Kishori Pednekar टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

देश-विदेश अन् महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

किशोरी पेडणेकर यांची उद्या पुन्हा होणार चौकशी

कथित एसआरए घोटाळा प्रकरणात शिवसेना नेत्या किशोरी पेडणकेर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आज त्यांची चौकशी झाली, यानंतर आता उद्या देखील त्यांची चौकशी होणार आहे.

मविआच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली

महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक राहिलेले मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. यामुळं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पॅलोसींच्या घरावर हल्ला

अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांच्या कॅलिफोर्निया येथील घरावर एका व्यक्तीनं हल्ला केला आहे. घरात घुसून त्यानं पॅलोसी यांच्या पतीला मारहाण केली. यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांसाठी ठाकरे गटाकडून उस्मानाबाद बंदची हाक

ठाकरे गटाकडून उद्या उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आलेली आहे. पीक विमा कंपनी भरपाई देत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही ५३१ कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे. पाडळी गावात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. आ. कैलास पाटील यांचं पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे.

साखर कारखान्यांच्या वजन काट्यासाठी राजू शेट्टी आग्रही

राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि नियंत्रण वैद्यमापन अधिकारी डॉ. रविंद्र सिंघल यांची स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट घेतली. राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाईन करण्याची मागणी केली. राज्यातील साखर कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात काटामारी सुरू असून यामुळे शेतकरी , वाहतूकदार व तोडणी मशिनधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

टाटा-एअरबस प्रकल्पावरुन अजित पवारांचा संताप

नागपूरमध्ये होणारा टाटाचा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील संताप व्यक्त केला. ८ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने कंपनीसोबत करार केला होता. तरीही हा प्रकल्प गुजरातला जातोच कसा? दरवेळी काहीतरी कारण सांगतात, दुसरा प्रकल्प आणू म्हणतात. हे नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने काँग्रेसने आंदोलन केलं आहे. राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

बोरीवलीमध्ये इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईतील बोरीवली येथील वझिरा नाका परिसरातील एका तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत 4-5 वाहने मलब्याखाली अडकली आहेत. सुदैवाने कुणालाही यात दुखापत झालेली नाही.

गजा मारणेला न्यायालयीन कोठडी

कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र मोक्का कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गजा मारणेला वाई येथून ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केलं होतं.

सुप्रिया सुळेंचा घणाघात

'एअरबस'बाबत मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची गरज आहे. पुन्हा एक प्रकल्प राज्याबाहेर गेलेला आहे. ही गंभीर बाब आहे. परंतु याचं खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा डाव असल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केलाय.

बच्चू कडूंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

रवी राणा विरुद्ध टीका करताना बच्चू कडू यांनी महिलांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा कडून बच्चू कडूवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तर राजापेठ पोलिसांनी विरुद्ध बच्चू कडू विरुद्ध महिलांची बदनामी केल्याप्रकरणी 501 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

रवी राणा यांनी १ नोव्हेंबर आत पुरावे सादर करावे. अन्यथा हिजडा घोषित करेल अशी भाषा वापरली आहे. त्यामुळे महिला अमरावतीत आक्रमक झाल्यात. महिलांविषयी अपशब्द वापरणे योग्य नसल्याचं मत महिलांनी व्यक्त केलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची एफडीविरोधात हायकोर्टाता धाव

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एफडीविरोधात हायकोर्टाता धाव घेतली आहे.

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट हॅक

मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाऊंट अचानक हॅक झाले आहे. याबाबतची माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी मुंबईकरांना आवाहन केले आहे की, या ट्विटर हँडलवरून जे काही नवीन ट्विट केले जातील त्यावर विश्वास ठेवू नका, याबाबत लवकरचं अधिक माहिती दिली जाईल, त्यानंतरच रेल्वे पोलिसांच्या ट्विटकडे लक्ष द्या. या प्रकरणी तपास सुरु असून, अकाऊंट लवकरात लवकर पूर्ववत केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी अपयश का येतय? आदित्य ठाकरेंचा सवाल

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा सत्ताधारांवर निशाणा साधला. वेदांत नंतर टाटा एअरबस प्रकल्प तिकडे गेला. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्राच्या वाट्याला नेहमी अपयश का येतय? असा सवाल उपस्थित केला आहे.

हरिभाऊ बागडे यांची मोठी घोषणा

विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राजकारणात कार्यकर्त्यांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अखिलेश यादव अडचणीत

निवडणूक आयोगावर आरोप करणं समाजवादीचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना महागात पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरील पुरावे, कागदपत्रे अखिलेश यादव यांच्याकडे मागितले आहेत, यादव हे पुरावे देतील का, निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुतीन यांच्याकडून पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचं कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान देशभक्त असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भारत आणि रशियामध्ये चांगलं नातं असून, कोणत्याही मुद्द्यावरुन मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं.

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता

अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. भाजपने उमेदवारी मागे घेतली असली, तरी अद्याप अनेक अपक्ष उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात उमेदवारी मागे घेण्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करत ही पोटनिवडणूक रद्द करणयात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी या पत्राद्वारे केली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात तेजी

आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 583 रुपये आहे.

Twitter चे मालक होताच Elon Musk ची मोठी कारवाई; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना काढून टाकलं आहे.

जगभरात देशासह राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारतजोडो यात्रेला आज 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 50 दिवसांमध्ये या यात्रेने पाच राज्यांचा प्रवास केला आहे. तर राज्यात वेदांत प्रकल्पानंतर टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिनेसृष्टीतही अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सिने निर्माते कमल किशोर मिश्रा यांना अटक झाली आहे. कमल किशोर मिश्रा यांनी पत्नीला गाडी खाली चिरडण्याचा प्रयत्न केलेला व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर

TRAI Regulations : मोठी खबर! १ जानेवारीपासून TRAI लागू करणार नवा नियम; कंपन्यांचा फायदा अन् ग्राहकांचा तोटा?

Maharashtra Assembly Election Result: पुण्यातील 'या' मतदारसंघात अनेक वर्षांची परंपरा कायम; जनतेचा कौल नव्या आमदाराकडेच

SCROLL FOR NEXT