ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. तर हा ठराव आणताना आम्हाला विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अविश्वास ठरावावरून विरोधकांमध्येच फूट पडल्याचं चित्रं असल्याने या ठरावाचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यासह देशातही महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. (Maharashtra live blog updates )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
मुंबई कस्टम्सने शुक्रवारी नवी मुंबईतील कचरा जाळण्याच्या सुविधेतून 140 किलो अंमली पदार्थ नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 538 कोटी रुपये आहे. तस्करांच्या ताब्यातून हे अंमली पदार्थ कस्टमने जप्त केले आहेत.
अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते म्हणाले अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलून टाकला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंना टोला लगावत आहे.
भाजपचे माजी आमदार राजीव रंजन यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. पक्ष विरोधा काम केल्यामुळे पक्षातून काढण्यात आलं असल्याचे सांगितले जात आहे.
"दारु नको दूध प्या" या उपक्रमाचे नाव असून पुण्यातील ८ ही विभागात हा उपक्रम राबवण्यात येणार . इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात "दारू न पिता दूध पिवून करा" हा संदेश देत मनसेच्या वतीने पुण्यात ३१ डिसेंबर रात्री हा उपक्रम करणार आहेत. मनसे चे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली माहिती.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची घेतली भेट घेतली आहे. दोन्ही नेते जेल मधून सुटले आहेत. मात्र मविआ आघाडी म्हणून संजय राऊत यांना भेट घेतली असावी. अनिल देशमुख एका वर्षापेक्षा जास्त काळ जेलमध्ये होते.
पुण्यातून एक संतापजनक घटना समोर आलीये. येथील महिला रिक्षा चालकावर (Women Rickshaw Driver) बलात्काराचा प्रयत्न झालाय. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीनं रिक्षा चालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातील कात्रज घाटात (Katraj Ghat Pune) घडलीये. रिक्षा चालक महिलेनं आरोपीला विरोध केला असता, त्यानं संपूर्ण कपडे काढून, नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti University Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आलीये. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबाराचा धक्कादायक प्रकार घडला. ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे," गोळीबार करण्यात आला.
आज साडे आकाराच्या सुमारास ही आग लागली असून एक किलोमीटर पर्यंत आगीचे लोळ दिसत आहे. वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळावर पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या आगीत कोणतीही कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे.
हिंदुस्थान स्काऊट अँड गाईड्स या संस्थेची चौकशी होणार. या संस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला आहे. त्यामुळे युवासेनेचे वरुण सरदेसाई अडचणीत आले आहेत.
राज्यपाल झाले भाज्यपाल.., महाराष्ट्राचे एकच म्हणणे द्या हाकलून हे बुजगावणे.. यासह अनेक घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवन परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन बुजगावण्यांची हंडी फोडण्यात आली.
तुनिषा शर्माच्या आईने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिझानबद्दल तक्रारीचा पाढा वाचला आहे. शिझान सोबतच्या ब्रेकअपनंतर तुनिषा तणावात होती. तुनिषाच्या वर्तनात बदल दिसत होते. शिझानच्या सेटवर नाशापाणी चालायचं.
नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या रात्री 1 वाजेपर्यंत गणेश भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले असणार आहे. उद्या म्हणजेच 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता मानाची आरती पार पडणार आहे. तर 1 जानेवारीला सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांसाठी मंदिर खुल असणार. अशी माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने दिली आहे.
मुंबईतील कानडी बांधवांबाबत आमची तक्रार नाही. मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करणारे मुर्ख आहेत. मराठी भाषिकांविरोधात सीमाभागात मोहिम राबवली जात आहे. मराठी भाषिकांवर अत्याचार बोम्मईंनी मराठी भाषिकांच संरक्षण करावं. असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. यासोबत राहुल नार्वेकर याच्यावर पक्षपातीचा आरोप केला आहे.
फुटबॉल जगतासाठी हा अत्यंत दु:खद दिवस आहे, ब्राझिलियन दिग्गज पेले यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले, ते सर्वकाळातील सर्वात महान, फुटबॉल मैदानावरील जादूगार ज्याने अनेकांना फुटबॉल खेळण्यासाठी आणि महानता प्राप्त करण्यासाठी प्रेरणा दिली.
एक महान फुटबॉलपटू आणि सदिच्छा दूत. त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.
दिल्लीहून परतताना हम्मदपूर येथे ऋषभ पंतच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ स्वतः गाडी चालवत होता. गाडी खुप वेगात होती. प्लॅस्टिक सर्जरी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काळापुढ नियतीपुढ काहीच चाल नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि माझ्या वतीने श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा, पवनानगर, कार्ला हे हॉलिडे स्पॉट हाऊसफुल्ल झाले आहेत. लोणावळा, खंडाळा या ठिकाणी आजपासून च पर्यटकांची मांदियाळी. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.