महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

अंकिता खाणे (Ankita Khane)

चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारे विमान अचानक रद्द, प्रवाशांचे हाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईकडे जाणारे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने 80 प्रवाशांचा अक्षरशः खोळंबा झाला आहे. यात अनेक स्त्रिया असून रात्री त्यांना जाण्यास कोणताही परतीचा मार्ग नसल्याने आजची रात्र त्यांना चीपी विमानतळावरच काढावी लागणार आहे.

उद्या सकाळी साडेदहा वाजता चीपी वरून दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येईल अशी माहिती त्यांना विमान प्रशासनाने दिली आहे. मात्र आज दुपारी साडेचार वाजता विमान सुटेल या अपेक्षेने दुपारी दोन वाजल्यापासून इथे आलेल्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

डोंबिवलीत केडीएमसी कर्मचाऱ्यावर प्राण घातक हल्ला

डोंबिवली : केडीएमसी कर्मचारी विनोद लखेश्री यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. रात्री 8.30 वाजताची ही घटना असून अज्ञान व्यक्तीने त्यांच्यावर सपासप वार केले. डोंबिवली मधील केडीएमसी विभागीय ऑफिस समोर ही घटना घडली.

तेलंगणात जाहीरात केल्याप्रकरणी कर्नाटक सरकारला निवडणूक आयोगाची नोटीस

तेलंगणात जाहीरात केल्याप्रकरणी कर्नाटक सरकारला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे. याप्रकरणी उद्यापर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. तसेच या पुढे अशी जाहीरात करण्यापासून मज्जाव केला आहे.

बीआरएसचे निवडणूक आयोगाला पत्र; केली महत्त्वाची मागणी

भारत राष्ट्र समितीने निवडणूक आयोगाला पत्र लिहून रयतू बंधु योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. आचार संहितेचा भंग होत असल्याचं म्हणत आयोगाने आर्थिक मदतीवर बंदी आणली होती.

शिवसेनेचा अजित पवार गटाला जागा सोडण्यास विरोध

कसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप २६ जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने १३ खासदार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र उर्वरित ९ जागा अजित पवार गटाला सोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (वाचा संपूर्ण बातमी)

लायकी शब्द मागे घेतो- मनोज जरांगे

 "लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय" असं आक्षेपार्ह विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुण्यातील खऱाडी इथल्या सभेत केलं होतं. पण आता हे विधान अंगलट आल्यानं लायकी हा शब्द आपण मागे घेतो असं जरांगे यांनी जाहीर केलं आहे.

अभिजीत पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य पदी निवड

पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्य पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत

मात्र यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदारांना शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेवर काम करण्याची संधी दिली होती.

मात्र पक्ष फुटी नंतर शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या लोकांना या संस्थेवर काम करण्याची संधी शरद पवारांकडून देण्यात येत आहे

यमुना तिरी आदित्य ठाकरेंकडून महाआरती

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मथुऱेचाही त्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी यमुना तिरी महाआरती देखील केली. यावेळी रश्मी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या.

राजधानी नवी दिल्लीतून आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मथुरेकडे रवाना होणार आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या पुढाकाराने मथुरा येथील ठाकुर श्यामजी महाराज या प्राचीन मंदिराच्या सुशोभिकरण व नूतनीकरणाचे उद्धाटन करण्यात येणार आहे.

