sanjay raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics Updates: अजित पवारांचा शपथविधी ते शरद पवारांची पत्रकार परिषद, दिवसभर काय घडलं?

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

मोदींनी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनी आज शपथ घेतली - राऊत

"भाजप विरोधी पक्षांना तोडत आहे, ते सरकार बनवत आहेत आणि मोडत आहेत... पंतप्रधान मोदींनी ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनी आज शपथ घेतली याचा अर्थ एकतर ते दावे चुकीचे होते किंवा ते त्यांच्या पक्षात गेल्यावर भाजप भ्रष्टाचारासारखे होते. ." - उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

लढणं आणि जिंकणं हे तर रक्तातच...; अजित पवारांच्या बंडावर रोहित पवारांचे ट्वीट

वाट आहे संघर्षाची... म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा... मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच... - रोहित पवार

'मी साहेबांबरोबर...', जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया  

अजित पवारांच्या बंडानंतर आता जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी साहेबांबरोबर असल्याचे म्हंटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती

जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गेलेले काही आमदार पुन्हा परत येतील – शरद पवार

काही आमदार नाराज आहेत ते पुन्हा परत येतील. आमची भूमिका वेगळी आहे असे काही आमदार म्हणाले. ते येत्या दोन दिवसात येऊन भेटणार आहेत. आजच्या शपथविधीवरून पक्षात नाराजी आहे. जे पक्ष चौकटीबाहेर जातील आणि बाहेर गेले. त्या प्रत्येकाबाबत निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

'मी खंबीर आहे, सर्व नव्याने उभं करू’, शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रातील या मोठ्या घडामोडीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे शरद पवार यांची प्रतिक्रिया मांडली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही”, असं संजय राऊत यांनी ट्विटरवर सांगितलं आहे.

अजित पवारांनी घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजित पवार राजभवनाकडे रवाना

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या बैठकीवर शरद पवार म्हणाले,'या बैठकीबाबत मला..'

आज अजित पवार यांच्या निवासस्थानी महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान व्हावं असं अनेक नेत्यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके आदि नेते उपस्थित होते.

तर या बैठकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बोलताना म्हणाले की, अजित पवार याच्या या बैठकीबाबत मला माहिती नाही. तर या बैठकीला जयंत पाटील हजार होते की नाही तेही मला माहीत नाही. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे ते बैठका घेत असतात. तर 6 जुलै रोजी बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबतचा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणालेत.

तर 6 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीत चर्चा होईल, निर्णय घेण्यात येईल. अजित पवार यांच्या बैठकीतील तपशील माझ्यापर्यंत आलेला नाही असंही शरद पवार म्हणाले आहेत.

अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे राष्ट्रवादी आमदारांची मागणी

अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी आमदारांनी केली आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा यासाठी आमदारांची भूमिका आग्रही आहे. अजित पवार यांच्या बैठकीत आमदारांचा एकच सुर अजित पवार प्रदेशाध्यक्ष व्हावे,

प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवारांचं दबाव तंत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवारांचं दबाव तंत्र वापरत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवारांचं दबाव तंत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे करणार लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा सत्कार

उद्धव ठाकरे आज लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांचा सत्कार करणार आहेत. आज दुपारी १२.३० वाजता हे दोघे ही जण मातोश्री वर जाणार आहेत. पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्यातून त्या तरुणीला वाचविणारे या दोघांचा सत्कार करण्यात येणार आहे

बुलढाणा समृद्धी महामार्गावरील अपघातातील २५ मृतावर सामूहिक अंत्यसंस्कार

बुलढाणा समृद्धी महामार्गावरील अपघातातील २५ मृतावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. या अपघातातील मुस्लिम महिलेची ओळख पटली आहे. त्या महिलेवर मुस्लिम धर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर बाकी २४ जणांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरवात 

मालेगावात हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरवात झाली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुलढाणा येथील अपघातातील मुस्लिम महिलेची ओळख पटली 

बुलढाणा येथील अपघातातील मुस्लिम महिलेची ओळख पटली आहे. त्या महिलेवर मुस्लिम धर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीत प्रदेाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींची शक्यता

अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल आणि काही खासदार आमदार देखील बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार यांनी पक्षात जबाबदारी द्या अशी मागणी केल्यानंतर महत्वाची बैठक सुरू आहे.

मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईत आज पहाटे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन जणांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

"माझं शासकीय निवासस्थान मुंबईत पण ते दिल्लीतही असावं" - उदय सामंत

'माझं शासकीय निवासस्थान मुंबईत पण ते दिल्लीतही असावं', असं उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. तर लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक, उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा यामुळे सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष अजित पवारांची भेट घेणार

राष्ट्रवादीतील आमदार अजितदादांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीतील काही आमदार आणि जिल्हाध्यक्ष अजित पवारांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजूनही निर्णय न झाल्याने भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सूतोवाच करून देखील अद्याप निर्णय नाही. अजित पवार यांच्या शासकीय बंगल्यावर छोटेखानी खासगी कार्यक्रम देखील आहे.

मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरु

कालपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून पुन्हा हजेरी लावली आहे.

पुणे, मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला, 2 जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यासह देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यातील काही भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला तरी पाऊस नसल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. 

दरम्यान, पुणे मुंबईसह उपनगर, ठाणे, तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. परिसरातील नारिकांना खबरदारीचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे

बातमी सविस्तर - Rain Update : पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी; 2 जिल्ह्यांत हवामान विभागाकडून अलर्ट

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT