देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात आलेल्या पुराचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसान भरपाईही जाहीर केली.
विदर्भाला पावसाने झोडपलं आहे. नागपूर येथे १०० एमएम पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे अंबाझरी येथे पुरग्रस्त भागाची पाहणीकेली.
अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल ४५ मिनिटे बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा सुरु आहे .
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सागर बंगल्यावर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी वर्षा बंगल्यावर सपत्निक मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी लालबागच्या राजाच्या जवळच्या भागाच कडेकोट बंदोबस्त तैनात कऱण्यात आला होता.
केंद्रीय गृहमंत्री लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आगमन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रसाद लोढा, दीपक केसरकर, खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत.
लालबाग राजाच्या दरबारी भक्तांचे हाल होताना दिसत आहे. गर्दीत स्वयंसेकांकडून आलेल्या भक्तांना रेटारेटी करण्यात येत आहे. सलग पाचव्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी होती. काही भक्तांकडून स्वयंसेवकांना रेटारेटी करण्यात आली आहे. तर गर्दीमुळे एका महिलेला चक्कर देखील आली होती. तर दुसऱ्या महिलेला दर्शनापासून खाजगी सुरक्षा रक्षक खेचून घेऊन जाताना पाहायला मिळत आहे . शनिवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी राजाच्या दरबारी झाली आहे.
नागपुरात जवळपास ४०० नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. या पावसामुळे १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य युध्द पातळीवर सुरू आहे. सध्याकाळी देवेंद्र फडणवीस नागपुरला जाणार आहेत, परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागपुरमधील परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असल्याचं फडणवीस म्हणालेत.
उल्हासनगरमधील एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. ४ ते ५ जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सिताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलात पुराचे पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला. पाण्याच्या फोर्समुळे त्या परिसरातील भिंत पडली आणि पुलाचा कठडा पडला आहे. त्यामुळे परिसरातून चार वाजल्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या परिसरात वाहतूकला खोळंबा होत आहे.
2 SDRF पथक आणि 2 NDRF पथक नागपूर शहरातील विविध भागात बचाव कार्य करत आहेत. एसडीआरएफच्या एका पथकाने नुकतेच 40 मूकबधिर विद्यार्थ्यांना वाचवले आहे. एसडीआरएफ टीमने आतापर्यंत सुमारे 105 जणांची सुटका केली आहे तर एनडीआरएफ टीमने 35 जणांची सुटका केली आहे. तर अंबाझरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. NDRF चे पथक पहाटेपासून तैनात करण्यात आले आहे. आत्तापर्यंत अनेक जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
मुंबईतील दादर परिसरातील रेनट्री इमारतीला आज लागलेल्या आगीत एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
काल रात्री एका तासाभरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक भागातपाणी साचलं आहे. तर अनेक भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं आहे. या संपुर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून नागपुरात पावसाच्या परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान जिल्हाधिकारी, आयुक्तांचं परिस्थीतीवर लक्ष आहे.
नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजोरी लावली आहे. एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक सखोल भागात पाणी शिरले आहे. नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे, त्यामुळे अनेकांची रात्र पाण्यात गेली आहे. हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. नागरिकांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह मुंबईत दाखल झाल्यावर आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री उपमुख्यंत्र्यांसह काही भाजप नेत्यांच्या बाप्पांचं दर्शन घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला मतदारसंघ वाराणसीला जाणार आहेत. यावेळी ते अनेक विकासकामांच भूमिपूजन आणि उदघाटन करणार आहेत. गंजारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा शिलण्यास करणार आहेत. महिला आरक्षण विधेयक पारित झाल्यानंतर संस्कृत विश्वविद्यालयात महिलांसोबत ते संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी 3 वाजता वाराणसीत जाणार आहेत.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.