मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिलीप महाजन यांनी बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांचे पार्थिव सिवूड्स येथे ठेवण्यात आले आहे. उद्या नेरुळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.
आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकून घेतला. शिंदे गटाने पुरावे सादर करण्यासाठी त्यांना १४ दिवसांचा वेळ मागितला होता.
पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी येथील सभेत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदींच्या शरद पवारांची स्तुती करत असल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. कुपवारा जिल्ह्यातील माछील येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांना संपवण्यात आले. काश्मिर पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रतेसंबंधी सुनावणी सुरु आहे. यावेळी नार्वेकर वैतागल्याचं पाहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं की स्वत: निर्णय घ्यायचा, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला सुनावल्याचं सांगण्यात येतंय
१४ दिवसांची मुदत द्या असा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. आम्हाला काही ठोस पुरावे सादर करायचे आहेत. पुरावे सादर करण्यास नकार देणे म्हणजे न्याय नाकारणे. अपात्रतेबाबत अध्यक्षांचे अधिकार अबाधित आहे. तसंच प्रतोद कोण आहे हेही पाहायला हवा. सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांच्या अधिकाराबाबात दिलेले वेगवेगळ्या निर्णयाचा दाखला शिंदे गटाच्या वकीलांनी दिला आहे.
बाबा महाराजांचे पार्थीव सीवूड इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आणण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांच्या अनुयायांनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती दर्शवली आहे. उद्या सायंकाळी चार वाजता या ठिकाणाहून नेरूळच्या वैकुंठ भूमीमध्ये त्यांना अनंतात विलीन केले जाईल
गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यात आली होती. याप्रकरणी आरोपी असणाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आली आहे. सदार्वते यांनी याप्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता सुनावणीला सुरवात झाली आहे. ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची गरज नाही म्हटलीये, तर शिंदे गटाने पुरावे सादर करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शिर्डीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि कृषीमंत्री राहिलेल्या एका नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल त्यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी शिर्डीत आले आहेत. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी मराठीतून सुरवात केली. सर्वात आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाबामहाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. यानुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात ६ हजार रुपये जमा होणार आहेत. त्यातील पहिला हफ्ता आज जमा केला जाईल.
आज सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी २०१५ साली विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं. आज त्या कामाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्तेच होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते शिर्डीत बोलत होते.
पंतप्रधान मोदी शिर्डीत पोहोचले असून सभेला सुरुवात झाली आहे. येथे ते शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभेला उपस्थित आहेत. पैठणीचा फेटा, शाल, साई बाबांची मूर्ती, मंगल कलश आणि तलवार देवून विखे पाटील यांच्याकडून मोदींचं स्वागत करण्यात आले. विष्णूच्या दहा अवताराचे कोरीव काम असलेली तलवार मोदींना भेट देण्यात आली आहे.
काश्मिरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. काश्मिर झोन पोलिसांनी याची माहिती दिली आहे. मॅछाल सेक्टरमध्ये चकमक सुरु असल्याचे सांगण्यात येत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळाकडे रवाना झाले आहेत. काही वेळात त्यांच्या सभेला सुरूवात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साई बाबांची आरती केली.
पंतप्रधान मोदी शिर्डी साई मंदिरात दाखल झाले आहेत. ते साई मंदिरात पाद्यपूजा आणि आरती करणार आहेत. काही वेळासाठी दर्शन रांग बंद ठेवण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते मोदी साई मंदिरात जाणार आहेत. ते साई मंदिरात पाद्यपूजा आणि आरती करणार आहेत.
ओपन जीपमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा स्थळी होणार दाखल होणार आहेत. दोन्ही बाजूने महिलांकडून फुलांचा वर्षाव करून मोदींचं स्वागत होणार आहे. पहिल्यांदाच मोदी सभास्थळी ओपन जीप मधून सभास्थळी येणार आहेत. महिलांना आरक्षण दिल्यामुळे महिला मोदींचे आभार मानणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीत दाखल झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत. अनेक विकासकामांचा शुभारंभ आणि विकास कामांचे लोकार्पण देखील यावेळी पार पडणार आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. प्रियंका गांधी या खाजगी कार्यक्रमासाठी पुण्यात येत आहेत. पक्षाचा कोणताही जाहीर कार्यक्रम नसल्याची माहिती आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
- सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी
- सभास्थळी काळे कपडे, पाण्याच्या बाटल्या आणण्यावर बंदी
- राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यंत्रणांसह, राज्य राखीव दल आणि पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त
- शिर्डी विमानतळाजवळील मैदानावर दुपारी मोदींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा शुभारंभ मोदी करणार शुभारंभ
- महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार
- अहमदनगर शासकीय रूग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (१८६ किमी); जळगाव ते भुसावळ जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६किमी); NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचे उद्घाटन करतील. तसेच माता व बाल आरोग्य शाखेची पायाभरणी, आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप करतील.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते शिर्डीत साईचरणी नतमस्करही होतील. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
जामीन मिळावा यासाठी कुरुलकरने त्याचे वकील ॲड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. डी आर डी ओ संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना जामीन दिल्यास ते पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात येतील असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी न्यायालयात केला आहे. कुरुलकरच्या जामीन मंजूर करण्यास सरकारी पक्षाने विरोध केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी कुरुलकरला अटक करण्यात आली आहे. कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आज (गुरुवारी) सुनावणी घेणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी पार पडणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील काकडी विमानतळाजवळील मैदानावर मोदी शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. बीडमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.