आदित्य ठाकरे यांचा मथुरा दौरा -

सकाळी 11.30 वाजता - बांके बिहारी मंदिर वृंदावन येथे दर्शन

दुपारी 12.00- तटीया स्थान, वृंदावन दर्शन

दुपारी 12.30- 1.30 वाजता - दुपारी वृंदावन जेवण

दुपारी 2 वाजता - मथुरे कडे रवाना होणार

दुपारी 2 ते 3 वाजता - यमुना पूजा

दुपारी 3.15 वाजता - ठाकूर श्यामजी मंदिराच उद्घाटन

दुपारी 4 वाजता - द्वारकाधीश दर्शन

दुपारी 4.30 वाजता- कृष्णजन्मभूमी दर्शन

संध्याकाळी ५ वाजता - दिल्लीकडे रवाना

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने शरद पवारांची घेतली भेट

सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पदक विजेता शिवराज राक्षे यांनी मुंबई येथे शरद पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार ट्वीट करुन म्हणालेत की, दुखापतीवर मात करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवणारा शिवराज यांना लहानपणापासूनच आजोबा आणि वडील या दोघांकडून पैलवान होण्याचा वारसा मिळाला. अतिशय गरीब शेतकरी अशा कुटूंबातून शिवराजने आपल्या मेहनतीवर हा सन्मान मिळवला. त्यांची वाटचाल पाहाता ते भविष्यात महाराष्ट्राचा झेंडा देशात आणि देशाची शान जगभरात उंचावतील यात शंकाच नाही.

पुढील वाटचालींना शुभेच्छा देण्यासाठी शिवराज राक्षे यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी, अर्जुन पुरस्कार प्राप्त, वस्ताद श्री. काकासाहेब पवार, वस्ताद श्री. गणेश मोहळ आणि श्री. प्रशांत पाटील हे उपस्थित होते.

भुजबळांनी शिंदेंशी थेट बोलावं- शंभुराजे देसाई

सरकारमध्ये मतभेद नाहीत. पण, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलावं. इतर व्यासपीठावर मत प्रदर्थन करु नये, असा सल्ला मंत्री शंभुराजे देसाई यांनी दिला आहे.

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; CM शिंदेंनी दिले आदेश

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्या मागण्या व्यासपीठावर करता त्या...; सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सल्ला

भुजबळ साहेब वयाने कर्तृत्वानं मोठे आहेत.. विनम्रपणे मागणी आहे… गैरसमज नसावे, मला प्रांजळपणे सांगायचंय जे आपलं मागणं आहे ज्या मागण्या व्यासपीठावर करता त्या बंद दरवाजामागे, कॅबिनेटमध्ये केल्या तर बरं होईल.

महाराष्ट्राच्या या दुर्दैवी गलिच्छ राजकारण गोंधळ सुरूय, भुजबळांना महत्त्वाचं पद मिळालंय… दूषित होणाऱ्या या वातावरणाला जबाबदार खोके सरकार आहे. २०० आमदार असताना तुमच्या मंत्र्याला बोलायला बाहेरचं व्यासपीठ लागतंय… सरकारमधलं मिसमॅनेजमेंट दिसतंय असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

छत्रपती संभाजीनगर मुसळधार पावसाला सुरूवात

छत्रपती संभाजीनगर मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात गारांचाही पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शिंदे समिती बरखास्त करा, SCने सांगितलंय मराठा समाज OBCमध्ये बसत नाही; भुजबळांची मागणी

सरसकट कुणबी प्रमाणपत्र आम्ही मान्य करणार नाही. राज्यभर नोंदणी तपासण्याची संमती नव्हती. शिंदे समिती बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, मराठा समाज ओबीसीमध्ये बसत नाही, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

कुर्ल्यात अमराठी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या भागामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुर्ल्यातील फिनीक्स मार्केटसिटी मॉलमध्ये मनसेने आंदोलन सुरू केलं आहे.या मॉलबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा छगन भुजबळांना विरोध

स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळांना विरोध केला आहे. यावेळी स्वराज्य संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

चाळीसगावच्या कन्नड घाटात रात्रीच्या अंधारात भीषण झाला आहे. धुक्याचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोट येथून दर्शन घेऊन हे सर्व मालेगावकडे प्रवास करत होते. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर पलटी

पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर पलटी झाला आहे. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. पुणे महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण ८ अग्निशमन वाहनं कार्यरत आहेत. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात आले आहेत. तर पोलिस विभागाकडून वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. रस्ता व्यवस्थित सुरू होण्यासाठी अजून दोन तास लागणार आहेत.

मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील रहिवाशी इमारतीला आग

मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील रहिवाशी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. चिस्तीया पॅलेस या इमारतीला आग लागली आहे. सकाळी सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु, मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा जिंतूरमध्ये दाखल, देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT