताना स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे.

शरद पवार गटाच्या आमदारांची पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे.

शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक सुरु

अजित पवार गटाचे आमदार गेल्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारंची बैठक सुरु झालेली आहे. स्वतः शरद पवार यांची या बैठकीला उपस्थिती आहे.

शरद पवारांसोबतची आमदारांची बैठक संपली

शरद पवार आणि अजित पवार गटाची मागच्या तासाभरापासून सुरु असलेली बैठक संपली आहे.

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यामध्ये चर्चा सुरू

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

शरद पवारांना अजित पवारांसह सर्व आमदार येणार असल्याची माहिती नव्हती

शरद पवारांना अजित पवारांसह सर्व आमदार येणार असल्याची माहिती नव्हती. शरद पवार येण्याआधी आपण जाऊन बसावं, अशी दादांच्या गटाची खेळी होती. शरद पवार यांनी वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल होताच जितेंद्र आव्हाडांकडे चौकशी केली, मीडिया का जमले आहेत? शरद पवारांकडून आव्हाडांकडे विचारणा करण्यात आली आहे.

शरद पवार गटाचे आमदार आता पक्ष कार्यालयात जाणार

शरद पवारांच्या गटातील आमदारांची २ वाजता बैठक होती. याआधीच अजित पवार प्रफुल पटेल वाय.बी.चव्हाण सेंटरवर दाखल झाले आहेत. आता सर्व पवारांचे आमदार प्रदेश कार्यालयात जाणार आहेत. आमदारांना न भेटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुनील भुसार वाय.बी.चव्हाण सेंटरवरून प्रदेश कार्यालयात दाखल होणार आहेत.

 अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला निघाले आहेत. मुंबईतील वायबी चव्हाम सेंटर येथे ही भेट होणार आहे. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत.

अजित पवार गटाची आमदारांचा आढावा घेणारी थोडयाच वेळात बैठक

अजित पवार गटाची आमदारांचा आढावा घेणारी थोडयाच वेळात बैठक सुरू होणार आहे. बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, पक्षातील मंत्री आणि आमदार उपस्थित असणार आहेत. थोडयाच वेळात अजित पवार बैठकीसाठी उपस्थित राहतील.

मुंबई पोलिसांचे विशेष कृती दलाचे (SIT) पथक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल

मुंबई पोलिसांचे विशेष कृती दलाचे (SIT) पथक मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल झाले आहे. कागदपत्रांच्या मागणीसाठी तसेच पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करायला SIT चे पथक पालिका मुख्यलयात दाखला झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर SIT स्थापन करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या देखरेखी खाली SIT काम करतेय. कॅगच्या अहवालावर मुंबई पोलिसांनी तीन प्राथमिक चौकशा सुरू केल्या आहेत. कॅगने मुंबई महापालिकेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या खर्चात झालेली कथित अनियमितता अधोरेखित केली होती. पालिकेच्या नऊ विभागांनी केलेल्या एकूण 12000 कोटींच्या खर्चात अनियमितता असल्याचा कॅगचा अहवाल होता. रस्ते तसेच माहिती तंत्रज्ञान आणि ब्रीज विभागाने केलेल्या खर्चाची चौकशी सुरू केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला दाखल

विधानपरिषद उपसभापती निलम गोर्हे यांना पदमुक्त करण्याची मागणी घेवून विरोधी पक्षाचे सर्व आमदार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय दुपारपर्यंत होईल - नाना पटोले 

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय दुपारपर्यंत होईल. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष होतं आहे. शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावण्याचा काम भाजप करत आहे. कसिनो सुरू करण्यास आमचा विरोध आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठकीला सुरूवात

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीमध्ये प्रामुख्यानं अधिवेशन काळात मंत्र्यांकडून देण्यात येणारी आश्वासनं आणि ती पुर्ण करण्यासाठीं प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री यांच्या समन्वयाची ही बैठक आहे. बैठकीला सचिव दर्जाचे अधिकारी, सर्व मंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत.

विधान परिषदेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधान परिषदेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे. नव्या मंत्र्याच्या परिचयानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे

विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहीती 

पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. सरकारलाही शेतकऱ्यांची काळजी आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सभात्याग केला आहे. सरकार विरोधात घोषणा देत सभात्याग केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष - बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात पावसाने दडी मारली आहे. शेतकरी चिंतेत आहे. सरकारकडून अजून कुठलीही मदत करण्यात आलेली नाही. अशातच काही टोळ्या हफ्ते वसूल करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं आहे.

विधानसभा अध्यक्षांनी नाकारला स्थगन प्रस्ताव 

विधानसभा अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव  नाकारला आहे.

शरद पवार समर्थक आमदार विधानभवनात उपस्थित

जयंत पाटील

अनिल देशमुख

बाळासाहेब पाटील

सुनील भूसारा

राजेश टोपे

प्राजक्त तनपुरे

हे नेते विरोधी बाकावर बसले आहेत.

सरोज आहिरे आपल्या बाळाला घेऊन विधानभवनात दाखल 

सरोज आहिरे आपल्या बाळाला घेऊन विधानभवनात दाखल झाल्या आहेत.

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं आहे. सुरूवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला आहे.

अजित पवारांसह अन्य नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे.

'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो!' म्हणत विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसचं आंदोलन

'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो!' म्हणत विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसने आंदोलन केलं आहे.

काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात, विरोधी पक्षनेतेबाबत करणार चर्चा

काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेतेबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल

देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल झाले आहेत.

अजित पवार गट विधानसभा भवनात दाखल 

अजित पवार गट विधानसभा भवनात दाखल झाला आहे. अजित पवार गटाचे सर्व मंत्री आता विधानसभा भवनामध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवानद केले.

विरोधी पक्षनेते पदासाठी दिल्लीचं मार्गदर्शन घेत आहोत अजून नाव निश्चित नाही- बाळासाहेब थोरात

दिल्लीचं मार्गदर्शन आम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी घेत आहोत. अजून नाव निश्चित नाही. आम्ही कोणाचं नाव सुचवलं नाही. विधान परिषदेवर विरोधी पक्ष नेते पदाचा विचार केला नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला मिळणार विरोधी पक्षनेतेपद? 5 नावे चर्चेत

आज पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र विरोधकांकडून अद्यापही विरोधी पक्षनेता कोण असेल याबद्दल स्पष्टता नाहीये. यापूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेकडे होते, मात्र पक्षातील फूटीनंतर सभागृहातील सदस्यसंख्येनुसार काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगू शकते. यादरम्यान या पदासाठी काही संभाव्य नेत्यांची नावे समोर आली आहेत.विधान सभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नाव चर्चेत आहेत. या संबंधीत दिल्लीत पक्षाच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत.

अजित पवार गटातील आमदारांची बैठक सुरू 

अजित पवार गटातील आमदारांची बैठक सुरू आहे. ए-५ बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू आहे.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, सत्ताधारी विरोधक यांच्यात कोण ठरणार वरचढ

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड काळातील घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, अशा अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणाची शक्यता आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून त्याचबरोबर आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT