Mahavikas Aghadi News 
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींची माहिती, जाणून घ्या एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चगेट येथे बैठक, आमदार येण्यास सुरुवात

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईतील चर्चगेट या ठिकाणी थोड्याचं वेळात पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचे आगमन सुरु झाले आहे.

नाना पटोले घेणार सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट, १० जनपथ येथे पटोले दाखल

कॉंग्रेसचे नेते नाना पटोले थोड्याचं वेळात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. भेट घेण्यासाठी पटोले १० जनपथ येथे सोनिया गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत.

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चावर पोलीसांचा लाठीचार्ज

सोलापुरमध्ये संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी या मोर्चावर पोलीसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांची काही दिवसांपूर्वी एक ऑडियो क्लिप व्हायरलं झाली होती, ज्यात त्यांनी महात्मा फुले आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं.

विधान परिषद १ तासासाठी तहकुब 

विधान परिषद १ तासासाठी तहकुब करण्यात आली आहे.

लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित

विरोधकांच्या गोंधळामुळे आज सभागृहाचं कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयकावर आज चर्चा झाली नाही. भाजपने आपल्या सर्व खासदारांना उपस्थित राहाण्यासाठी व्हीप जारी केला होता.

भाई जगताप अन् फडणवीसांमध्ये शाब्दिक चकमक

काँग्रस आमदार भाई जगताप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. भिडेंविरोधात आक्रमक झालेल्या जगताप यांना फडणवीस म्हणाले, तुमचंही नाव भाई आहे, पण तुम्ही भाईगिरी करत नाही. यावर जगताप म्हणाले, माझं नाव भाई असलं तरी मी वैचारिक भाई आहे.

विधान परिषदेतही विरोधकांचा सभात्याग

संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या मुद्द्यावरुन विधान भवनात चांगलचं घमासान पहायला मिळालं. गृहमंत्र्यांनी याबाबत आधी विधानसभेत नंतर विधान परिषदेत निवदेन केलं. मात्र यामुळं समाधान न झालेल्या विरोधकांनी आधी विधानसभेत नंतर विधान परिषदेतून सभात्याग केला.

विधानसभेनंतर विधान परिषदेत विरोधकांकडून संभाजी भिडे यांच्या व्यक्तव्याचा मुद्दा उपस्थित

संभाजी उर्फ मनोहर भिडे विकृत माणूस आहेत. हा माणूस बेताल आहे थोर समाजसेवकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे. राज्यभरात त्याच्या विरोधात रान उठलेलं आहे. डोक्यावर स्वत: गांधी टोपी घालतात. मात्र त्यात महात्मा गांधी विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. तीन ते चार गुन्हे दाखल होऊनही अद्याप अटक होत नाही. याचा बोलवता धनी कोण हे समोर येणं गरजेचं आहे, असा सवाल विधान परिषदेत विरोधकांनी केला आहे.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा अनिल परब यांना टोला

संजय शिरसाट यांनी प्रियांका चतुर्वेदींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत अनिल परब यांचे निलम गोऱ्हे यांना पत्र मात्र निलम गोऱ्हेनी अनुमती दिलेली नाही. त्याचबरोबर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अनिल परब यांना टोला लगावला आहे. परबसाहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना गृह विभागाचं निवेदन केलं होत का? असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा अनिल परब यांना टोला

मनोरा आमदार निवास बांधकामाचा उद्या शुभारंभ, 40 मजली व 28 मजली दोन इमारती बांधण्यात येणार

उद्या मनोरा आमदार निवास बांधकाम शुभारंभ होणार आहे. 40 मजली व 28 मजली अशा दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. 1 हजार स्कवेअर फुटाचा फ्लॅट असणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये लायब्ररी, मिनी थिएटर, प्लेग्राऊड याचाही समावेश असणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, उपसभापती यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. विधान परिषदेत उपसभापती निलम गोऱ्हे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्य सरकार रायगडमध्ये १०३२ कोटींचा निधी देणार

राज्य सरकार रायगडमध्ये १०३२ कोटींचा निधी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये दरड प्रवण क्षेत्रातील भागात सरकार १०३२ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे. भू-वैज्ञानिक सर्व्हे आणि दरड कोसळण्यापूर्वी माहिती मिळवण्यासाठी याची मदत होणार आहे. आपत्ती निवारण केंद्रासाठी देखील प्रस्ताव विचारधीन आहे.

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सभागृहात खडाजंगी

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सभागृहात खडाजंगी सुरू आहे. विरोधकांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर राज्य सरकारवर देखील विरोधकांनी टीका केली आहे.

संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार - देवेंद्र फडणवीस 

संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल, यशोमती ठाकूर यांना सुरक्षा देणार असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं आहे.

जयंत पाटलांच्या 'त्या' प्रश्नावर फडणवीसांचं रोखठोक उत्तर

मनोहर भिडे महात्मा गांधी अपमान करतात. त्यांना सरकार प्रोटेक्शन देत आहे. महापुरुष अवमान करायचे आणि सरकारी संरक्षणमध्ये राहतात हे काढा असं जयंत पाटलांनी सभागृहात म्हंटलं होतं. त्यावर त्यांना प्रोटेक्शन नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर ही माहिती चुकीची असल्याचंही फडणवीस म्हणालेत.

जयंत पाटील सभागृहात भिडेंच्या प्रश्नावर आक्रमक

मनोहर भिडे महात्मा गांधी अपमान करतात. त्यांना सरकार प्रोटेक्शन देत आहे. महापुरुष अवमान करायचे आणि सरकारी संरक्षणमध्ये राहतात हे काढा असं म्हणत जयंत जयंत पाटील आक्रमक झाले आहेत.

सभागृहात अशोक चव्हाण भिडेंच्या प्रश्नावर आक्रमक

आज भिडेंवर सभागृहात प्रश्न विचारले पण उत्तर दिले जात नाही. ही खेदाची बाब आहे. चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केली आणि तेड निर्माण केली जाते. असा हा माणूस मोकाट महाराष्ट्रात फिरत आहे. हे वाईट आहे. कोणतीही कारवाई होत नाही ही खेदाची बाब आहे. अश्या माणसाला मोकाट ठेवणं हा सरकारचा विचार आहे का? तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.

समिर वानखडेंची केतन तिरोडकर विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार

NCBचे माजी अधिकारी समिर वानखडेंनी केतन तिरोडकर विरोधात अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना तिरोडकर यांनी वानखडेंवर गंभीर आरोप केले होते. कार्डिलिया क्रूझ प्रकरणात वानखडेंनी एका न्यायाधिशाला ताब्यात घेतलं होतं, त्याच्याजवळ ड्रग्ज सापडलं मात्र त्याला वानखडेंनी सोडल्याचा दावा तिरोडकर यांनी एक वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना केला होता. यावर आक्षेप घेत वानखडे यांनी तिरोडक चुकीचे व खोटे आरोप करत असल्याप्रकरणी वानखडेंनी अंबोली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली असून तिरोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वानखडेंनी केली आहे.

खंडाळा बोगद्यात ट्रेलर उलटला; 2 जण जखमी

खंडाळा बोगद्यात ट्रेलर उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

'INDIA' आघाडीने घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची आज विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भेट घेतली आहे. मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि अत्याचाराच्या मुद्द्यावर ही भेट होऊन केंद्र सरकारला या संदर्भात राष्ट्रपतींनी दिशा निर्देश द्यावे अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वंदना चव्हाण, राष्ट्रीय जनता दल नेते मनोज झा यांच्यासह 21 राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते

भिडे काहाही बोलतात, त्यांचा बोलविता धनी कोण?- अंबादास दानवे

सरकार कोणतीही कारवाई करत नाही. भिडे काहाही बोलतात. त्यांचा बोलविता धनी कोण? त्यांना या सरकारचं संरक्षण आहे. जर दुसरा कोणी बोललं असतं, कोणी विरोधक बोलला असता तर सरकारने कारवाई केली असती. सरकारला हे मान्य आहे? असा खोचक सवाल अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे.

भिडेंना अटक करण्यावरुन विरोधक आक्रमक

भिडेंना अटक करण्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. भिडेंना अटक करा नाहीतर खुर्च्या खाली करा. मनोहर भिडेंचा एकच फंडा भाजपचा छुपा अजेंडा अशा घोषणा देण्यात येत आहेत. राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्या भिडेंना अटक झाली पाहिजे म्हणत विरोधक आक्रमक झाले, गांधी टोपी घालत त्यांनी आंदोलन केलं आहे.

मुंबईत आज महत्वाच्या बैठका; आगामी निवडणुकांची रणनिती ठरणार? राजकीय वातावरण तापलं

राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राज्याच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मुंबईमध्ये आज सत्ताधारी तसेच विरोधकांच्या तीन महत्वाच्या बैठका होणार आहेत. महाविकास आघाडीसोबतच महायुतीचीही आज महत्वाची बैठक मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका, विधानसभा निवडणूकांसंदर्भात यामध्ये च होण्याची शक्यता आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्ताराबाबतही या बैठकीत चर्चा होवू शकते.

मणिपूर प्रकरणी संजय राऊत राष्ट्रपतींची भेट घेणार

मणिपूर प्रकरणी संजय राऊत राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूर प्रकरणावर देशभरातुन संताप व्यक्त केला जात आहे.

अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला

अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवारांच्या दालनात अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी,शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित असणार आहेत.

पुण्यातील हिंजवडी परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

पावसामुळे पुण्यातील हिंजवडीमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आयटीपार्क असून ही सर्वच यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

आज महायुतीच्या आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची बैठक आज मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे, आगामी काळातील निवडणुकीची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीने महायुतीच्या आमदारांची ही महत्वाची बैठक होत आहे.

80 फुट विहिर खचली, चौघे ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी इथं विहिर खचून मोठी दुर्घटना घडली आहे. काम चालू असताना विहिरीची रिंग आणि मातीचा  ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. या अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT