भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार यात्रेत दगडफेकीची घटना घडली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना दगड लागल्याचा आरोप काही महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.
देशाला हुकूमशाहा सरकारची गरज नाही, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारावेळी बोलताना त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.
महाराष्ट्रातील आमची महायुती अशा पद्धतीनं पुढे जाईल की, पुढील २५ते ३० वर्षांचा जो अनुशेष राहिला आहे तो पूर्ण करुन महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम शिंदे-फडणवीस-अजितदादा करतील, अशा शब्दांत मोदींनी महायुतीच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसने त्यांच्या काळात मुलभूत सुविधांवर जेवढा खर्च केला तेवढा खर्च भाजप सरकार एका वर्षात करत आहे, असं म्हणत मोदींनी पुण्यातून काँग्रेसवर निशाणा साधला.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथील मंडी भागात मुसळधार पावसात 8-10 घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमीत्त आज भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल झाले आहेत.
लोसकभा निवडणूक २०२४ साठी पुणे मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान वसंत मोरेंना निवडणुकीचे चिन्ह रोड रोलर देण्यात आले आहे.
पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून मनसेला जय महाराष्ट्र करत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून वसंत मोरे यांना निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह बहाल करण्यात आलं.
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी चारही आरोपींना सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. विक्की गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापन यांना ८ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सोनू चांदेर याची तब्बेत खराब असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आली. आज या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा झाली. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणाला मोक्का लावण्यात आला आहे
साताऱ्यातील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "... स्वावलंबी होत असलेल्या भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी आहेत. आज आपल्या सुरक्षा दलांनी मेक इन इंडिया शस्त्रे तयार केली आहेत.
सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले, कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो.
सातार लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडमध्ये दाखल झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमत शहा यांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी समन्स बजावले आहे.
"काँग्रेस आणि लालू यादवांनी आपलं अवैध मूल असल्याप्रमाणे 70 वर्षे कलम 370 सांभाळून ठेवलं होतं, मात्र आम्ही ते हटवलं" अशा शब्दांमध्ये अमित शाहांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते बिहारमधील बेगुसराई येथे बोलत होते.
अमित शाहांच्या फेक व्हिडिओ प्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ISFO युनिटने समन्स बजावलं आहे. 1 मे रोजी त्यांना चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.
नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा एक मेल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. केवळ नागपूरच नाही, तर देशभरात अनेक विमानतळांवर अशाच धमकीचे मेल आले आहेत. यानंतर आता विमानतळांवर ड्रिलच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज तेलंगणा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि INDIA आघाडीवर बोचरी टीका केली. त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहराही अजून ठरलेला नाही. कल्पना करा, जर राहुल गांधी पंतप्रधान असते; तर त्यांना कोरोना महामारीचा सामना करणं जमलं असतं का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात सहा प्रचारसभा होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. सहाच नव्हे तर कितीही सभा घेतल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही, असं ते म्हणाले.
भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात आहेत. यावेळी सोलापुरी चादर देत त्यांचे स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील प्रचार सभेला राम कृष्ण हरी म्हणत सुरुवात केली.
पंंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात दाखल झाले आहेत. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. थोड्या वेळातच त्यांच्या सभेला सुरूवात होईल.
ठाण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. ठाण्यातील जांभळी नाका छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आदित्य ठाकरे यांची थोड्याच वेळात सभा होणार आहे.
सोशल मीडियावर मला कोट्यवधी लोक फॉलो करतात. मात्र सध्या एआयच्या मदतीने माझे खोटे व्हिडिओ तयार करून शेअर केले जात आहेत. अशा व्हिडिओंना तात्काळ रिपोर्ट करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी आज केलं. ते कर्नाटकात बोलत होते.
नागपूरकडे निघालेल्या एका खासगी हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जनी लँडिंग करण्यात आलं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे हेलिकॉप्टर याठिकाणी उतरवण्यात आलं. पायलट आणि आणखी एक व्यक्ती सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार असून या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची लगबग आता सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असताना महायुतीचे उमेदवार पियुष गोयल हे शक्ती प्रदर्शन करत उद्या सकाळी अकरा वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकल ट्रेन सीएसएमटी ते मस्जिद स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळी ११.४३ मिनिटांनी घडली आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल झालेले आहे.
मुंबई उत्तरसाठी काँग्रेसकडून लढण्यास तेजस्वी घोसाळकर यांचा नकार असल्याची माहिती समोर आली आहे. आता काँग्रेसकडून भूषण पाटील आणि कालू बुधेलिया यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेस मराठी की गुजराती उमेदवार देणार याकडे लक्ष लागलं आहे. पियुष गोयल यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार ऱाजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल कराण्यासाठी निघाले आहेत. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित आहेत
मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या पाच जणांच्या एका कुटुंबाला कांदिवली पोलिसांनी अटक केली.
ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित असणार आहेत
बोईसर, वंजारवाडा येथील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे पूर्व भागातील वाहनचालक, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
सोलापूर लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारानिमित्त सोमवारी (ता. २९) नरेंद्र मोदी यांची सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेबारा वाजता जाहीर सभा होणार आहे. होटगी रोड विमानतळावरील हेलिपॅडवर उतरून पंतप्रधान मोदी होम मैदानावर येणार आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर स्थानिकांची धुळीच्या त्रासातून लवकरच मुक्तता होणार आहे. मे अखेर या उड्डाणपूलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.