Accident Sakal media
महाराष्ट्र बातम्या

Marathi News Updates: दिवसभरात राज्यात अन् देशात काय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लीकवर

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स देशासह

सकाळ डिजिटल टीम

ठाण्यातील पातलीपाडा भागात बसला अपघात, ६ प्रवासी जखमी

ठाण्यातील पातलीपाडा परिसरात एका बसला अपघात झाला. या अपघातात ६ लोक जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

राहुल गांधी घेणार राजद नेते लालू प्रसाद यादव यांची भेट

सुप्रिम कोर्टाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर ते राजद नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेण्यासाठी खासदार मिसा भारी यांच्या घरी पोहोचले आहेत.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडलं. शुक्रवारी या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला.

समृध्दी महामार्गावर गर्डर कोसळून कामगारांचा मृत्यू प्रकरण, दादा भुसेंनी केला महत्वाचा खुलासा

विधानसभेत दादा भुसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून अनेक कामरागांचा मृत्यू झाला होता. हाय टेंशन वायरला क्रेन लागून करंट लागला नसल्याचं मंत्री दादाभुसे यांनी विधान परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या नेमकी घटना घडली कशी याबाबत सिंगापूर न्युजलंड येथील तज्ज्ञांची टीम तपास करत असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.

विरोधकांचा सभात्याग, विधानसभेतून विरोधकांनी बाहेर जाण्याचा घेतला निर्णय

विधानसभेच्या कामकाजातून विरोधकांनी बाहेर जात, सभात्याग केला.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयावर राहुला गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले'आज नाही तर उद्या...'

सुप्रिम कोर्टाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया आली आहे. कॉंग्रेसच्या मुख्यालयात बोलताना ते म्हणाले की, "आज नाही तर उदय, उद्या नाही तर परवा पण विजय होतोच. काय करायचं हा माझा रस्ता क्लीअर आहे. लोकांनी दिलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल त्यांचे आभार."

'राहुल गांधींचा नाही तर, संविधानाचा विजय आहे, मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोषात राहुल गांधींचं स्वागत केलं. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "लोकशाही आणि संविधानाचा विजय झालाय, सत्यमेव जयते"

"

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात!

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एनडी स्टुडीओ येथे आत्महत्या केली होती.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधी एआयसीसीच्या मुख्यालयात दाखल, कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

सुप्रिम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या मुख्यालयात दाखल झाले. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी राहुल गांधीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

इंदापूरमधील दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह अखेर सापडले!

विहीरीच्या बांधकामादरम्यान इंदापूरमधील म्हसोबावाडी येथे झालेल्या दुर्घटनेतील चारही कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. तब्बल ६० तासानंतर या घटनेतील सर्व कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा का दिली? सुप्रीम कोर्टाचा सवाल

'मोदी' आडनाव बदनामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की राहुल गांधी यांना या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षा का देण्यात आली हे जाणून घ्यावे लागेल. न्यायाधीशांनी 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा दिली असती तर त्यांना (राहुल गांधी) अपात्र ठरले नसते, आणि त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

महेश जेठमलानी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी राहुल गांधींना सावध केले होते जेव्हा ते म्हणाले की राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांना दोषी ठरवले होते. त्याच्या वागणुकीत अद्यापही कोणताही बदल झालेला नाही, असेही जेठमलानी पुढे म्हणाले.

पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुण्यातील मुंबई-बंगळुरू महामार्गावर वडगाव पुल आणि नवले पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. नवले पुलापासून ते वारजे उड्डाणपुलापर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने येथे लांबच-लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

जळगावात चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, संतप्त ग्रामस्थांचा तहसीलवर मूक मोर्चा

जळगाव जिल्ह्यात चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर संतप्त ग्रामस्थांकडून तहसीलवर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरूष सहभागी झाले असून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे.

नितीन देसाईंच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

नितीन देसाई यांचं पार्थिव एन. डी. स्टुडिओ मधील जोधा अकबर चित्रपटाच्या सेटवर चाहत्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. नितीन देसाई यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. यावेळी भाजप नेते विनोद तावडे, छत्रपती उदयनराजे भोसले इत्यादी दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत.

राहुल गांधींना दिलासा मिळणार की...; सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांच्या याचिकेवर शुक्रवारी (४ ऑगस्ट) सुनावणी सुरू झाली आहे. आज या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. राहुल गांधींना कोर्टाने दिलासा दिला तर त्यांची खासदारकी बहाल होईल. मात्र जर दिलासा दिला नाही तर त्यांची खासदारकी रद्दच राहिल यासोबतच त्यांना पुढील निवडणूक देखील लढवता येणार नाही.

कांदिवली-धानुकरवाडी मेट्रो स्टेशनजवळीत  इमारतीच्या १६ व्या मजल्यावर आग

कांदिवली-धानुकरवाडी मेट्रो स्टेशनजवळीत जे.पी.ऑर्चिड इमारतीच्या १६ व्या मजल्यावर आग लागली आहे.अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बेडेकर महाविद्यालय मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आंदोलन

ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.

शहरात पोलिस ठाण्याची संख्या वाढवणार, फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

राज्यात व शहरात नव्या आकृतीबंदाप्रमाणे पोलिस ठाण्याची संख्या वाढवली जाणार आहे. १९६० च्या आधारवर आपली पोलिस रचना होती. आता नवी आकृतीबंदानुसार २०२३ नुसार नवीन आकृतीबंदात पोलिस काम करणार. शहरातील दोन पोलिस ठाण्यातील अंतर ४ किलोमीटर असेल तर ग्रामीण भागात हेच अंतर १० किलोमीटर असेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली

इंदापूरमधील म्हसोबावाडी दुर्घटनेतील एक मृतदेह सापडला

इंदापूरमधील म्हसोबावाडी येथे विहीरीचे बांधकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेतील एका कामगाराचा मृतदेह सापडला आहे. तब्बल साठ तासाच्या प्रयत्नानंतर हा मृतदेह हाती लागला असून अद्याप तीन जणांचा शोध सुरू आहे.

पुण्यातील विरोध प्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता दिल्लीत प्रदर्शन करणार

पुण्यातील विरोध प्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता दिल्लीत प्रदर्शन करणार आहेत. मणिपूर मुद्यावरून पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात पुण्यातील 200 पदाधिकारी आंदोलन करणार आहेत. जंतर मंतरवर 7 ऑगस्टला दिवसभर आंदोलन करणार आहेत. नंतर आंदोलक शरद पवारांची भेट घेणार आहेत. यातील काही लोकांचं शिस्तमंडळ नंतर मणिपूरला जाणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रदर्शन कर्त्यांना भेटायला जंतर मंतरवरती जाणार आहेत. मणिपूर मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

त्या चार जणांचा ६० तासांनंतरही शोध सुरूच

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी 'या' गावातील विहिरीच्या रिंगचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळला होता. त्या मलब्याखाली चार जण अडकल्याची घटना मंगळवारी घडली होती. आतापर्यंत युद्ध पातळीवरती शोधकार्य सुरू आहे. परंतु अजूनही मजुरांचा शोध लागला नाही. या ठिकाणी तणावपुर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

नितीन देसाईंची मुले आज अमेरिकेतून परतणार आहेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत अंत्यसंस्कार पार पडतील.

नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत हे अंत्यसंस्कार पार पडतील. तर दुपारी १२ ते २ या काळात त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान देशाई यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले असून थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचणार आहेत.

पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, 'हे' मुद्दे गाजणार

पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज अंतिम आठवडा प्रस्ताव मांडतील. या अंंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली जाईल. तसेच राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केली नाही. यावरुन देखील विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोबतच वाढती महागाई यासह विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरतील. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधपक्षातील प्रमुख नेत्यांची भाषणं आज होतील.

राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT