esakal Breaking News 
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

अंकिता खाणे (Ankita Khane)

मनोज जरांगेंची १ डिसेंबरला जालन्यात सभा

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची १ डिसेंबर रोजी जालन्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. माहितीनुसार, सभेसाठी ७० ते ८० एकर जमीन मोकळी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी १० क्विंटल वजनाचा आणि ५० फूट लांबीचा हार तयार करण्यात आला आहे. होमग्राऊंडवरुन ते चौथ्या टप्प्यातील आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

जागतिक हवामान कृती परिषदेसाठी मोदी यूएईला रवाना

जागतिक हवामान कृती परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईला आज रवाना रवाना झाले आहे. जागतिक हवामान बदलाबाबत या परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. जगभरातील नेते या परिषदेसाठी उपस्थित राहणार असल्याचं समजतं.

GDP वृद्धीदराच्या वाढीमुळे पंतप्रधान मोदींकडून समाधान व्यक्त

जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर ७.६ नोंदला गेला आहे. सरकारने याची आकडेवारी जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भाष्य केलं आहे. ७.६ टक्के जीडीपी वृद्धी दर हा भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता दाखवतो, असं मोदी म्हणाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे

एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला मिळणार संजिवनी, भाजपला धक्का

एक्झिट पोलचे सर्व्हे समोर येत असून पाच राज्यातील निवडणुकात काँग्रेसचा सत्तेच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार बनवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. "जन की बात" एक्झिट पोलनुसार, यावेळी मिझोराममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सरकार स्थापन होऊ शकते. 15 ते 25 जागा मिळतील, असा अंदाज पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. ( सर्व एक्सिट पोल येथे वाचा)

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या जीडीपी वृद्धीचा दर ७.६ टक्के

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या जीडीपी वृद्धीचा दर ७.६ टक्के नोंदला गेला आहे. त्यामुळे जगातील सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे,

4 डिसेंबरला पंतप्रधान मोदींचा कोकण दौरा

४ डिसेंबरला पंतप्रधान मोदी हे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण येथे सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. प्रकल्पांच्या उद्घाटनसाठी पंतप्रधान याठिकाणी येत आहेत.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा हमासच्या समर्थनार्थ बॅनर

गडचिरोलीमध्ये हमासच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहे. हमास ही दहशतवादी संघटना नसून क्रांतीकारी संघटना आहे, असं म्हणत नक्षलवाद्यांनी समर्थन दिले आहे.

प्रोटोकॉल तोडून लोकांना भेटतो- मुख्यमंत्री शिंदे

मी लोकांमधील माणूस आहे, लोकांना भेटण्याची माजी इच्छा असते त्यामुळे पोलिसांची थोडी धावपळ होते. मी फिल्डवर काम करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री जर विदाऊट अपॉइंटमेंट लोकांना भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी पण भेटलंच पाहिजे, असं मुख्यमत्री म्हणाले. ते रत्नागिरी येथे बोलत होते.

महाड येथे २०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास मान्यता

महाड येथे २०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या मागणीला यश मिळाले आहे. मौजे केबुर्ली येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारले जाणार आहे. राज्य सरकारने जीआर काढत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मान्यता दिली आहे.

लासलगावमध्ये छगन भुजबळांना दाखवले काळे झेंडे

लासलगावमध्ये छगन भुजबळांना दाखवले काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. तर भुजबळ गो बॅकच्या घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.

दत्ता दळवी यांची गाडी फोडणारी माणसे राऊत यांची असावीत- नितेश राणे

ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द बोलल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर दळवी यांच्या गाडीवर दगड फेक देखील करण्यात आली आहे. तर ही दगडफेक करणारी माणसे ही खासदार संजय राऊत यांचीच असावीत असं भाजपा नेते नितेश राणे यांनी म्हटले आहे.

अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर

अजित पवार गटाने दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केलं आहे. या शिबिरामध्ये अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये आजी-माजी आमदार आणि खासदार राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकांची तयारी देखील या शिबीरातून करण्यात येणार आहे.

छगन भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी; तर काही भागात मराठा समाजाने केला विरोध

भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागात पाहणी केली आहे. तर काही भागात मराठा समाजाने छगन भुजबळांना विरोध केला आहे. तर काही गावांमध्ये दुकाने बंद ठेवत दौऱ्याला विरोध दर्शवला आहे.

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, ओवेसी, के. कविता यांच्यासह अनेक दिग्गजांनी केले मतदान

तेलंगणामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. हैदराबादमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना मतदान केले, तर बाजारा हिल्समध्ये मी सीएम केसीआर यांची मुलगी के. कविता मतदान करण्यासाठी आल्या होत्या. मंत्री केटी रामाराव यांनी पत्नीसह मतदान केले.

विरोध होत असल्याने छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्याचा मार्ग बदलला

मंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे. त्यामुळे त्यांनी येवल्याला जाण्याचा मार्ग बदलला आहे. विंचूप चौफुलीत निदर्शने सुरू असल्याने ते जळगाव नेऊर मार्गे रवाना झाले आहेत. मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी गो बॅक भुजबळच्या घोषणा देखील दिल्या आहेत.

एनडीएच्या दीक्षांत समारंभ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु कार्यक्रमाला उपस्थित

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन पार पडले. प्रबोधिनीतील प्रशिक्षणानंतर एनडीएची 145 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दीक्षांत या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

मंत्री छगन भुजबळांचा येवल्यात नुकसानग्रस्त भागात पाहणी दौरा; मराठा समाजाचा भुजबळांना विरोध

मंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत. येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. मात्र भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. तरी देखील ते दौऱ्यावर जाणार आहेत.

तेलंगणामधील ११९ जागांवर मतदान सुरु, पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत संचलन होत आहे त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दाखल झाल्या आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी, मंत्री छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर आहेत, त्यांच्याया दौऱ्याला मराठा समाजाने विरोध केला आहे, यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : रतन टाटा यांची प्रकृती स्थिर

Swine Flu: महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचा धोका वाढला; मलेरियानेही डोकं वर काढलं

Nitish Kumar Reddy, रिंकू सिंगची तुफान फटकेबाजी; भारताने बांगलादेशविरुद्ध उभारला द्विशतकीय डोंगर

PM Modi: फोर्टिफाईड तांदळाचं देशभरात होणार मोफत वितरण; केंद्र सरकारचा निर्णय, १७ हजार कोटींचा खर्च

INDW vs SLW : Smriti Mandhana, हरमनप्रीत कौरची वादळी खेळी; शफाली वर्माची फटकेबाजी, वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम धावसंख्या

SCROLL FOR NEXT