महाराष्ट्र बातम्या

Marathi News Updates : मणिपूर हिंसाचार, पाऊस अन् दिवसभरातील राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांना Advance शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. मात्र पुढील दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या ऍडव्हान्स मध्येच शुभेच्छा देऊ केल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि शिवसेना भाजपचे आमदार उपस्थित होते.

इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा २२वर

इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा वाढला असून तो २२ पर्यंत पोहोचला आहे. १०७ जण अजूनही बेपत्ता आहेत. अजून शोध मोहीम सुरु आहे.

मुंबई लोकलः हार्बर लाईन ठप्प तर मध्य रेल्वे उशिराने सुरु

मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन पुन्हा एकदा पावसामुळे प्रभावित झाली आहे. वडाळा ते मानखुर्द दरम्यान पटरीवर पाणी साचल्याने हार्बर लाइन ठप्प झाली . कुर्ला स्टेशनच्या ट्रॅक वर पाणी भरल्यामुळे लोकलचा वेग कसा मंदावला आहे.

मुंबईतील पश्चिम द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी

मुंबईतील पश्चिम द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी. बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर कोंडी झालेली असून वाहनांच्या लांबच लांग रांगा दिसून येत आहेत.

उद्धव ठाकरेंचा उद्याचा मेळावा रद्द

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यात उद्या संध्याकाळी होणारा ठाकरे गटाचा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे. पाऊस आणि इर्शाळगड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळावा रद्द करण्याच आल्याची माहिती मिळतेय.

कल्याणला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, पाणी पुरवठा बंद राहणार

कल्याण पश्चिम मोहिली पंपिंग हाऊस वरून येणाऱ्या जलवाहिनीचा एअर वॉल तुटल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे. शहाड परिसरात नदीपात्रातील अकराशे मिमी व्यासाच्या वॉल तुटल्याने दहा फूट उंचीचे कारंजे उडत आहेत.

नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने व्हॉल्वची दुरुस्ती करताना पालिकेला अडचण येत असून मोहिली पंपिंग हाऊस वरून पाणीपुरवठा बंद दुरुस्ती होईपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

चित्र विदारक होतं, माणुसकीचं दर्शन घडलं- मुख्यमंत्री

१७ ते १८ घरांवर दरड कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला. विदारक परिस्थिती होती परंतु माणसुकीचं दर्शन इर्शाळवाडीत झालं. आता सर्वांची व्यवस्था शासन करत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस!  रेल्वे वाहतूक सेवेला मोठा फटका 

मुंबई मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे याचा परिणाम रस्ते वाहतुकी सोबतच रेल्वे वाहतूक सेवेला देखील बसला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादान उडवली आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे.

पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्य मानता कमी झाल्यामुळे लोकल चालवताना लोको पायलट ना काहीशा अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिट उशिराने सुरू आहे यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी 77 दिवस शांत होते - प्रियांका गांधी

ग्वाल्हेर, मध्य प्रदेश: "मणिपूर 2 महिने जळत होते, घरे जाळली जात होती, महिलांवर अत्याचार होत होते, लहान मुलांच्या डोक्यावर छप्पर नव्हते आणि पंतप्रधान मोदींनी 77 दिवस कोणतेही वक्तव्य केले नाही. एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते काल बोलले. त्या वक्तव्यातही त्यांनी राजकारण केले," असे प्रियांका गांधी यांनी आपल्या विधानात म्हटले आहे.

अंधेरी सबवे साचलपाणी, सबवे वाहतुकीसाठी बंद

हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील एक तासापासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवे. हा देखील पाण्याने संपूर्ण भरलेला असून साधारणपणे चार ते पाच फूट इतके पाणी साचल्यामुळे वाहतूक पोलिसांनी सेवेतून ये-जा करण्यासाठी वाहनचालक आणि नागरिकांना बंदी केली आहे.

