आज जगातील विविध भागांतील योगप्रेमींनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात एकत्रितपणे योगाचा सराव करणाऱ्या राष्ट्रीयत्वाच्या सर्वाधिक संख्येचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी आहे - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
दहा तासाच्या चौकशीनंतर ईडीचा एक अधिकारी सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानातून बाहेर
ईडी चे दोन अधिकारी कागदपत्र घेऊन पुन्हा सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी पुन्हा दाखल
न्यूयॉर्क (अमेरिका) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योगासने केली.
न्यूयॉर्क (अमेरिका): पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून योग सत्राचे नेतृत्व करणार आहेत. ज्यासाठी संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या लॉनमध्ये तयारी करण्यात आली आहे.
परदेशातील निवडक नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील निवडक 50 विद्यार्थ्यांना 'सारथी' मार्फत परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, मात्र सदरचा प्रस्ताव नोव्हेंबर 2022 पासून नियोजन विभागात प्रलंबित आहे.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात ही शिष्यवृत्ती मिळेल या आशेने परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी शासनाच्या निर्णयाकडे आणि जाहिरातीकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. राज्य शासनाने सदर प्रस्ताव तात्काळ मान्य करून तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून याच शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करावी.
लोअर परेलमध्ये ट्रेंड वर्ल्ड इमारतीत लिफ्ट कोसळली. चौथ्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली आहे. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत.
नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटात पुन्हा एकदा चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे. गेल्या महिनाभरात आग लागण्याची ही चौथी घटना समोर आलीय. आता नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे ट्रकच्या चाकाला लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
ईडीच्या कारवाईबाबत मला माहिती नाही, या धाडीसंबधी माहीती ईडी देऊ शकेल. तर मोठे घोटाळे झाले आहेत असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.
पुढील 48 तासांमध्ये मान्सूनच्या सरी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात बरसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मान्सून सक्रिय होण्याची ही चिन्हे असुन परिणामी येत्या 48 तासांत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडुन वर्तवण्यात आला आहे. पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सुजित पाटकर यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडीची धाड टाकली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. कोव्हिड काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 पेक्षा अधिक ठिकाणी ईडीची धाड सुरू आहे.
भूमिपूजनावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. भूमीपूजनाचा कार्यक्रम उदयनराजे आणि कार्यकर्ते यांनी उधळून लावला मात्र तरीदेखील शिवेंद्रराजे यांनी भूमिपूजन केलं. त्यामुळे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पोलिस देखील उपस्थित आहे.
साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन झालं आहे.
साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं. (Latest Marathi News)
हैदराबादमधील एलबी नगर परिसरात फ्लायओव्हरचा स्लॅब कोसळला. या घटनेमध्ये 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना सिकंदराबाद येथील KIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये दोन जणांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कलम ३३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज जगभरात योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युएन हेडक्वार्टरमध्ये योगा केला. तर भारतात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी ५ हजार मीटरहून जास्त उंचीवर योगाभ्यास केला आहे. सिक्कीममध्ये जवानांनी योगदिन साजरा केला. यामध्ये जवान बर्फात योगाभ्यास करताना दिसत आहेत.
जगभरात योगाला मान्यता देण्यात आली आहे.योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींनी पोहोचवले आहे. ही एक चळवळ उभी राहिली आहे. आजच्या बदलत्या जीवन शैलीसाठी योग आवश्यक आहे. योग साधनेने अनेक आजार बरे होतात35 लाख सदस्य राज्यात योगा अभ्यास करणार आहेत.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन,आषाढी वारी, मान्सून, चक्रीवादळ या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.