महाराष्ट्र बातम्या

औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. ६,९९२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. विजयानंतर काळे यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या.

अखेर सत्यजीत तांबे यांनी उधळला विजयाचा गुलाल

नाशिक पदवीधर मतदार संघातून अखेर सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. पहिल्याच फेरीपासून आघाडीवर असलेल्या तांबे यांनी महाविकास आघाडीनं पाठींबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. यामध्ये पाचव्या फेरी अखेर सत्यजीत तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मतं मिळाली.

सत्यजीत तांबे विजयाच्या उंबरठ्यावर

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये सत्यजीत तांबेंना 60161 मतं पडलेली आहेत. तर शुभांगी भास्कर पाटील यांनी 33776 मतं मिळवली.

चौथ्या फेरीमध्ये इतर उमेदवारांची मतं

️ रतन कचरु बनसोडे :2297

️ सुरेश भिमराव पवार :649

️ अनिल शांताराम तेजा :83

️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :223

️ अविनाश महादू माळी :1524

️ इरफान मो इसहाक :68

ईश्वर उखा पाटील :192

बाळासाहेब रामनाथ घोरपडे :617

ॲड. जुबेर नासिर शेख :326

ॲड.सुभाष राजाराम जंगले :240

नितीन नारायण सरोदे :223

पोपट सिताराम बनकर :75

सुभाष निवृत्ती चिंधे :142

संजय एकनाथ माळी :164

वैध मते :100760

अवैध मते :11240

एकूण :112000

नाशिकमध्ये सत्यजित तांबे VS शुभांगी पाटील यांच्यात चुरस; तांबेची निर्णायक आघाडी

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ

नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये हा गोंधळ उडाला होता. तर आता दुसऱ्यांदा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे मोबाईल आढळून आला त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

सत्यजित तांबे आघाडीवर; मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांची आघाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीतही सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. आघाडीवर असल्याचे कळताच मतदान केंद्र बाहेर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू केला. सत्यजित तांब्यांच्या समर्थनात युवा कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी केली.

कोल्हापुरच्या जिल्हा बँकेचे 5 अधिकारी ईडीच्या ताब्यात 

कोल्हापुरच्या जिल्हा बँकेचे 5 अधिकारी ईडीने ताब्यात घेतले आहे. कालपासून हा विषय चर्चेत आला असून काल ईडीने या बँकेची झाडाझडती घेत चौकशी केली होती.

नागपूरमध्ये भाजपला धक्का; मविआचे सुधाकर आडबाले यांचा विजय 

नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले हे सुरवातीपासून विजयाच्या दिशेने घोडदौड करत होते. आडबोले यांना 16 हजार 500 मते पडली आहेत. ते 10 हजार 134 मतांनी जिंकले आहेत. तर भाजपच्या ना. गो. गाणार यांना 6 हजार 366 हजार मते मिळाली आहेत. गाणार यांचा मोठ्या संख्येने पराभव झाला आहे.

नागपुरात फडणवीस यांना धक्का; भाजपचे नागो गाणार पिछाडीवर

नागपुरात फडणवीस यांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नागो गाणार यांचा पराभव होताना दिसून येत आहेत. सुधाकर आडबोले यांना १४ हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. गाणार यांना केवळ ६ हजार ३०० मते मिळाली आहेत. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर; पहिल्या फेरीतील मतमोजणी सुरू

नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगतापांच्या पत्नी मैदानात, उमेदवारी अर्ज घेतला

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतला असून या निडणुकीत आता मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर

नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. निकाल आघाडीच्या बाजूने गेल्यास राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. पहिल्या कलामुळं आघाडीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नागपूर निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी आघाडी घेतल्यानंतर समर्थकांचा जल्लोष पहायला मिळतोय.

अमरावती पदवीधर मतमोजणी : महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडेंनी घेतली आघाडी

अमरावती विभाग पदवीधर मतमोजणी : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असून विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील सध्या पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांची मतमोजणी केली जात आहे. तीन वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

संत-सनातनी एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही - धीरेंद्र शास्त्री

प्रयागराज : बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) आज (गुरुवार) सकाळी प्रयागराज इथं दाखल झाले आहेत. इथं सकाळी त्यांनी संगम स्नान केलं. यानंतर त्यांनी खाकचौक व्यवस्था समितीचे सरचिटणीस महामंडलेश्वर संतोष दास यांची भेट घेतली. संत आणि सनातनी (Sanatan) एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हिंदू राष्ट्र होऊन सनातन धर्माची महिमा वाढेल, असं ते म्हणाले. यावर संतोष दास यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. आचार्य धीरेंद्र यांचं कार्य धर्म आणि राष्ट्रहिताचं आहे. प्रत्येक सनातनींनी संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

कोकण.. शिंदे - फडणवीसांचेच...उदय सामंतांचे ट्विट

कोकण बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे पुढच्या निवडणुकीची नांदी आहे. अशा आशयाचे ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले आघाडीवर

नागपूर शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत १७०० पेक्षा मतं अवैध होण्याची शक्यता आहे. २८ टेबलवरील अवैध मतं मोजण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले साधारण तीन हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. आता महाविकास आघाडीचे आडबाले सात हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. आडबाले यांना आतापर्यंत ८० टक्के टेबलवर १३००० मतं मिळाली आहेत.