त्यामुळे आता अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत

सरकारने मणिपूर प्रकरणावर चर्चा करावी - मल्लिकार्जुन खर्गे

"मी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता पण मला संधी दिली गेली नाही. सरकारने मणिपूर विषयावर चर्चा करावी आणि आम्ही पंतप्रधान मोदींना निवेदन जारी करण्याची मागणी करतो... पंतप्रधान मोदींनी एक विधान केले. सभागृहाबाहेर विधान, तर त्यांनी सभागृहात तसे करायला हवे होते", - मणिपूर व्हायरल व्हिडिओवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याचे खळबळ

साताऱ्यात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याचे खळबळ उडाली आहे.

लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज स्थगित

मणिपूर मुद्यावर लोकसभा आणि राज्यसभेत देखील गदारोळ झाला. दोन्ही सभागृहातील कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ आणि घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. वसमत लगत असलेल्या नदीला पुर आला आहे. नदीलगत असलेल्या शेतीमध्ये पुराचे पाणी आले आहे.

पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्याशी चर्चा केली

नाशिक येथे इंडीयन बँकेत दरोड्याचा प्रयत्न

नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील इंडीयन बँकेत मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. लॉकर रुमच्या वरील स्लॅब फोडून हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

बँकेतील कुठलेही साहित्य चोरीला गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी फॉरेन्सिक व डॉग स्कॉड पथकातर्फे पाहणी केली तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासणीचे काम देखील सुरू आहे.

जगबुडी नदीची पाणी पातळी 6.50 मीटर, वाहतूक व वीज पुरवठा सुरळीत

1. सध्या जगबुडी नदीची पाणी पातळी 6.50 मी आहे. सध्या शहरामधील कोणत्याही भागात पाणी भरलेले नाही.

2. खेड शहरात 19.07.2023 रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

3. सदयस्थितीला पावसाचे प्रमाण कमी असून वाहतूक व वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे.

4. खेड नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या स्वच्छतेनंतर खेड मधील मार्केट पूर्णत: सुरु झाले आहे.

5. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून सुरक्षितेच्या दृष्टीने रघुवीर घाट दिनांक 20/7/2023 ते दिनांक 31/7/2023 पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

6. सद्यस्थितीत खेड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झालेली नाही.

कोल्हापुरात तीन दिवस मुसळधार, पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारच्या तुलनेत काल दिवसभर पावसाची (Kolhapur Rain Update) तीव्रता कमी राहिली; मात्र, धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत राहिली. जिल्ह्यात आज (ता. २१) व शनिवारी (ता. २२) यलो, तर रविवारी (ता. २३) आणि सोमवारी (ता. २४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी ३४.२ फुटांवर गेली, तर ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, संततधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यामुळं कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा-

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, लोकल सेवा सुरळीत

मुंबईसह राज्यात तुफान पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता. अधूनमधून वादळी वारे 45-55- किमी ताशी वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकल सेवा सुरळीत सुरू आहे.

आध्यात्मिक गुरू राधे माँ यांची याचिका सत्र न्यायलयाने फेटाळली

आध्यात्मिक गुरू राधे माँ यांची याचिका सत्र न्यायलयाने फेटाळली. मानहानीच्या दाव्याप्रकरणी राधे माँ विरोधात दंडाधिकारी न्यायलयाने प्रोसेस सुरू केली होती.

दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राधे माँ सत्र न्यायालयात गेल्या होत्या. एका टीव्ही चॅनेलवर राधे माँ यांनी तक्रारदार महीलेविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

इर्शाळवाडीत आतापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश

इर्शाळवाडीतील घटनेत आतापर्यंत ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक

आज दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. इर्शाळवाडी येथील घटनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यभरात मोठा पाऊस होणार आहे.

पश्चिम बंगालमधील हावडा येथे भीषण आग, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी

पश्चिम बंगालमधील हावडा येथे आगीची मोठी घटना समोर आली आहे. व्हिडीओ आणि फोटोंवरून तुम्हाला त्याच्या भीषणतेची कल्पना येऊ शकते. आतापर्यंत कोणत्याही मानवी जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली. बुधवार रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तसेच संसदेचे अधिवेशन देखील सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या ताज्या अपडेट तुम्हाला इथं वाचायला मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

'पाथेर पांचाली' मधील दुर्गा कालवश ; ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांच्या निधनाने बंगाली सिनेविश्वाला धक्का

SCROLL FOR NEXT