एनडीआरएफचे जवान सिल्क्यरा बोगद्यात प्रवेश केला असून बचाव कार्यला वेग आला आहे. घटनास्थळी 30 रुग्णवाहिकांची व्यवस्था
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक वाईट बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन कॅप्टनसह चार जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, राजौरीमध्ये भीषण गोळीबार सुरू असून लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यांनी पर्यावरण दिंडीला हजेरी लावली. तसेच त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी घातली. फडणवीस उद्या कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पुजा करणार आहेत.
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याची कोल्हापुरात हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बागेश्वर महाराज यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे अनेत नेते उपस्थित होते.
पालघरमध्ये संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सरावली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच निवडीवरुन मोठा राडा झाला आहे. भाजप आणि शिंदे गटात वाद झाल्यामुळे सरावली गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे.
दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अचानक दरड कोसळली आणि तिथे काम करणारे ४१ मजूर आत अडकले. ढिगारा एवढा मोठा होता की, गेल्या 11 दिवसांपासून कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू होते. बोगद्यात रात्रंदिवस पथके बचावकार्य करत आहेत. त्याचबरोबर बोगद्यात ऑगर मशीनच्या सहाय्याने ३९ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. एकूण 57 ते 60 मीटर खोदकाम करायचे आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जर सर्व काही ठीक झाले तर बचाव कार्य आज रात्रीपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे.
इगतपुरीमध्ये मनोज जरांगे याचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे. जेसीबीतून मनोज जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी येत आहे, अनेक लोक सभेसाठी जमले आहेत.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाने मोर्चा काढला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आलेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खासगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान आता या प्रकरणात 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहकार मंत्र्यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत बैठक बोलावली असली तरी याचा अर्थ या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्यांवर तोडगा निघालेलाच असं नाही. त्यामुळे उद्या कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर जवळील पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत अडवण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केले आहे. पोलीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना ताब्यात घेण्याची शक्यता जरी असली, तरी हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलेला आहे.
पंडीत धीरेंद्र शास्त्रींनी आज तुकाराम महाराजाचं दर्शन घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांनी तुकाराम मदाराजांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावर पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला आज आहे.
पुणे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यांत अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुकेवगळता अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत. दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात १० दिवसात दुसऱ्यांदा गाड्यांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. वारजे भागातील विठ्ठल नगर रस्त्यावर पार्क केलेला गाड्यांची टोळक्याकडून तोडफोड करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश कम्पले उर्फ अव्या, सतीश पवन राठोड विशाल संजय सोनकर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी परिसरातील 15 ते 20 वाहनांची तोडफोड केली आहे. काही दिवसांपूर्वी वारजे परिसरात वाहने पेटवण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
ललित पाटील याला दाखल करण्यास आता ससून रुग्णालयाचा नकार दिला आहे. ड्रग्स तस्कर ललित पाटील याला सध्या हर्नियाचा त्रास आहे. मात्र, ललित पाटील याला ससून रुग्णालय प्रशासन आता दाखल करून घ्यायला तयार नाही. दररोज येऊन उपचार घेऊन ललित पाटीलला परत पाठवले जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आज इगतपुरी तालुक्यात जाहीर सभा घेणार आहेत. १०१ एकर जागेवर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त याठीकाणी असणार आहे. सिन्नर, इगतपुरी आणि नाशिकहून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तीन वाहनतळ उभे करण्यात आले आहेत.
देवगिरीवरील कालच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांशी चर्चा केली आहे. आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना नेत्यांना दिल्या असल्याची माहिती आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, हीच भूमिका नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान या बैठकीत मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. भुजबळांना थ्रोट इंफेक्शन झाल्यामुळे संपूर्ण बैठकीत तोंडावर मास्क लावला होता. कर्जतमध्ये होणाऱ्या शिबीरासाठी सर्व नेत्यांना हजर राहण्याच्या वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.