आतापर्यंत 28 हजार मतांची मोजणी

यापैकी 1 हजार मतदान अवैध

उमेदवार

सुधाकर अडबले - १४५०० ते १५०००

राजेंद्र झाडे - ४५०० ते ५०००

नागोराव गाणार - ४००० ते ५०००

कोकणात शेकापला मोठा धक्का; भाजपने मारली बाजी

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. शेकापच्या बाळाराम पाटलांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे २० हजार ६६८ मतांनी विजय मिळवला.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

मतदानाची अंतिम आकडेवारी

ज्ञानेश्वर म्हात्रे - 20683 (विजयी उमेदवार भाजप)

बाळाराम पाटील - 10997 (महाविकास आघाडी)

धनाजी पाटील - 1490

उस्मान रोहेकर -75

तुषार भालेराव - 90

रमेश देवरुखकर - 36

राजेश सोनावणे - 63

संतोष डामसे - 16

नोटा आणि बाद - 1619

एकूण मतदान- 35069

मोजली गेलेली मते - 33450

भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ६ हजार मतांनी पुढे

कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ६ हजार मतांनी पुढे आहेत. त्यांना आत्ता पर्यंत २० हजार ८०० मत मिळाली आहेत.

थोड्याच वेळात शिंदे गटाच्या बैठकीला सुरुवात

थोड्याच वेळात शिंदे गटाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात ही बैठक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत गजानन किर्तीकर प्रतापराव जाधव रामदास कदम भावना गवळी आणि गुलाबराव पाटील , शंभूराज देसाई हे मुख्य मार्गदर्शक आहेत.

कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे दोन हजार मतांनी आघाडीवर

कोकण शिक्षक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध बाळाराम पाटील यांच्यात लढत रंगली आहे.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघात कोण मारणार बाजी?

अमरावतीत टपाल मतमोजणी पत्र पुर्ण. यामधील १९२ मत वैध तर ७३ अवैध. स्वयंघोषणा पत्र न लावल्याने ७३ मद

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्प

मुंबई - गोला महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. परशुराम घाटात दरड कोसळी आहे. दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

मी जिंकणार, शुभांगी पाटलांनी केला विश्वास व्यक्त

विजय फार दूर नाही. फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान १ लाख २९ हजार ४५६ इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटा आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे .

कॉंग्रेसने युवा नेता गमावला

आज नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे युवा नेते मानस पगार यांचे अपघातात निधन झाले आहे.

शिवाजी विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा रद्द

कोल्हापूल येथील शिवाजी विद्यापीठातील आजच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीस सुरुवात झाली आहे, सत्यजीत तांबे, शुभांगी पाटील यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंदिस्त झाले आहे. 2 लाख 62 हजार 678 पैकी 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी हक्क बजावला आहेत. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आलं असून अडीचशेहुन अधिक पोलीसांचा बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीला परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतप्त झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल आहे. सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात रखडला; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2023 मध्ये पूर्णत्वास येणार होता. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला असा थेट आरोप रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.

जम्मूमध्ये  तीन मजली इमारत कोसळली.

जम्मूमधील नरवाल यार्ड ट्रान्सपोर्ट नगर भागात तीन मजली इमारत कोसळली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बचाव कार्य सुरु झाले आहे.

पावसामुळे तामिळनाडुतील शाळा- कॉलेजला एक दिवसाची सुट्टी

सततच्या पावसामुळे नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक दिवस सुट्टी जाहीर

उपराष्ट्रपती आणि केंद्रीय कायदा मंत्र्यांविरोधात हायकोर्टात याचिका

सर्वोच्च न्यायालयासह राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवून सार्वजनिक ठिकाणी टिपण्णी करणारे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांना घटनात्मकपदावर राहण्यापासून मज्जाव करा, असे आदेश देण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल आज

नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष वेधले आहे. नाशिकचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी होणार की मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील? याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार.

कसबापेठ पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक

अजित पवारांच्या उपस्थितीत आज पुन्हा कसबापेठ पोटनिवडणूकीसाठी बैठक होणार आहे. कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादीकडून 10 उमेदवार इच्छुक आहेत. आज सकाळी 11 वाजता बारामती होस्टेलला बैठक होणार आहे.

राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एफपीओ रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय. गुंतवणुकदारांचे पैसे परत करणार. पुण्यातील कसबापेठ पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक आहे. तसेच, कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात शिंदे गटाचीही बैठक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

'PM मोदी उठता-बसता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि उद्धव ठाकरेंच्याच पाठीत खंजीर खुपसतात'; प्रियांका गांधींचा हल्ला

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Panchang 17 November: आजच्या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे

SCROLL FOR NEXT