Maratha Reservation Esakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परभणीत आणखी एका तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन परभणीत आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणाने विहिरीत उडी मारुन आपलं जीवन संपवलं आहे. त्याने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय.

सर्व संकटाचा सामना करण्यास लष्कर सक्षम- राजनाथ सिंह

मला पूर्ण विश्वास आहे की, देशावर संकट आल्यास आपले लष्कर त्याला सामोरे जाण्यास पूर्ण सक्षम आहे. भारताची केवळ आर्थिक शक्ती वाढत नाहीये, तर लष्करी ताकदही वाढत आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ते आसामच्या तेजपूर येथे बोलत होते.

रवींद्र वायकर यांची तब्बल सहा तास चौकशी

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज आर्थिक तपास यंत्रणेसमोर चौकशी झाली. तब्बल सहा तास ही चौकशी झाली आहे. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आला होता. त्यांनतर त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

मुंबईतील माहीम किल्ल्यावर तोरणोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या हस्ते माहीम किल्ल्याला तोरण

गुजरातमध्ये बांधकाम सुरु असलेला पुल कोसळला

गुजरातच्या पालणपूरमध्ये एक निर्माणाधीन पुल कोसळला आहे. पुलाचे बांधकाम सुरु असताना त्याचा काही भाग कोसळल. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे,

बांदलादेशमध्ये दोन रेल्वेंचा भीषण अपघात; 20 पेक्षा जास्त मृत्यूमुखी

बांगलादेशमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या असून यात कमीतकमी २० लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. राजधानी ढाका जवळ कृष्णगंज जिल्ह्यातील ही घटना आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ढाका ट्रिब्यूनने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

समजून घेण्याची मराठा समाजाची मानसिकता राहिली नाही- अजित पवार

आरक्षणाला दोन्ही बाजू आहेत. मराठा समाजाची समजून घेण्याची मानसिकता राहिलेली नाही. कुणबी प्रमाणपत्र असलेले लोक देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जाऊन बसत आहेत. अशा प्रकारची सध्याची स्थिती आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार- भूपेश बघेल

पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून विविध घोषणा होत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पुन्हा सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु अशी घोषणा केली आहे.

माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन झालं आहे. त्यांनी ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताचे महान डाबखुरे फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी भारतीय संघाचे कर्णधार पद देखील भूषवलं आहे.

ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांची गेल्या अडीच तासांपासून चौकशी सुरू

ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांची गेल्या अडीच तासांपासून चौकशी सुरू आहे.

ललित पाटीलला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

ललित पाटीलला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कांदिवलीच्या वीणा संतुर बिल्डींगमध्ये भीषण आग

मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील एका इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीच्या बाजूला असलेल्या या इमारतीला मोठी आग लागली असून या इमारतीच्या आगीत एक वृद्ध महिला आणि एक लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याचे समजते. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली असून आगीचे प्रचंड लोट आणि धूर मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आगीची माहिती मिळतात मुंबई अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळाकडे रवाना झाल्या असल्याची देखील माहिती मिळत आहे

'आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे', मराठा मोर्चाची मागणी

'आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हाला तात्पुरत आरक्षण नको, अशी मागणी मराठा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.

नेरे-दत्तवाडीत दुकानांना भीषण आग; दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

आयटी पार्क हिंजवडी परिसरात असलेल्या नेरे- दत्तवाडीतील ढमाले नगरमध्ये आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दुकानांना आग लागली.

या घटनेमध्ये एक चप्पल-शूज व लॉन्ड्रीचे दुकान जळून खाक झाले. तर शेजारील सलून व अन्य दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती.

पुण्यात डी.जे आणि लेझर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुण्यात डी जे आणि लेझर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील जुन्या जाणकार मंडळी यांच्याकडून याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील "वाडेश्वर कट्टा" मध्ये असणाऱ्या डॉ सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, संदीप खर्डेकर यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.

गणेशोत्सवातील धडकी भरवणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात सर्वपक्षीय लढा देण्यात येत आहे. डीजे आणि लेझरच्या वापराबाबत निर्बंध हवेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. वाढलेल्या ध्वनिपातळीचा त्रास झाल्याबाबत पुणेकरांकडून समाजमाध्यमांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार

विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. शेतकऱ्यांनी या दिवशी माल मार्केटमध्ये आणू नये, कृषी उत्पन्न बाजार समितीन आवाहन केलं आहे. फळे भाज्या बाजार सह पान बाजार बंद राहणार आहे.

अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी, दोघांना अटक

अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा उद्या दसरा मेळावा; जोरदार तयारी सुरू

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा तर आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. सकल मराठा समाजाने दौर्‍याला विरोध केला आहे. जिल्ह्यात येण्यापूर्वी आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी आहे.

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी, कुणावर निशाणा साधणार?

पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेळाव्याच्या मैदानाची सफाई देखील सुरु झाली आहे. मात्र, यंदाचा मेळावा पंकजा मुंडे यांच्या दृष्टीने अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. त्यात त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल काय असेल, याबाबत मेळाव्यात त्या काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT